Loading...
ब्रेकिंग न्यूज :
विद्यार्थ्यांचे यश हीच गुरुंना खरी गुरुदक्षिणा ढोरेगाव शाळेचा राज्यासाठी आदर्श उपक्रम बोरवंड बुद्रुक जि. प. शाळेने अभिनव ग्रंथदिंडीतून दिला संविधान जागर, वाचन चळवळीचा संदेश भक्ती, संस्कार आणि पर्यावरणाचा उंबरखडवा शाळेत सुंदर संगम आटपाडी जिल्हा परिषद शाळा क्रमांक ३ सह अंगणवाडीची बालदिंडी दिमाखात संपन्न विद्यार्थिनींच्या पुढाकारातून जानापुरी शाळेत गुरुपौर्णिमा संस्कारमय वातावरणात साजरी लोकनायकच्या दुसऱ्या आवृत्तीचे आज प्रकाशन तडवळे जिल्हा परिषद शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी वंचितांच्या वेदनांना शब्द देणारा युगपुरुष साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती - लेखन प्रेरणा दिन लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ... संच मान्यतेच्या नव्या निकषाने ३० हजार विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात शिष्यवृत्तीत अंश्रुली तोडकरचे देदिप्यमान यश साताऱ्याचे 'वायसीआयएस' महाविद्यालय ठरतेय विद्यार्थ्यांची खरी 'लाईफलाईन' वत्सलादेवी स्कूलमध्ये अनोख्या पद्धतीने पालक, शिक्षकांचे पाद्यपूजन करून गुरुपौर्णिमा साजरी गोकुळ-धावडे विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी 'माझा ऑक्सिजन, माझी जबाबदारी' उपक्रमांतर्गत भवानीनगर शाळेत विद्यार्थ्यांना वृक्षरोपांचे वाटप ज्ञानदिंडीच्या उत्साहात पाटखळ गटाची गुणवत्ता विकास समिती सहविचार सभा जि. प. शाळा करगणी क्रमांक २ येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी मोडनिंब पीएमश्री मुलींच्या शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी गुरूंचे आशीर्वाद आपल्यासाठी लाखमोलाचे : प्राचार्य डॉ. चंद्रकांत बोबडे बेलसरच्या कल्याणी स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी नवनियुक्त शिक्षणाधिकारी संघरत्न सरोदे यांचा हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनतर्फ सत्कार काळमवाडी जिल्हा परिषद शाळेचा पर्यावरणासाठी अनोखा संकल्प आजारी होण्यापूर्वीच आरोग्य जपण्याची गरज विनाशाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या जगाला विवेकाचा इशारा 'बाराला दहा कमी' एसआयआरसाठी शिक्षक आणखी पाच दिवस शाळेबाहेर राहणार समग्र शिक्षा अभियानात महाराष्ट्राला तुटपुंजा निधी शिक्षणमंत्री दादा भुसेंची केंद्र सरकारवर नाराजी पालकांनी विश्वासू मार्गदर्शक व्हावे : डॉ. मंजुश्री बोबडे 'वायसी'त पालक मेळावा उत्साहात सायबर व विद्यार्थी सुरक्षेबाबत पाटण पोलिसांचे ज्ञानोजीराव हायस्कुलमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आदर्श विद्यालय शिरवळ येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी संभाजीनगर आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शैक्षणिक उपक्रमांना पिंपोडे खुर्द ग्रामस्थांची सदिच्छा भेट शिष्यवृत्ती, मंथन, प्रज्ञाशोध परीक्षांमध्ये म्हसवे जि.प. शाळेची यशस्वी परंपरा एक सूर, एक ताल अभिनव संकल्पनेतून अतीत केंद्रातील विद्यार्थ्यांना एकसमान गणवेश ज्ञानदानाचा अखंड दीप - आदर्श शिक्षण नसिम सादिक तांबोळी स्त्रीविषयक जाणिवांचा धगधगता वास्तव आलेख - भूमिकन्या वाढलेल्या पटसंख्येमुळे शिक्षक कमी न करण्याची शिक्षक संघाची मागणी शिक्षक मित्र विचार मंचची उरमोडी परिक्रमा उत्साहात पदोन्नती प्राप्त शिक्षक, शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा भाटशिरपुरा शाळेत गौरव शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा दरुज शाळेत गौरव शिक्षक परिषदेच्या बहुतांश मागण्या शिक्षणमंत्र्यांकडून मान्य बेलदरे प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांकडून सीडबॉल रोपणाचा अभिनव उपक्रम एक पेड माँ के नाम अभियानाला ढोरेगावच्या जि.प. शाळेचा हरित स्पर्श विद्यानगर जि.प. प्राथमिक शाळेत नवभारत साक्षरता ग्रंथदिंडी उत्साहात गुरुपौर्णिमा अज्ञानातून ज्ञानप्रकाशाकडे नेणाऱ्या गुरुतत्त्वाचा उत्सव गुरु दक्षिणेच्या पलीकडील गुरुत्व अभिनव विद्याविहार प्राथमिक शाळेच्या पाच विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश जतपुरा शाळेचे अमोल आढळकर यांचा स्टार प्रवाहकडून विशेष गौरव उज्ज्वल भविष्यासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नाही : डॉ. चंद्रकांत पाटील आरटीई कायद्यात दुरुस्ती करून सेवेतील शिक्षकांना टीईटी मधून कायमस्वरूपी सूट द्यावी : शेख अब्दुल रहीम चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत देवनांद्रा शाळेची यशाची परंपरा कायम
Nasik,Maharashtra,India

लाच घेताना गटशिक्षणाधिकाऱ्यासह तिघे जाळ्यात

५२ हजारांची लाच घेताना अटक
लाच घेताना गटशिक्षणाधिकाऱ्यासह तिघे जाळ्यात

नाशिक : शिक्षक दाम्पत्याच्या एकस्तर वेतनश्रेणी फरकाच्या थकबाकीचे देयक संबंधीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करणे आणि ते मंजूर करण्यासाठी ५२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना दिंडोरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षक आणि नाशिक जिल्हा परिषदेतील कनिष्ठ लेखा अधिकारी या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.

दिंडोरी पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी भाऊसाहेब तुकाराम चव्हाण (४८), नीलेश निंबा भारती (५०, प्राथमिक शिक्षक, निगडोळ, दिंडोरी) आणि जिल्हा परिषदेतील कनिष्ठ लेखा अधिकारी देविप्रसाद चैत्राम पाटील (५०) अशी संशयितांची नावे आहेत. तक्रारदार व त्यांची पत्नी दोघे शिक्षक असून ते ‘पेसा’ या विशेष कार्यक्षेत्रात नियुक्तीस आहेत. २००२ ते फेब्रुवारी २०२६ पर्यंतच्या पेसा विशेष कार्यक्षेत्रातील एकस्तर वेतनश्रेणीच्या थकीत फरकाचे देयक त्यांनी दिंडोरी पंचायत समितीला सादर केले होते.

या देयकाची तक्रारदाराची रक्कम ६ लाख ५७ हजार ८०८ आणि त्यांच्या पत्नीची ६ लाख ५५ हजार ६०० रुपये मंजूर करून हा प्रस्ताव जिल्हा परिषदेतील वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यासाठी तक्रारदाराने पाठपुरावा केला. तेव्हा गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण आणि शिक्षक नीलेश भारती यांनी थकीत रकमेचे देयक काढण्यासाठी पडताळणी कारवाई व सापळा कारवाईदरम्यान, गटशिक्षणाधिकारी चव्हाण याने देयक सादर केल्याच्या मोबदल्यात एक टक्का रक्कम स्वीकारली.

तर शिक्षक नीलेश भारती याने हे देयक जिल्हा परिषदेत सादर करून त्याची प्रत तयार करण्यासाठी सुरुवातीला पाच टक्के रक्कम आणि नंतर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून तीन टक्के केलेली लाचेची रक्कम स्वतःसाठी आणि जिल्हा परिषदेतील उपलेखाधिकारी देविप्रसाद पाटील यांना कळविले होते. त्यांनी ही रक्कम स्वीकारण्यास प्रोत्साहन दिले.

या घटनाक्रमात संशयितांनी ५२ हजार रुपयांची लाच स्वीकारली. या प्रकरणी गटशिक्षणाधिकारी चव्हाण, शिक्षक भारती व कनिष्ठ लेखा अधिकारी पाटील यांच्याविरुद्ध दिंडोरी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी यांनी काम पाहिले. तर पथकात पोलीस हवालदार विनोद चौधरी, अनिल गांगोडे यांचा समावेश होता.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.