Satara,Maharashtra,India
‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यातील शाळांमध्ये १३ ते १५ ऑगस्टदरम्यान ध्वजारोहण

सातारा : ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाच्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या प्राथमिक शाळांमध्ये १३ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अनिस नायकवडी यांनी याबाबत सूचना जारी केल्या असून, त्यानुसार शाळांच्या वेळेतही आवश्यक बदल करण्यात आला आहे.
१३ व १४ ऑगस्ट २०२६ रोजी शाळेची वेळ सकाळी ८ ते दुपारी २.१५ अशी राहणार असून, सकाळी ८ वाजता ध्वजारोहण करण्यात येणार आहे. या वेळी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांची उपस्थिती अनिवार्य असून याबाबत च्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तर १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे नियमित वेळेनुसार कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या दिवशीही सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांची उपस्थिती राहणार आहे.
ध्वजारोहणाचा कार्यक्रम राष्ट्रीय ध्वजसंहितेचे काटेकोर पालन करून आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कार्यक्रमाची कार्यवाही पूर्ण केल्यानंतर तिरंग्यासोबतचा सेल्फी आणि कार्यवाहीचा अहवाल शासनाच्या ‘हर घर तिरंगा’ संकेतस्थळावर अपलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
"सदर उपक्रम यशस्वीपणे राबविण्याची जबाबदारी संबंधित गटशिक्षणाधिकारी व मुख्याध्यापकांनी पार पाडावी. तसेच ध्वजसंहितेचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत".
अनिस नायकवडी
शिक्षणाधिकारी (प्राथमिक), सातारा
0 कमेंट
कमेंट करा
तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.