Satara,Maharashtra,India
कोल्हापूरच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी निलंबित
आर्थिक अनियमिततेच्या आरोपांवर शासनाचा मोठा निर्णय

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांना प्रशासकीय दिरंगाई आणि गंभीर आर्थिक अनियमिततेच्या आरोपांवरून राज्य शासनाने तात्काळ निलंबित केले आहे.
शालेय शिक्षण विभागाने ३ नोव्हेंबर २०२६ रोजी याबाबतचा आदेश काढला आहे
शासन आदेशानुसार, शेंडकर या २०२२-२३ व २०२३-२४ या शैक्षणिक वर्षांतील शैक्षणिक वर्षाच्या कामकाजात आरटीई २५ टक्के प्रवेशप्रतिपूर्ती अनुदान अतिरिक्त रक्कम अदा करून प्रशासकीय दिरंगाई व गंभीर आर्थिक अनियमितता केल्याचे निदर्शनास आले आहे.
त्यामुळे त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील नियम ४ (१) (अ) अन्वये त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. पुढील आदेश होईपर्यंत त्या निलंबित राहणार आहेत.
निलंबनाच्या कालावधीत त्यांचे मुख्यालय 'शिक्षण आयुक्तालय, पुणे' येथे राहणार असून, शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच निलंबन काळात खासगी नोकरी किंवा व्यवसाय करण्यासही मनाई करण्यात आली आहे.
0 कमेंट
कमेंट करा
तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.