Loading...
ब्रेकिंग न्यूज :
लोकमाता अहिल्यादेवी आधुनिक राजकारणासाठी एक दीपस्तंभ शैक्षणिक व सामाजिक कार्यातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व : डॉ. सुभाष वाघमारे शिक्षणातील बदलाच्या वाटेवरचे पाऊल अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे सांगलीतील विद्यार्थी, पालक, शिक्षक त्रस्त तीनशे पेक्षा अधिक घरगणना असणाऱ्या प्रगणकांना मदतनीस द्यावा घातक संच मान्यता निकषामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांमध्ये असंतोष धर्मवीर विद्यालयात आदर्श दाम्पत्याचा गौरवपूर्ण सेवानिवृत्ती सोहळा परभणीच्या बालतारकांची विज्ञानाच्या आकाशात भरारी सुषमा आलेकरी लिखित प्रेरणादायी ग्रंथांचे प्रकाशन टीईटीसाठी एक वर्ष वाढवले पण सवलत नाही : सुप्रीम कोर्ट पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत नाटोशी जि.प. शाळेचे नेत्रदीपक यश टीईटीसाठी एक वर्ष वाढवले, पण सवलत नाही : सुप्रीम कोर्ट वैशाख मास आणि वाढते नैसर्गिक संकट.... शिक्षण, कला आणि संवेदनांचा प्रेरणादायी प्रवास कु. तेजस्विनी ढमाळ दहा वर्षात लाखभर सरकारी शाळा बंद पडल्या! जनगणनेबाबतच्या शिक्षक परिषदेच्या मागण्यांना अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद शहापूरचा 'शिष्यवृत्ती पॅटर्न' यशस्वी ठाणे जिल्ह्यातील ३९५ विद्यार्थी पात्र दोन लाख उमेदवारांचे भविष्य पणाला 'बिंदुनामावली'च्या घोळामुळे शिक्षक भरती रखडण्याची चिन्हे आधी जनगणना, शासकीय कामे करा, मगच प्रशिक्षणाला या शिक्षण क्षेत्रात पुणे जिल्हा परिषद राज्यात अव्वल टीईटीसाठी यंदा ६ लाख उमेदवारांची उच्चांकी नोंदणी रत्नानंद यांच्या 'गं गं गमतीचा... बालकविता संग्रहाचे थाटात प्रकाशन साताऱ्याची 'थंडर बर्ड' - सुदेष्णा शिवणकर डिजिटल वर्गखोलीः प्रगतीची भरारी की सर्वांगीण विकासाची कुचंबणा ? बोगस शालार्थ आयडी घोटाळ्याची २९ मे ला नाशिकमध्ये अंतिम सुनावणी भारतीय बी.एड. धारकांना ऑस्ट्रेलियात संधी समग्र शिक्षा अभियानांतर्गत महाराष्ट्राला निधी देताना केंदाचा हात आखडता जिल्हा पुरस्कारप्राप्त शिक्षकाला अतिरिक्त वेतनवाढ देण्याचे आदेश केजमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ल्यात प्रगणक शिक्षकासह ९ जण जखमी निवृत्त शिक्षक दांपत्याला ६० लांखाला गंडवनारी आंतरराज्य टोळी जेरबंद शिक्षकांचे जिल्हास्तरीय प्रलंबित प्रश्न सोडवा शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाची जि.प.अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्याकडे मागणी मुळगावच्या जि.प. शाळेच्या चिमुकल्यांची साहित्यभरारी शैक्षणिक क्षेत्रात सामाजिक ऋण जपणारे उत्तुंग व्यक्तिमत्व - छाया बैस-चंदेल ऊन्हं पेलण्यासाठी उभारी देणारा लेखसंग्रह त्यांना सावलीत वाढवू नका ! शिरुर तालुका शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी संदीप थोरात उपसभापतीपदी पोपटराव गांधले यांची बिनविरोध निवड ओस पडणाऱ्या जिल्हा परिषद शाळांना नवसंजीवनी, तळेगाव दिघे गावात 'एआय' युक्त हायटेक मराठी स्कूल प्राथमिक शाळांना ५ दिवसांचा आठवडा लागू करा आदर्श शिक्षक समितीचे राज्य शासनाला निवेदन महाराष्ट्र गौरव ऑनलाईन वकृत्व स्पर्धेत संस्कृती आळंजकर राज्यात प्रथम उत्तम सदाकाळ यांच्या 'हिरवा वसा' कवितेचा तिसरीच्या बालभारती पुस्तकात समावेश जनगणनेचे काम करणाऱ्या शिक्षकाला लोणंद मध्ये बेदम मारहाण युवकांनी स्पर्धा परीक्षेतून स्वतःचे करिअर घडवावे : जंबाजीराव भोसले कंटेनरच्या धडकेत शिक्षिकेचा मृत्यू जनगणना बळीची मालिका सुरूच जनगणनेचे काम करणाऱ्या शिक्षकाला मारहाण पालकांनो भुलू नका...!! फाळणीच्या सावलीत कमी पटसंख्येच्या शाळांचे एकत्रीकरण नीती आयोगाच्या शिफारशी अक्षयकुमारमुळे सरकारी शाळेचा कायापालट दिली एक कोटींची मदत जनगणना करताना शिक्षकाचा हृदयविकाराने मृत्यू सांगोल्यातील राजेंद्र ढोले यांच्या निधनामुळे शोककळा जनगणना कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वाचले आजीचे प्राण, आजोबांचा मृत्यू निरागस मने पुस्तकासाठी मीना म्हसे-आसने सन्मानित
Nagpur,Maharashtra,India

शिक्षणाधिकारी अटकेत, बदली करून घेऊनही अखेर सापडलेच

शिक्षणाधिकारी अटकेत, बदली करून घेऊनही अखेर सापडलेच

नागपूर : बनावट शालार्थ आयडी प्रकरणी सायबर पोलिसांनी आणखी एका शिक्षणाधिकाऱ्याला मंगळवारी (दि.२३) सकाळी अटक केली. यवतमाळ येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी रवींद्र शंकरराव काटोलकर असे आरोपी शिक्षणाधिकाऱ्याचे नाव असून त्यांना सकाळी यवतमाळ येथून पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले.

त्यांनी नागपूर जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून पदभार असताना, ३९ बनावट शालार्थ आयडी तयार केले होते.

शालार्थ आयडी प्रकरणात उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी रवींद्र पाटील यांनी एप्रिल महिन्यात बनावट शालार्थ आयडी प्रकरणाच तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या चौकशीत सदर पोलिसांनी सर्वप्रथम उपसंचालक उल्हास नरड यांना गडचिरोलीतून अटक केली. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सायबर पोलिसांकडूनही सुरू करण्यात आली. त्यात पोलिसांना ६६३ शिक्षकांचे शालार्थ आयडी बनावट असल्याची बाब समोर आली होती. त्यानुसार त्यांनी तपासास सुरुवात केली.

या तपासात नरड यांच्यासह, जामदार, पारधी, वंजारी या चार आजी माजी उपसंचालकांसह काळुसे, कुंभार आणि गोंदियातील शिक्षणाधिकाऱ्याचा समावेश आहे. याशिवाय वेतन अधीक्षक नीलेश वाघमारे, नऊ लिपिक, तीन मुख्याध्यापक, दोन शाळा संचालक, चार सहाय्यक शिक्षक असे एकूण २६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आले. या पथकाच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यांपासून अटक सत्र सुरू होते. त्यातूनच काटोलकर यांच्यावरही ऑगस्ट महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तसेच त्यांना चौकशीसाठीही बोलविण्यात आले होेते. मात्र, तेव्हा सायबर पोलिसांकडून त्यांना केवळ सूचनापत्र देऊन सोडण्यात आले होते. त्यानंतर सखोल चौकशी केल्यावर त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून अतिरिक्त पदभार असताना, शिक्षकांचे ३९ शालार्थ आयडी प्रस्तावाची शहानिशा न करता, त्यांचे थकीत आणि नियमित वेतन काढण्याचे काम केले. त्यातून शासनाचा बारा कोटी रुपयांचे नुकसान केले. त्यावरून काटोलकर यांना सकाळी यवतमाळ येथून पथकाने अटक केली. नागपुरात आणल्यावर त्यांना प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात सादर केल्यावर त्यांची गुरुवारपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली.

अटकेच्या भितीने घेतली बदली !

रवींद्र काटोलकर हे जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षणाधिकारी असताना, त्यांना सायबर पोलिसांनी याप्रकरणी चौकशीसाठी बोलवले होते. दरम्यान त्यानंतर त्यांनी विभागीय शिक्षण मंडळात सहसचिव म्हणून बदल करून घेतली. मात्र, त्यानंतरही शालार्थ आयडी प्रकरणाचे शुक्लकाष्ठ त्यांच्यामागे लागल्याने त्यांनी शिक्षण मंडळातून अमरावती विभागातील यवतमाळ जिल्ह्यात माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून बदली घेतल्याची चर्चा शिक्षण विभागात रंगली आहे.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.