Loading...
ब्रेकिंग न्यूज :
गणितातील अवलिया ऋषितुल्य शिक्षक : जगदीश सुपेकर साहित्याशी जडले नाते जगणं सुंदर आणि बहरदार करणारा सदाबहार काव्यसंग्रहः जगणं होईल हिरवंगार सोलापूर जिल्ह्यातील ३६ उपक्रमशील शिक्षकांचा जिल्हास्तरीय सन्मान आयेशा नदाफ यांनी दिल्लीत केले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व मावळा जवान संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी द्वारे बलकावडेवाडी शाळेला १५ हजारांचे शैक्षणिक साहित्य ढोरेगावच्या जिल्हा परिषद शाळेची क्रीडा क्षेत्रात दमदार भरारी दाणेवाडी शाळेत माजी विद्यार्थी व शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न अतिरिक्त शिक्षक-कर्मचाऱ्यांचे रोखलेले वेतन तात्काळ सुरू करा : शेख अब्दुल रहीम जिल्हा परिषद शाळा दरूजच्या पै. सुरज जाधवने जिंकली मानाची चांदीची गदा परभणी जिल्हा परिषद एम्प्लॉईज को-ऑप क्रेडिट सोसायटीची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार जि. प शाळा मठाचीवाडीच्या मुलींचा कबड्डीच्या मैदानात डंका कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालकांची संख्या ११ करण्यास मंजुरी कराड-पाटण शिक्षक सोसायटीची ७५ वी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात छब्बीचा लाल गणपती : श्रद्धा, परंपरा आणि एकतेचा वारसा यशोगाथा गुरुजींची तरीही जिवंत मी... जळत्या जखमांतून जन्मलेला जगण्याचा प्रकाश तालुकास्तरीय लोकनृत्य स्पर्धेत निंबवडे जि. प. शाळा नं. २ प्रथम येवलेवाडीच्या लोचना धनवडे यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार शिवाजीराव देसाई विद्यालयातील विद्यार्थ्यांचा स्वच्छता उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज : प्रा. दिलीप जाधव अशोक किसन कांबळे यांच्या स्मरणार्थ नगरपालिका नं. ११ शाळेला प्रिंटर भेट गुवाहाटी प्रशिक्षणासाठी युवराज माने यांची निवड गांधीनगर शाळेतील विद्यार्थ्यांचा हरिपाठ सप्ताहात उत्स्फूर्त सहभाग परभणी जि.प. एम्प्लॉईज सोसायटीची आज ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा वर्णेत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आदर्श कृत्रिम तलावात गणेशमूर्तीचे विसर्जन कोंढवलीच्या ज्ञानमंदिराचा कृतज्ञ शिल्पकार - रमेश जाधव बाप्पा, विसर्जनानंतर माणुसकीचा दीप तेवत राहो...! बुद्धीच्या देवते तुझे विसर्जन की बुडवणूक ? डहाणू तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न हेकळवाडी जिल्हा परिषद शाळा विद्यार्थी सुरक्षा सुविधा समिती अध्यक्षपदी सागर झेंडे यांची निवड संजय अहिरे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार जि. प. आदर्श केंद्रशाळा शिरसवडी येथे 'शालेय क्रीडामहोत्सव' उत्साहात निंबवडे जि. प. शाळा नं. २ ची चौफेर भरारी शिक्षक नितीन कर्पे यांचा अभिनव उपक्रम व्हॉट्सपच्या माध्यमातून मुलांना संस्कारांची शिदोरी पोषण आहारच्या स्वयंपाकींचे मानधन तातडीने अदा करा गणेश मंडळांना भेट देत तुळसण शाळेच्या विद्यार्थ्यांची सामाजिक, पर्यावरण जनजागृती 'सेवा संकल्प अभियान' अंतर्गत प्रकाशा कन्या शाळेत विविध उपक्रम कोरेगाव नं. ३ जिल्हा परिषद शाळेत गणेशोत्सवाच्या आरती कार्यक्रमात विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण शिवाजी रोडे-पाटील गृहतारण संस्थेचा ३७ कोटींचा व्यवसाय धनवडेवाडी शाळेच्या चिमुकल्यांचे पर्यावरणपूरक जनजागृती अभियान प्रगल्भ माणूस घडवणारे व्यक्तिमत्त्व : प्रा. डॉ. सुभाष वाघमारे कला आणि संस्कृतीची परंपरा जपणारी वाई नगरी बाप्पांची भक्ती की फॅशनची सक्ती प्रा. घनश्याम पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार रग्बीच्या मैदानावर साताऱ्याच्या मुलींचा दमदार खेळ नारायणगावात ओम श्री साईराम शिक्षक प्रतिष्ठानच्या वतीने गुणवंत शिक्षक व विद्यार्थी पुरस्कार सोहळा उत्साहात धारपुडी येथे रुपाली सुतार यांच्या घरातील गणेशोत्सवाचा अनोखा देखावा जगात गुरुपेक्षा कुणीच श्रेष्ठ नाही : डॉ. मधुसूदन घाणेकर
Satara,Maharashtra,India

प्र. मुख्याध्यापकावरील FIR मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द

बीएलओ कामाच्या मुद्यावरून दाखल गुन्ह्याला आळा; तहसीलदारांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
प्र. मुख्याध्यापकावरील FIR मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द

पुणे/मुंबई : प्रभारी मुख्याध्यापक विपिन अरुण निकम यांच्याविरुद्ध पौड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला एफआयआर मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. क्रिमिनल ॲप्लिकेशन क्र. १३६५/२०२६ मध्ये २९ जुलै २०२६ रोजी झालेल्या निर्णयात लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील कलम ३२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी आवश्यक कायदेशीर घटक या प्रकरणात पूर्ण होत नसल्याचे न्यायालयाने नमूद केल्याचे सांगण्यात आले आहे.

श्री. निकम यांच्याविरुद्ध पौड पोलीस ठाण्यात एफआयआर क्र. ०२१७/२०२६ दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात अर्जदारातर्फे ॲड. सौरभ पाटील, ॲड. धनराज लोढा, ॲड. आदित्य शिर्के आणि ॲड. किरण शिंदे यांनी बाजू मांडली.

विपिन निकम हे जिल्हा परिषद प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, भोईरवाडी येथे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असून इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळेचा प्रशासकीय व शैक्षणिक कारभार पाहतात. बीएलओ म्हणून नियुक्ती झाल्यानंतर १ जुलै २०२६ रोजी त्यांनी तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांना लेखी निवेदन दिले होते. प्रभारी मुख्याध्यापक म्हणून अतिरिक्त जबाबदारी असल्याने शालेय वेळेत बीएलओची कामे करणे शक्य नसल्याचे त्यांनी या निवेदनाद्वारे स्पष्ट केले होते.

मात्र, याचिकेतील म्हणण्यानुसार, त्यांच्या निवेदनाचा अपेक्षित विचार करण्यात आला नाही. त्यामुळे प्रशासनाने त्यांच्या अडचणी समजून घेऊन पर्यायी व्यवस्था करण्याऐवजी पुढील दंडात्मक कारवाईचा मार्ग स्वीकारल्याचा दावा करण्यात आला.

न्यायालयीन नोंदीनुसार, ३ जुलै २०२६ रोजी तहसीलदारांनी नव्याने नियुक्त बीएलओ सुपरवायझर यांना श्री. निकम यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियमाच्या कलम ३२ अंतर्गत फौजदारी कारवाई सुरू करण्याचे निर्देश दिले.

त्यानंतर ७ आणि ८ जुलै रोजी कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या. श्री. निकम यांनी या नोटिसांना लेखी उत्तरे देत आपण शासकीय कामाला विरोध करत नसून, प्रभारी मुख्याध्यापक म्हणून शालेय वेळेत बीएलओची जबाबदारी पार पाडणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले.

मात्र, याचिकेतील नोंदीनुसार, ९ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ७.३० वाजता व्हॉट्सॲपद्वारे ‘अंतिम इशारा’ देण्यात आला आणि त्याच दिवशी श्री. निकम यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. त्यांच्या खुलाशाचा पुरेसा विचार न करता तातडीने फौजदारी कारवाई करण्यात आल्याचा मुद्दा न्यायालयासमोर मांडण्यात आला.

सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या निर्णयांचा संदर्भ देण्यात आला. शिक्षकांच्या अध्यापनाच्या नियमित कामावर परिणाम होऊ नये, यासाठी निवडणूक व मतदार यादी पुनरावलोकनासारखी कामे सुट्टीच्या दिवशी, अध्यापन नसलेल्या दिवशी किंवा अध्यापनाच्या वेळेबाहेर देण्याबाबतच्या न्यायालयीन मार्गदर्शक तत्त्वांचा आधार घेण्यात आला.

न्यायालयीन नोंदीनुसार, श्री. निकम यांनी यापूर्वी बीएलओ आणि बीएलओ सुपरवायझर म्हणून काम केले होते. त्यांच्या या कामाबाबत कोणतीही तक्रार नसल्याचा मुद्दाही न्यायालयासमोर मांडण्यात आला.

या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधित्व अधिनियमाच्या कलम ३२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी आवश्यक घटक उपलब्ध नसल्याने संबंधित एफआयआर टिकू शकत नसल्याचा निष्कर्ष काढून न्यायालयाने तो रद्द केला.

मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर मुळशी तालुक्यातील शिक्षक आणि विविध शिक्षक संघटनांमध्ये प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत चर्चा सुरू झाली आहे. प्रभारी मुख्याध्यापकांनी लेखी स्वरूपात मांडलेल्या अडचणींचा विचार न करता फौजदारी कारवाई करण्यात आल्याची प्रक्रिया योग्य होती का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

या निर्णयामुळे शिक्षकांना निवडणूक व मतदार यादीशी संबंधित जबाबदाऱ्या देताना त्यांच्या अध्यापनाच्या नियमित कामाचा विचार करणे आणि शालेय वेळेतील अध्यापनावर परिणाम होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असल्याचा मुद्दा पुन्हा अधोरेखित झाला आहे.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.