Loading...
ब्रेकिंग न्यूज :
'पायवाटा' च्या माध्यमातून दुर्गम शाळांची कहाणी जगासमोर.. अथांग नातं मैत्रीच्या पलीकडचं, प्रेमाच्या अलिकडचं चांडाळ चौकडी जिल्हा परिषद शाळा कानेगावला तालुका आदर्श शाळा पुरस्कार नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रश्नावर मंत्रालयात बैठका राज्यस्तरीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेत गोकूळ शाळेच्या आदित्य रिटेचे सुयश NPS ची रक्कम GPF मध्ये वर्ग करण्यासाठी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचा पाठपुरावा तांबवे शिक्षण परिषदेत आदर्श शिक्षकांचा विशेष सत्कार जि. प. शाळा, ताथवडे येथे बाहुलीनाट्यातून गाणी-गोष्टींचे मनोरंजक सादरीकरण धर्मवीर संभाजी विद्यालय, देगाव येथे रस्ता सुरक्षा कार्यक्रम संपन्न ज्ञानदानातून राष्ट्रनिर्मिती करणाऱ्या शिक्षकांचा नारायणगावात विशेष गौरव स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धा आवर्डे केंद्रात उत्साहात संपन्न सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेला १० कोटींचा विक्रमी नफा ! मुलाच्या अभ्यासासाठी आले अन् शाळेच्या स्वच्छतेत रमले गुरुजींना 'गुरुजी' राहू द्या जिल्हा परिषद शाळांची सद्यःस्थिती : आव्हाने, वास्तव आणि भविष्याची दिशा प्रेम, मैत्री आणि स्वप्नांचा तरल जीवनपट : 'लायब्ररी फ्रेंड' यवतमाळ जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत श्री शिवाजी हायस्कूल, नेरच्या विद्यार्थिनींचे उज्ज्वल यश सातारा तालुका शिक्षक समितीच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार मातोश्री गिरीजाबाई पाटील शाळेत 'आग नियंत्रणाचे' धडे जावली तालुका आदर्श शिक्षक पुरस्काराने अस्मिता जाधव सन्मानित केंद्र शाळा निगडी खुर्दचा इंग्रजीच्या मैदानात डंका गणेशोत्सवात जि. प. शाळा, धावडशीत संस्कारांची मंगलमय रुजवण 'विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसोबतच सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत : सचिन गोपाळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवातून विद्यार्थ्यांना निसर्गसंवर्धनाचा संदेश बत्तीस शिराळ्यात नंदकुमार सागर यांचा झंझावाती प्रचारदौरा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत कोर्टीच्या चिमुकल्यांची जनजागृती गणितातील अवलिया ऋषितुल्य शिक्षक : जगदीश सुपेकर साहित्याशी जडले नाते जगणं सुंदर आणि बहरदार करणारा सदाबहार काव्यसंग्रहः जगणं होईल हिरवंगार सोलापूर जिल्ह्यातील ३६ उपक्रमशील शिक्षकांचा जिल्हास्तरीय सन्मान आयेशा नदाफ यांनी दिल्लीत केले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व मावळा जवान संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी द्वारे बलकावडेवाडी शाळेला १५ हजारांचे शैक्षणिक साहित्य ढोरेगावच्या जिल्हा परिषद शाळेची क्रीडा क्षेत्रात दमदार भरारी दाणेवाडी शाळेत माजी विद्यार्थी व शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न अतिरिक्त शिक्षक-कर्मचाऱ्यांचे रोखलेले वेतन तात्काळ सुरू करा : शेख अब्दुल रहीम जिल्हा परिषद शाळा दरूजच्या पै. सुरज जाधवने जिंकली मानाची चांदीची गदा परभणी जिल्हा परिषद एम्प्लॉईज को-ऑप क्रेडिट सोसायटीची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार जि. प शाळा मठाचीवाडीच्या मुलींचा कबड्डीच्या मैदानात डंका कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालकांची संख्या ११ करण्यास मंजुरी कराड-पाटण शिक्षक सोसायटीची ७५ वी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात छब्बीचा लाल गणपती : श्रद्धा, परंपरा आणि एकतेचा वारसा यशोगाथा गुरुजींची तरीही जिवंत मी... जळत्या जखमांतून जन्मलेला जगण्याचा प्रकाश तालुकास्तरीय लोकनृत्य स्पर्धेत निंबवडे जि. प. शाळा नं. २ प्रथम येवलेवाडीच्या लोचना धनवडे यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार शिवाजीराव देसाई विद्यालयातील विद्यार्थ्यांचा स्वच्छता उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज : प्रा. दिलीप जाधव अशोक किसन कांबळे यांच्या स्मरणार्थ नगरपालिका नं. ११ शाळेला प्रिंटर भेट
Satara,Maharashtra,India

बनावट अपंग कर्मचाऱ्यांनी सोडला सुटकेचा निःश्वास

तुकाराम मुंढे यांची बदली आणि न्यायालयाच्या निर्णयाचा फटका
बनावट अपंग कर्मचाऱ्यांनी सोडला सुटकेचा निःश्वास

मुंबई : अपंग प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नोकऱ्या पटकावलेल्या कर्मचाऱ्यांवरील कारवाईला आता थांबा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आदेश, विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांची अचानक झालेली बदली आणि कर्मचाऱ्यांचा सरकारवरचा दबाव याला कारणीभूत ठरला आहे.

आश्चर्य म्हणजे दिव्यांग सक्षमीकरण विभागाला अपंग कर्मचाऱ्यांची माहिती देण्यास महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालये आणि शासनाच्या सर्व विभागांनी चक्क टाळाटाळ चालवली आहे.

तुकाराम मुंढे दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव असताना ९ ऑक्टोबर २०२५ रोजी शासकीय कार्यालयातील सर्वच सरसकट अपंग कर्मचऱ्यांच्या पुनर्तपासणीचा शासन निर्णय जारी झाला होता. शासनाचे 'अ' ते 'ड' वर्गातील ७, २८, ९९३ कर्मचारी आहेत. पैकी ६,९०९ कर्मचारी अपंग आहेत. अपंगांना सरळसेवेत ४ टक्के आरक्षण आहे. मात्र अपंगांचे शासकीय सेवेतील प्रमाण अवघे १.४ टक्के आहे. त्यातही बनावट प्रमाणपत्र व ४० टक्केच्या आत अपंगत्व असणाऱ्यांनी या जागा पटकावल्या आहेत.

बनाटव अपंग कर्मचाऱ्यांची बहुतांश भरती स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आहे. दिव्यांग सक्षमीकरण विभागाने याससंदर्भातली माहिती मागवली होती. त्यामध्ये ३४ जिल्हा परिषदांमध्ये ११,७५९ अपंग कर्मचारी असून बनावट प्रमाणपत्र व ४० टक्केच्या आत अपंगत्व असलेले ३७५ कर्मचारी आढळले.

राज्यात ३६ जिल्हे आहेत, मात्र १२ जिल्हाधिकारी कार्यालयांनी माहिती सादर केली. त्यामध्ये ५५२ अपंग कर्मचाऱ्यांपैकी १ कर्मचारी बोगस आढळला आहे. २९ महानगरपालिकापैकी १० महापालिकांनी अपंग कर्मचाऱ्यांची माहिती सादर केली असून १६१६ अपंग कर्मचाऱ्यांमध्ये २ बोगस अपंग कर्मचारी आढळून आले आहेत.

निवृत्त झालेल्या बोगस अपंग कर्मचाऱ्यांवर कारवाई करु नका, बोगस अपंग कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय द्या आणि ४० टक्केच्या आत अपंगत्व असलेल्यांना पुढचे लाभ थांबवा, असे ६ मे रोजी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा फटका तुकाराम मुंढे यांनी सुरु केलेल्या अपंग कर्मचाऱ्यांच्या सरसकट पडताळणीला बसला आहे.

दरम्यान मुंढे यांची सहा महिन्यात येथून बदली झाली आणि त्यांच्या जागी माणिक गुरसळ सचिवपदी आले. दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे मंत्री भाजपचे अतुल सावे आहेत. सरकारने अपंग कर्मचाऱ्यांच्या सरसकट पडताळणीला आता ब्रेक लावल्याने हजारो बोगस अपंग कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे अपंग कर्मचाऱ्यांची पडताळणी प्रक्रिया कायदेशीर, वैद्यकीय आणि नियबद्ध पद्धतीने होईल. मात्र न्यायालयाच्या निकालावर आपण बोलू शकत नाही, असे दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव माणिक गुरसळ यांचे म्हणणे आहे.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.