ब्रेकिंग न्यूज :
क्रांतिसूर्य : समतेच्या युगाचा महानायक महात्मा जोतिबा फुले... स्त्रीशिक्षणाचा क्रांतिसूर्य! महात्मा ज्योतिराव फुले भारतीय समाजक्रांतीचे जनक आणि नवयुगाचे प्रणेते! महात्मा फुले... क्रांतीची व्याख्या बदलणारा महामानव! महात्मा फुले यांचे शेतकऱ्यांसाठीचे कार्य! गुलामगिरीचा इतिहास आणि मुक्तीचा जाहीरनामा गिरीजाबाई पाटील मराठी शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा फलटणमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या ४२ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन भावेनगर शाळेत संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन दुर्गम पालाना शाळेचा ओम तालुक्यात प्रथम बेलसरच्या कल्याणी पब्लिक स्कूलमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा शिंदेवाडी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी फुलविली परसबाग मोहन पवार यांच्या कृतितून आनंददायी शिक्षण साहित्य शिराळा तालुक्यात प्रथम, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड आराध्य माने बुद्धिबळ स्पर्धेत वाई तालुक्यात प्रथम एआय मुळे 2027 नववर्ष कोविड पेक्षाही धोकादायक! प्रयत्नातून यशाकडे – राजवीरची बेरीज-वजाबाकीतील प्रगती चिरंतन प्रीतीची भावार्थसाद: ‘विरहार्त शिक्षण महर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार संजयकुमार वाळके यांना प्रदान गोकुळ-धावडे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ‘कडूगाव टॅलेंट सर्च’ उपक्रम सभापती डॉ. जितेंद्र कदम यांचा अभिनव पुढाकार तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात फलटणमध्ये २०० हून अधिक सहभागी संविधान दिनानिमित्त खानापूर येथे विशेष कार्यशाळेचे आयोजन अपशिंगे मिलिटरी शाळेत दीपोत्सवातून जवानांना अनोखी मानवंदना आमोंडी जिल्हा परिषद शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा पवारवाडी शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा भारताचा राष्ट्रीय ग्रंथ : भारतीय संविधान भारतीय संविधान : लोकशाहीचा आधारस्तंभ जागर संविधानाचा, सन्मान लोकशाहीचा! मोबाईलच्या आभासी जगापेक्षा पुस्तकांचे बोट धरून समृद्ध व्यक्तिमत्त्व घडवा : डॉ. शोभा नाईक ऑनलाइन कामांविरोधात शिक्षकांचा मोठा पवित्रा बुद्धिबळ स्पर्धेत श्रद्धा येवले वाई तालुक्यात प्रथम पालघरात वरिष्ठ, निवडश्रेणी प्रशिक्षण उत्साहात संपन्न शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठनात सातारा जिल्हा राज्यात प्रथम तळेगाव ढमढेरे जि. प. शाळेच्या १३ विद्यार्थ्यांची इस्रोला भरारी सातारा तालुका ५४ व्या विज्ञान प्रदर्शनाचे हिंदवी पब्लिक स्कूलमध्ये दिमाखात उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिक्षकांच्या पगार वाढीच्या आशा पल्लवित कौशल्याधिष्ठित शिक्षण शिक्षण सेवकांची मूक वेदना... जुने दिवस... जुनी शाळा... जुन्या आठवणी... खैराव येथे विष्णू क्षीरसागर यांच्या स्मरणार्थ भव्य क्रॉस कंट्री स्पर्धा उत्साहात संपन्न उमरगा येथे शिक्षक समितीची राज्य कार्यकारिणी सभा उत्साहात सोनवडेच्या शिवाजीराव देसाई विद्यालयात कागदी फुले निर्मितीचा पर्यावरणपूरक उपक्रम पाठ्यपुस्तकातील ‘बचत’ कथेबद्दल सचिन बेंडभर यांचा सन्मान लिंब नंबर एक शाळेच्या श्रेयस पाटीलची राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड तडवळे शाळेत परसबागेतील फुलांतून हस्तकौशल्य व उद्योजकतेचे धडे निबंध स्पर्धेत अतीत केंद्र शाळेची संस्कृती घोरपडे तालुक्यात प्रथम साखर शाळा : उसाच्या फडावर उजळणारी ज्ञानज्योत अश्रूंची झाली फुले जुनी पेन्शनचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची आमदार गावडे यांच्याकडे शिक्षकांची मागणी ‘माझी पहिली कविता’ कवितासंग्रहाचे ओझर्डे जिल्हा परिषद शाळेत प्रकाशन
Satara,Maharashtra,India

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिक्षकांच्या पगार वाढीच्या आशा पल्लवित

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिक्षकांच्या  पगार वाढीच्या आशा पल्लवित

पुणे : शिक्षकांच्या वेतनश्रेणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील एका महत्त्वाच्या निर्णयामुळे पदवीधर विषय शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. महाराष्ट्र शासनाने दाखल केलेली विशेष अनुमती याचिका (SLP) सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे संबंधित शिक्षकांना S-14 वेतनश्रेणी लागू होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्र आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून वेतनश्रेणीच्या प्रश्नावर न्यायालयीन लढा देणाऱ्या शिक्षकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

या प्रकरणाची पार्श्वभूमी नागपूर उच्च न्यायालयातील न्यायालयीन लढ्याशी संबंधित आहे. पदवीधर विशेष शिक्षकांच्या वेतनश्रेणीचा मुद्दा न्यायालयात गेल्यानंतर उच्च न्यायालयाने शिक्षकांच्या बाजूने निकाल दिला होता. या निर्णयाला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, शासनाची SLP फेटाळण्यात आल्याने उच्च न्यायालयाचा निकाल कायम राहिला आहे.

S-14 वेतनश्रेणीत किती मिळणार पगार?

या निर्णयाचा सर्वाधिक महत्त्वाचा भाग म्हणजे पदवीधर शिक्षकांना लागू होणारी S-14 वेतनश्रेणी. उपलब्ध माहितीनुसार, या वेतनश्रेणीची मूळ वेतनमर्यादा 38,600 ते 1,22,800 रुपये अशी आहे. सातव्या वेतन आयोगानुसार ही वेतनश्रेणी लागू झाल्यास शिक्षकांच्या वेतनात वाढ होण्याची शक्यता आहे.

अंदाजित तक्त्यानुसार, सध्या 60 टक्के महागाई भत्ता (DA) गृहीत धरून सुरुवातीच्या टप्प्यातील शिक्षकांचे वेतन मोजण्यात आले आहे. यामध्ये 38,600 रुपये मूळ वेतन, 23,160 रुपये महागाई भत्ता, 3,860 रुपये घरभाडे भत्ता आणि 1,350 रुपये वाहन भत्ता विचारात घेतला आहे. या घटकांनुसार एकूण ढोबळ वेतनाचा अंदाज 75,616 रुपये दर्शविण्यात आला आहे. कपातीनंतर हातात मिळणारा निव्वळ पगार अंदाजे 60,354 रुपये होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, सेवेत दहा वर्षे पूर्ण केलेल्या शिक्षकांसाठीही वेतनाचा अंदाज देण्यात आला आहे. त्यानुसार मूळ वेतन 59,100 रुपये, महागाई भत्ता 35,460 रुपये, घरभाडे भत्ता 10,360 रुपये आणि वाहन भत्ता 1,350 रुपये गृहीत धरण्यात आला आहे. या गणनेनुसार ढोबळ वेतन 1,06,316 रुपये आणि कपातीनंतर निव्वळ वेतन 85,106 रुपये दाखवण्यात आले आहे. मात्र, हे आकडे अंदाजित असून प्रत्यक्ष वेतन संबंधित शिक्षकाची वेतननिश्चिती, भत्ते आणि लागू असलेल्या कपातींवर अवलंबून राहील.

शिक्षकांना थकबाकी मिळण्याचीही अपेक्षा

S-14 वेतनश्रेणी लागू झाल्यास केवळ नियमित वेतनातच बदल होणार नाही, तर मागील कालावधीतील वेतनातील फरक अर्थात थकबाकी (Arrears) मिळण्याचाही मार्ग खुला होऊ शकतो. विशेषतः इयत्ता सहावी ते आठवीच्या पदवीधर विषय शिक्षकांसह विशेष शिक्षकांच्या वेतनश्रेणीचा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे.

समान कामासाठी समान वेतन या तत्त्वाच्या आधारे संबंधित शिक्षकांना न्याय मिळावा, अशी भूमिका या प्रकरणात मांडण्यात आली होती. आता सर्वोच्च न्यायालयातील घडामोडीनंतर शिक्षकांचे लक्ष शासनाच्या पुढील कार्यवाहीकडे लागले आहे. न्यायालयीन निकालाची प्रत, त्यातील नेमके निर्देश आणि शासनाकडून होणारी अंमलबजावणी यानुसार शिक्षकांना प्रत्यक्ष लाभ मिळण्याचे चित्र स्पष्ट होईल.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.