Loading...
ब्रेकिंग न्यूज :
विद्यार्थ्यांचे यश हीच गुरुंना खरी गुरुदक्षिणा ढोरेगाव शाळेचा राज्यासाठी आदर्श उपक्रम बोरवंड बुद्रुक जि. प. शाळेने अभिनव ग्रंथदिंडीतून दिला संविधान जागर, वाचन चळवळीचा संदेश भक्ती, संस्कार आणि पर्यावरणाचा उंबरखडवा शाळेत सुंदर संगम आटपाडी जिल्हा परिषद शाळा क्रमांक ३ सह अंगणवाडीची बालदिंडी दिमाखात संपन्न विद्यार्थिनींच्या पुढाकारातून जानापुरी शाळेत गुरुपौर्णिमा संस्कारमय वातावरणात साजरी लोकनायकच्या दुसऱ्या आवृत्तीचे आज प्रकाशन तडवळे जिल्हा परिषद शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी वंचितांच्या वेदनांना शब्द देणारा युगपुरुष साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती - लेखन प्रेरणा दिन लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ... संच मान्यतेच्या नव्या निकषाने ३० हजार विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात शिष्यवृत्तीत अंश्रुली तोडकरचे देदिप्यमान यश साताऱ्याचे 'वायसीआयएस' महाविद्यालय ठरतेय विद्यार्थ्यांची खरी 'लाईफलाईन' वत्सलादेवी स्कूलमध्ये अनोख्या पद्धतीने पालक, शिक्षकांचे पाद्यपूजन करून गुरुपौर्णिमा साजरी गोकुळ-धावडे विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी 'माझा ऑक्सिजन, माझी जबाबदारी' उपक्रमांतर्गत भवानीनगर शाळेत विद्यार्थ्यांना वृक्षरोपांचे वाटप ज्ञानदिंडीच्या उत्साहात पाटखळ गटाची गुणवत्ता विकास समिती सहविचार सभा जि. प. शाळा करगणी क्रमांक २ येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी मोडनिंब पीएमश्री मुलींच्या शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी गुरूंचे आशीर्वाद आपल्यासाठी लाखमोलाचे : प्राचार्य डॉ. चंद्रकांत बोबडे बेलसरच्या कल्याणी स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी नवनियुक्त शिक्षणाधिकारी संघरत्न सरोदे यांचा हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनतर्फ सत्कार काळमवाडी जिल्हा परिषद शाळेचा पर्यावरणासाठी अनोखा संकल्प आजारी होण्यापूर्वीच आरोग्य जपण्याची गरज विनाशाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या जगाला विवेकाचा इशारा 'बाराला दहा कमी' एसआयआरसाठी शिक्षक आणखी पाच दिवस शाळेबाहेर राहणार समग्र शिक्षा अभियानात महाराष्ट्राला तुटपुंजा निधी शिक्षणमंत्री दादा भुसेंची केंद्र सरकारवर नाराजी पालकांनी विश्वासू मार्गदर्शक व्हावे : डॉ. मंजुश्री बोबडे 'वायसी'त पालक मेळावा उत्साहात सायबर व विद्यार्थी सुरक्षेबाबत पाटण पोलिसांचे ज्ञानोजीराव हायस्कुलमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आदर्श विद्यालय शिरवळ येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी संभाजीनगर आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शैक्षणिक उपक्रमांना पिंपोडे खुर्द ग्रामस्थांची सदिच्छा भेट शिष्यवृत्ती, मंथन, प्रज्ञाशोध परीक्षांमध्ये म्हसवे जि.प. शाळेची यशस्वी परंपरा एक सूर, एक ताल अभिनव संकल्पनेतून अतीत केंद्रातील विद्यार्थ्यांना एकसमान गणवेश ज्ञानदानाचा अखंड दीप - आदर्श शिक्षण नसिम सादिक तांबोळी स्त्रीविषयक जाणिवांचा धगधगता वास्तव आलेख - भूमिकन्या वाढलेल्या पटसंख्येमुळे शिक्षक कमी न करण्याची शिक्षक संघाची मागणी शिक्षक मित्र विचार मंचची उरमोडी परिक्रमा उत्साहात पदोन्नती प्राप्त शिक्षक, शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा भाटशिरपुरा शाळेत गौरव शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा दरुज शाळेत गौरव शिक्षक परिषदेच्या बहुतांश मागण्या शिक्षणमंत्र्यांकडून मान्य बेलदरे प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांकडून सीडबॉल रोपणाचा अभिनव उपक्रम एक पेड माँ के नाम अभियानाला ढोरेगावच्या जि.प. शाळेचा हरित स्पर्श विद्यानगर जि.प. प्राथमिक शाळेत नवभारत साक्षरता ग्रंथदिंडी उत्साहात गुरुपौर्णिमा अज्ञानातून ज्ञानप्रकाशाकडे नेणाऱ्या गुरुतत्त्वाचा उत्सव गुरु दक्षिणेच्या पलीकडील गुरुत्व अभिनव विद्याविहार प्राथमिक शाळेच्या पाच विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश जतपुरा शाळेचे अमोल आढळकर यांचा स्टार प्रवाहकडून विशेष गौरव उज्ज्वल भविष्यासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नाही : डॉ. चंद्रकांत पाटील आरटीई कायद्यात दुरुस्ती करून सेवेतील शिक्षकांना टीईटी मधून कायमस्वरूपी सूट द्यावी : शेख अब्दुल रहीम चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत देवनांद्रा शाळेची यशाची परंपरा कायम
Ratnagiri,Maharashtra,India

जिल्ह्यात १,४९७ शिक्षक 'अतिरिक्त'

संचमान्यतेचा फटका, शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण
जिल्ह्यात १,४९७ शिक्षक 'अतिरिक्त'

रत्नागिरी, देवरूख : राज्याच्या शिक्षण विभागाने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी जाहीर केलेल्या संचमान्यतेमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागात मोठी उलथापालथ झाली असून तब्बल 1, 497 शिक्षक अतिरिक्त ठरल्याचे वृत्त सकाळ ने दिले आहे. 

पटसंख्येचा नवा निकष आणि आधारकार्ड लिंक नसलेल्या विद्यार्थ्यांमुळे जिल्ह्यातील १ हजार १७ प्राथमिक तर ४८० माध्यमिक शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. या निर्णयामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून, शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

जिल्ह्यात विद्यार्थी नोंदणीचे काम अत्यंत प्रभावीपणे झाले असून, ९८ टक्के विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण झाले आहे. केवळ २ टक्के विद्यार्थ्यांची नोंदणी तांत्रिक कारणांमुळे किंवा आधार त्रुटींमुळे प्रलंबित आहे; मात्र नियमानुसार संचमान्यतेसाठी केवळ प्रमाणित (व्हॅलिड) विद्यार्थीच ग्राह्य धरले जातात.

हा मुद्दाही शिक्षक अतिरिक्त होण्यासाठी कारण ठरला आहे. इतर अनेक जिल्ह्यांमध्ये आधार नोंदणीचे प्रमाण ८० ते ९० टक्क्यांच्या दरम्यान असताना रत्नागिरीने ९८ टक्क्यांपर्यंत मजल मारली आहे. राज्याच्या सरासरीपेक्षा चांगली कामगिरी करूनही, १ हजार ०१७ प्राथमिक आणि ४८० माध्यमिक असे एकूण १ हजार ४९७ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत.

जिल्ह्यातील ६ वी ते ८ वीच्या शाळांमधील पटसंख्या कारणीभूत ठरली आहे. १९ पटापर्यंत एक पदवीधर शिक्षक मंजूर असल्यामुळे मोठ्याप्रमाणात शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. पटसंख्या केवळ १०-२० ने कमी भरली, तरी पूर्णवेळ शिक्षकाचे पद कमी होत असल्याने शाळांचे प्रशासकीय गणित पूर्णपणे बिघडणार आहे.

अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना आता रिक्त पदे असलेल्या शाळांमध्ये सामावून घेण्याची (समायोजन) प्रक्रिया राबवावी लागणार आहे. अनेक शाळांमध्ये शिक्षकसंख्या कमी झाल्याने एकाच शिक्षकावर अनेक वर्गांची जबाबदारी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या गंभीर प्रश्नावर पालकमंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात बैठक घेऊन एकही शिक्षक जिल्ह्याबाहेर जाणार नाही यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सध्या जिल्ह्यात समायोजन प्रक्रिया सुरू आहे.


अतिरिक्त शिक्षकांच्या प्रश्नांवर तात्पुरता मार्ग

जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या प्रश्नावर मंत्रालयात एक महत्त्वाची बैठक झाली. या समस्येवर सध्या तात्पुरता मार्ग काढण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील प्राथमिकच्या ९७० पदवीधर शिक्षकांना रिक्त शाळांमध्ये उपशिक्षकांऐवजी नियुक्ती दिली जाणार आहे. त्यामुळे सध्या अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना तात्पुरता दिलासा मिळणार आहे. तसेच सध्या जिल्ह्याबाहेर बदलीचा विषय काहीकाळ लांबणार आहे.


रत्नागिरी जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन जिल्ह्याबाहेर न करता जिल्ह्यातच करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. पालकमंत्र्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे शिक्षकांवर ओढवलेले विस्थापनाचे संकट टळले असून, यामुळे शिक्षकांना कौटुंबिक आणि मानसिक स्थैर्य लाभेल.

- दिलीप देवळेकर, अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र शिक्षक संघ

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.