Loading...
ब्रेकिंग न्यूज :
'पायवाटा' च्या माध्यमातून दुर्गम शाळांची कहाणी जगासमोर.. अथांग नातं मैत्रीच्या पलीकडचं, प्रेमाच्या अलिकडचं चांडाळ चौकडी जिल्हा परिषद शाळा कानेगावला तालुका आदर्श शाळा पुरस्कार नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रश्नावर मंत्रालयात बैठका राज्यस्तरीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेत गोकूळ शाळेच्या आदित्य रिटेचे सुयश NPS ची रक्कम GPF मध्ये वर्ग करण्यासाठी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचा पाठपुरावा तांबवे शिक्षण परिषदेत आदर्श शिक्षकांचा विशेष सत्कार जि. प. शाळा, ताथवडे येथे बाहुलीनाट्यातून गाणी-गोष्टींचे मनोरंजक सादरीकरण धर्मवीर संभाजी विद्यालय, देगाव येथे रस्ता सुरक्षा कार्यक्रम संपन्न ज्ञानदानातून राष्ट्रनिर्मिती करणाऱ्या शिक्षकांचा नारायणगावात विशेष गौरव स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धा आवर्डे केंद्रात उत्साहात संपन्न सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेला १० कोटींचा विक्रमी नफा ! मुलाच्या अभ्यासासाठी आले अन् शाळेच्या स्वच्छतेत रमले गुरुजींना 'गुरुजी' राहू द्या जिल्हा परिषद शाळांची सद्यःस्थिती : आव्हाने, वास्तव आणि भविष्याची दिशा प्रेम, मैत्री आणि स्वप्नांचा तरल जीवनपट : 'लायब्ररी फ्रेंड' यवतमाळ जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत श्री शिवाजी हायस्कूल, नेरच्या विद्यार्थिनींचे उज्ज्वल यश सातारा तालुका शिक्षक समितीच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार मातोश्री गिरीजाबाई पाटील शाळेत 'आग नियंत्रणाचे' धडे जावली तालुका आदर्श शिक्षक पुरस्काराने अस्मिता जाधव सन्मानित केंद्र शाळा निगडी खुर्दचा इंग्रजीच्या मैदानात डंका गणेशोत्सवात जि. प. शाळा, धावडशीत संस्कारांची मंगलमय रुजवण 'विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसोबतच सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत : सचिन गोपाळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवातून विद्यार्थ्यांना निसर्गसंवर्धनाचा संदेश बत्तीस शिराळ्यात नंदकुमार सागर यांचा झंझावाती प्रचारदौरा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत कोर्टीच्या चिमुकल्यांची जनजागृती गणितातील अवलिया ऋषितुल्य शिक्षक : जगदीश सुपेकर साहित्याशी जडले नाते जगणं सुंदर आणि बहरदार करणारा सदाबहार काव्यसंग्रहः जगणं होईल हिरवंगार सोलापूर जिल्ह्यातील ३६ उपक्रमशील शिक्षकांचा जिल्हास्तरीय सन्मान आयेशा नदाफ यांनी दिल्लीत केले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व मावळा जवान संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी द्वारे बलकावडेवाडी शाळेला १५ हजारांचे शैक्षणिक साहित्य ढोरेगावच्या जिल्हा परिषद शाळेची क्रीडा क्षेत्रात दमदार भरारी दाणेवाडी शाळेत माजी विद्यार्थी व शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न अतिरिक्त शिक्षक-कर्मचाऱ्यांचे रोखलेले वेतन तात्काळ सुरू करा : शेख अब्दुल रहीम जिल्हा परिषद शाळा दरूजच्या पै. सुरज जाधवने जिंकली मानाची चांदीची गदा परभणी जिल्हा परिषद एम्प्लॉईज को-ऑप क्रेडिट सोसायटीची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार जि. प शाळा मठाचीवाडीच्या मुलींचा कबड्डीच्या मैदानात डंका कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालकांची संख्या ११ करण्यास मंजुरी कराड-पाटण शिक्षक सोसायटीची ७५ वी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात छब्बीचा लाल गणपती : श्रद्धा, परंपरा आणि एकतेचा वारसा यशोगाथा गुरुजींची तरीही जिवंत मी... जळत्या जखमांतून जन्मलेला जगण्याचा प्रकाश तालुकास्तरीय लोकनृत्य स्पर्धेत निंबवडे जि. प. शाळा नं. २ प्रथम येवलेवाडीच्या लोचना धनवडे यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार शिवाजीराव देसाई विद्यालयातील विद्यार्थ्यांचा स्वच्छता उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज : प्रा. दिलीप जाधव अशोक किसन कांबळे यांच्या स्मरणार्थ नगरपालिका नं. ११ शाळेला प्रिंटर भेट
Satara,Maharashtra,India

तुकाराम मुंडें एकाच वेळी रत्नागिरी, कोल्हापुरात दणका!

कोल्हापुरात एकाच वेळी १३ जणांचे निलंबन, रत्नागिरी जिल्ह्यातील 3 शिक्षकांचे निलंबन
तुकाराम मुंडें एकाच वेळी रत्नागिरी, कोल्हापुरात दणका!

कोल्हापूर : दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर कडक कारवाई करण्यात आली आहे. नुकतेच रत्नागिरी जिल्ह्यातील 3 शिक्षकांचे निलंबन करण्यात आले असून यामुळे शिक्षण खात्यात खळबळ उडाली आहे. राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी बोगस दिव्यांगांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर हे निलंबन करण्यात आले आहे. या कारवाईमुळे शिक्षण खाते हादरले असतानाच कोल्हापुरात देखील तब्बल १३ प्राथमिक शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. ही कारवाई देखील दिव्यांग आणि आजार प्रमाणपत्राबाबत बोगसगिरी उघड झाल्याने करण्यात आली आहे. तर अद्याप उर्वरित ५३ जणांच्या प्रमाणपत्रांची चौकशी केली जात असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

राज्यात मोठ्या प्रमाणात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे शासकीय, निमशासकीय नोकरीतील आरक्षणासह विविध शासकीय योजना, आर्थिक सवलती आणि इतर लाभांवर बोगस दिव्यांगांकडून डल्ला मारला जात आहे. या प्रकारामुळे खऱ्या दिव्यांगावर अन्याय होताना दिसत आहे. यामुळे असे प्रकार रोखण्यासह बोगस दिव्यांगांविरोधात तुकाराम मुंढे यांनी कडक कारवाई धोरण अवलंबले असून थेट दोषी असणार्‍या शिक्षकांना निलंबित करावे, असे आदेशच दिले आहेत.

या निर्णायामुळे शिक्षण खात्यात भूकंप आला असतानाच कोकणात बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे तसेच इतर विविध प्रकारचे भत्ते लाटणाऱ्या 3 शिक्षकांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील महावीर मिसाळ (मंडणगड), प्रदीप मोरे, राजेश भंडारे या शिक्षकांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे तसेच इतर विविध प्रकारचे भत्ते सादर करून शासनाची दिशाभूल केल्याचा ठपका ठेवण्यात आला.

तर प्रशासनाने केलेल्या चौकशीत निलंबित केलेल्या शिक्षकांकडे शारीरिक व्यंगाच्या प्रमाणापेक्षा जास्त टक्केवारी दाखवणारी बोगस प्रमाणपत्रे मिळाली होती. त्यामुळे शासनाची दिशाभूल करणाऱ्या या तीन प्राथमिक शिक्षकांची तडकाफडकी निलंबित करण्यात आले होते. या निलंबनामुळे शिक्षण खातं हादरलं असून एकच खळबळ उडाली आहे.

अशातच आता अशीच कारवाई कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी मंगळवारी (ता.६) केली असून तब्बल १३ प्राथमिक शिक्षकांना निलंबित केले. गेली दोन महिने याबाबत चौकशी सुरू होती. प्रशासनाने केलेल्या चौकशीत या शिक्षकांनी येथील सीपीआर रुग्णालयासह इतर ठिकाणाहून घेतलेले वैद्यकीय प्रमाणपत्रे चुकीचे असल्याचे आढळली आहेत.

सोयीच्या ठिकाणी बदल्यांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग आणि आजार प्रमाणपत्रांचा वापर केल्याची चर्चा सुरू होती. तसेच शिक्षकांनी बोगसगिरी करत दिव्यांग आणि आजार प्रमाणपत्रांसाठी राजकीय दबावाचा वापर केल्याचीही कुजबूज सुरू होती. यावरूनच जिल्ह्यातील ३५५ शिक्षकांची फेरतपासणी करण्यात आली. ज्यात तब्बल २६ प्राथमिक शिक्षक दोषी आढळले. तर ३०२ शिक्षकांचे अहवाल योग्य असल्याचे समोर आले. तर उर्वरित ५३ जणांच्या प्रमाणपत्रांबाबत सध्या चौकशी केली जात आहे.

दरम्यान या २६ शिक्षकांनी बोगसगिरी करत सीपीआरकडून दिव्यांग आणि आजार प्रमाणपत्रे मिळवल्याचे उघड झाले आहे. त्यातील चार शिक्षकांवर नोव्हेंबर २०२५ मध्येच कारवाई करण्यात आली असून आणखी १८ शिक्षकांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. ज्यापैकी चौघांनी खुलासे केले असून ते जिल्हा परिषद प्रशासनाने मान्य केले आहेत. तर एकाचे प्रमाणपत्र फेरतपासणीसाठी पुन्हा सीपीआरकडे पाठविण्यात आला आहे.

एकूण १३ शिक्षक प्राथमिक चौकशीत बोगस प्रमाणपत्रे घेतल्याने दोषी ठरले आहेत. या सर्व शिक्षकांना निलंबित करण्यात आले असून त्यांना जिल्ह्यातील वेगवेगळ्या पंचायत समित्यांमध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे शिक्षक पालकमंत्री असणाऱ्या प्रकाश आबिटकर यांच्या भुदरगड तालुक्यासह राधानगरी, कागल, करवीर, शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील आहेत.

आणखी १५ संशयाच्या भोवऱ्यात

दरम्यान प्रशासनाने केलेल्या चौकशीत आणखी १५ शिक्षक संशयाच्या भोवऱ्यात आले असून सीपीआरच्या नेत्रोपचार विभागाने त्यांना दिलेले नमुने मुंबईतील जे. जे. आणि ससून रुग्णालयास पाठवण्यात आले आहेत. ते अहवाल प्रलंबित असून त्या तपासण्या अजूनही झालेल्या नाहीत. त्यामुळे ते लवकर देण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली असून ते १५ शिक्षक संशयाच्या भोवऱ्यात आले आहेत.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.