Loading...
ब्रेकिंग न्यूज :
आणखी एक बळी लोकमाता अहिल्यादेवी आधुनिक राजकारणासाठी एक दीपस्तंभ शैक्षणिक व सामाजिक कार्यातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व : डॉ. सुभाष वाघमारे शिक्षणातील बदलाच्या वाटेवरचे पाऊल अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे सांगलीतील विद्यार्थी, पालक, शिक्षक त्रस्त तीनशे पेक्षा अधिक घरगणना असणाऱ्या प्रगणकांना मदतनीस द्यावा घातक संच मान्यता निकषामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांमध्ये असंतोष धर्मवीर विद्यालयात आदर्श दाम्पत्याचा गौरवपूर्ण सेवानिवृत्ती सोहळा परभणीच्या बालतारकांची विज्ञानाच्या आकाशात भरारी सुषमा आलेकरी लिखित प्रेरणादायी ग्रंथांचे प्रकाशन टीईटीसाठी एक वर्ष वाढवले पण सवलत नाही : सुप्रीम कोर्ट पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत नाटोशी जि.प. शाळेचे नेत्रदीपक यश टीईटीसाठी एक वर्ष वाढवले, पण सवलत नाही : सुप्रीम कोर्ट वैशाख मास आणि वाढते नैसर्गिक संकट.... शिक्षण, कला आणि संवेदनांचा प्रेरणादायी प्रवास कु. तेजस्विनी ढमाळ दहा वर्षात लाखभर सरकारी शाळा बंद पडल्या! जनगणनेबाबतच्या शिक्षक परिषदेच्या मागण्यांना अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद शहापूरचा 'शिष्यवृत्ती पॅटर्न' यशस्वी ठाणे जिल्ह्यातील ३९५ विद्यार्थी पात्र दोन लाख उमेदवारांचे भविष्य पणाला 'बिंदुनामावली'च्या घोळामुळे शिक्षक भरती रखडण्याची चिन्हे आधी जनगणना, शासकीय कामे करा, मगच प्रशिक्षणाला या शिक्षण क्षेत्रात पुणे जिल्हा परिषद राज्यात अव्वल टीईटीसाठी यंदा ६ लाख उमेदवारांची उच्चांकी नोंदणी रत्नानंद यांच्या 'गं गं गमतीचा... बालकविता संग्रहाचे थाटात प्रकाशन साताऱ्याची 'थंडर बर्ड' - सुदेष्णा शिवणकर डिजिटल वर्गखोलीः प्रगतीची भरारी की सर्वांगीण विकासाची कुचंबणा ? बोगस शालार्थ आयडी घोटाळ्याची २९ मे ला नाशिकमध्ये अंतिम सुनावणी भारतीय बी.एड. धारकांना ऑस्ट्रेलियात संधी समग्र शिक्षा अभियानांतर्गत महाराष्ट्राला निधी देताना केंदाचा हात आखडता जिल्हा पुरस्कारप्राप्त शिक्षकाला अतिरिक्त वेतनवाढ देण्याचे आदेश केजमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ल्यात प्रगणक शिक्षकासह ९ जण जखमी निवृत्त शिक्षक दांपत्याला ६० लांखाला गंडवनारी आंतरराज्य टोळी जेरबंद शिक्षकांचे जिल्हास्तरीय प्रलंबित प्रश्न सोडवा शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाची जि.प.अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्याकडे मागणी मुळगावच्या जि.प. शाळेच्या चिमुकल्यांची साहित्यभरारी शैक्षणिक क्षेत्रात सामाजिक ऋण जपणारे उत्तुंग व्यक्तिमत्व - छाया बैस-चंदेल ऊन्हं पेलण्यासाठी उभारी देणारा लेखसंग्रह त्यांना सावलीत वाढवू नका ! शिरुर तालुका शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी संदीप थोरात उपसभापतीपदी पोपटराव गांधले यांची बिनविरोध निवड ओस पडणाऱ्या जिल्हा परिषद शाळांना नवसंजीवनी, तळेगाव दिघे गावात 'एआय' युक्त हायटेक मराठी स्कूल प्राथमिक शाळांना ५ दिवसांचा आठवडा लागू करा आदर्श शिक्षक समितीचे राज्य शासनाला निवेदन महाराष्ट्र गौरव ऑनलाईन वकृत्व स्पर्धेत संस्कृती आळंजकर राज्यात प्रथम उत्तम सदाकाळ यांच्या 'हिरवा वसा' कवितेचा तिसरीच्या बालभारती पुस्तकात समावेश जनगणनेचे काम करणाऱ्या शिक्षकाला लोणंद मध्ये बेदम मारहाण युवकांनी स्पर्धा परीक्षेतून स्वतःचे करिअर घडवावे : जंबाजीराव भोसले कंटेनरच्या धडकेत शिक्षिकेचा मृत्यू जनगणना बळीची मालिका सुरूच जनगणनेचे काम करणाऱ्या शिक्षकाला मारहाण पालकांनो भुलू नका...!! फाळणीच्या सावलीत कमी पटसंख्येच्या शाळांचे एकत्रीकरण नीती आयोगाच्या शिफारशी अक्षयकुमारमुळे सरकारी शाळेचा कायापालट दिली एक कोटींची मदत जनगणना करताना शिक्षकाचा हृदयविकाराने मृत्यू सांगोल्यातील राजेंद्र ढोले यांच्या निधनामुळे शोककळा जनगणना कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वाचले आजीचे प्राण, आजोबांचा मृत्यू
Dhule,Maharashtra,India

लाचखोर शिक्षणाधिकारी नाशिक एसीबीच्या ताब्यात

जुनी पेन्शन देण्यासाठी मागितले होते दोन लाख
लाचखोर शिक्षणाधिकारी नाशिक एसीबीच्या ताब्यात

धुळे : जुनी शासकीय पेन्शन योजना लागू करून देण्याच्या मोबदल्यात २ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी जिल्हा परिषद धुळे येथे उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) तसेच प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी पदावर कार्यरत असलेले चंद्रकांत दौलत पाटील (वय ४१) यांना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

ही कारवाई रविवार (दि.२८) धुळे शहरातील मालेगाव रोडवरील डी- मार्ट परिसरात करण्यात आली.

चंद्रकांत पाटील हे यापूर्वी मालेगाव महापालिकेच्या शिक्षण विभागात प्रशासनाधिकारी म्हणून कार्यरत होते. जुनी पेन्शन योजना लागू करून देण्यासाठी लाच मागितल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबी नाशिक पथकाने त्यांच्यावर सापळा कारवाई केली. ताब्यात घेतल्यानंतर पथक त्यांना पुढील कारवाईसाठी रवाना झाले आहे. या प्रकरणी मालेगाव येथील पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

यासंदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार हे २४ नोव्हेंबर २००५ पासून शिक्षक म्हणून सेवेत आहेत. त्यांची भरती प्रक्रिया ऑक्टोबर २००५ पूर्वी जाहीर झालेल्या जाहिरातीवर आधारित असल्याने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयानुसार त्यांना जुनी शासकीय पेन्शन योजना लागू होण्याचा अधिकार आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने संबंधित शासन निर्णयही निर्गमित केला आहे. या निर्णयाच्या आधारे तक्रारदार व इतर शिक्षकांनी २१ फेब्रुवारी २०२४ रोजी मालेगाव महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी अर्ज सादर केला होता.

जुनी पेन्शन योजना लागू करून देणे तसेच संबंधित शिक्षकांचे जीपीएफ खाते उघडण्यासाठी आवश्यक टिपण्णी व प्रस्ताव तयार करून आयुक्तांकडे सादर करण्याच्या मोबदल्यात चंद्रकांत पाटील यांनी प्रति शिक्षक १० हजार रुपये याप्रमाणे एकूण २ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रारदाराने ७ ऑगस्ट २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक येथे लेखी तक्रार दाखल केली होती.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबी नाशिक पथकाने त्यांचे लोकेशन ट्रॅक केले असता ते धुळे येथील मालेगाव रोडवरील डी- मार्ट परिसरात आढळून आले. त्यानुसार तेथेच त्यांना ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ मधील कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सापळा अधिकारी पोलीस उपअधीक्षक सुरेश शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली हवालदार विनोद चौधरी, दीपक पवार, पोलीस अंमलदार संजय ठाकरे व योगेश शिंदे यांनी केली. या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी तसेच एसीबी नाशिक परिक्षेत्राचे अपर पोलीस अधीक्षक सुनील दोरगे यांचे मार्गदर्शन लाभले.

या कारवाईमुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली असून, जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या प्रक्रियेत सुरू असलेल्या गैरप्रकारांवर एसीबीने लक्ष केंद्रीत केल्याचे स्पष्ट झाले आहे. पेन्शनसारख्या संवेदनशील आणि हक्काच्या बाबींसाठी लाच मागितली जात असल्याने शिक्षक वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास पुढील टप्प्यात विस्तारण्यात येणार असून, इतर कोणत्याही अधिकाऱ्यांचा किंवा मध्यस्थांचा सहभाग आहे का, याचीही सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.