Loading...
ब्रेकिंग न्यूज :
गणितातील अवलिया ऋषितुल्य शिक्षक : जगदीश सुपेकर साहित्याशी जडले नाते जगणं सुंदर आणि बहरदार करणारा सदाबहार काव्यसंग्रहः जगणं होईल हिरवंगार सोलापूर जिल्ह्यातील ३६ उपक्रमशील शिक्षकांचा जिल्हास्तरीय सन्मान आयेशा नदाफ यांनी दिल्लीत केले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व मावळा जवान संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी द्वारे बलकावडेवाडी शाळेला १५ हजारांचे शैक्षणिक साहित्य ढोरेगावच्या जिल्हा परिषद शाळेची क्रीडा क्षेत्रात दमदार भरारी दाणेवाडी शाळेत माजी विद्यार्थी व शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न अतिरिक्त शिक्षक-कर्मचाऱ्यांचे रोखलेले वेतन तात्काळ सुरू करा : शेख अब्दुल रहीम जिल्हा परिषद शाळा दरूजच्या पै. सुरज जाधवने जिंकली मानाची चांदीची गदा परभणी जिल्हा परिषद एम्प्लॉईज को-ऑप क्रेडिट सोसायटीची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार जि. प शाळा मठाचीवाडीच्या मुलींचा कबड्डीच्या मैदानात डंका कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालकांची संख्या ११ करण्यास मंजुरी कराड-पाटण शिक्षक सोसायटीची ७५ वी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात छब्बीचा लाल गणपती : श्रद्धा, परंपरा आणि एकतेचा वारसा यशोगाथा गुरुजींची तरीही जिवंत मी... जळत्या जखमांतून जन्मलेला जगण्याचा प्रकाश तालुकास्तरीय लोकनृत्य स्पर्धेत निंबवडे जि. प. शाळा नं. २ प्रथम येवलेवाडीच्या लोचना धनवडे यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार शिवाजीराव देसाई विद्यालयातील विद्यार्थ्यांचा स्वच्छता उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज : प्रा. दिलीप जाधव अशोक किसन कांबळे यांच्या स्मरणार्थ नगरपालिका नं. ११ शाळेला प्रिंटर भेट गुवाहाटी प्रशिक्षणासाठी युवराज माने यांची निवड गांधीनगर शाळेतील विद्यार्थ्यांचा हरिपाठ सप्ताहात उत्स्फूर्त सहभाग परभणी जि.प. एम्प्लॉईज सोसायटीची आज ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा वर्णेत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आदर्श कृत्रिम तलावात गणेशमूर्तीचे विसर्जन कोंढवलीच्या ज्ञानमंदिराचा कृतज्ञ शिल्पकार - रमेश जाधव बाप्पा, विसर्जनानंतर माणुसकीचा दीप तेवत राहो...! बुद्धीच्या देवते तुझे विसर्जन की बुडवणूक ? डहाणू तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न हेकळवाडी जिल्हा परिषद शाळा विद्यार्थी सुरक्षा सुविधा समिती अध्यक्षपदी सागर झेंडे यांची निवड संजय अहिरे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार जि. प. आदर्श केंद्रशाळा शिरसवडी येथे 'शालेय क्रीडामहोत्सव' उत्साहात निंबवडे जि. प. शाळा नं. २ ची चौफेर भरारी शिक्षक नितीन कर्पे यांचा अभिनव उपक्रम व्हॉट्सपच्या माध्यमातून मुलांना संस्कारांची शिदोरी पोषण आहारच्या स्वयंपाकींचे मानधन तातडीने अदा करा गणेश मंडळांना भेट देत तुळसण शाळेच्या विद्यार्थ्यांची सामाजिक, पर्यावरण जनजागृती 'सेवा संकल्प अभियान' अंतर्गत प्रकाशा कन्या शाळेत विविध उपक्रम कोरेगाव नं. ३ जिल्हा परिषद शाळेत गणेशोत्सवाच्या आरती कार्यक्रमात विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण शिवाजी रोडे-पाटील गृहतारण संस्थेचा ३७ कोटींचा व्यवसाय धनवडेवाडी शाळेच्या चिमुकल्यांचे पर्यावरणपूरक जनजागृती अभियान प्रगल्भ माणूस घडवणारे व्यक्तिमत्त्व : प्रा. डॉ. सुभाष वाघमारे कला आणि संस्कृतीची परंपरा जपणारी वाई नगरी बाप्पांची भक्ती की फॅशनची सक्ती प्रा. घनश्याम पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार रग्बीच्या मैदानावर साताऱ्याच्या मुलींचा दमदार खेळ नारायणगावात ओम श्री साईराम शिक्षक प्रतिष्ठानच्या वतीने गुणवंत शिक्षक व विद्यार्थी पुरस्कार सोहळा उत्साहात धारपुडी येथे रुपाली सुतार यांच्या घरातील गणेशोत्सवाचा अनोखा देखावा जगात गुरुपेक्षा कुणीच श्रेष्ठ नाही : डॉ. मधुसूदन घाणेकर
Satara,Maharashtra,India

शिक्षक दिनी काळ्या फिती लावून काम करण्याचा निर्णय,

‘क्लासरूम मॉनिटरिंग’ उपक्रमाला शिक्षक समन्वय समितीचा विरोध
शिक्षक दिनी काळ्या फिती लावून काम करण्याचा निर्णय,

सांगली : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील शाळांमध्ये ऑनलाइन वर्ग सुरू करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक शाळेतील शिक्षकांसाठी संनियंत्रण अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, शिक्षकांनी दिलेल्या Zoom लिंकद्वारे ऑनलाइन वर्गात सहभागी होऊन विद्यार्थ्यांचे अध्यापन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. हा उपक्रम नियमितपणे दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

दरम्यान, सक्षम प्रशासकीय यंत्रणा कार्यरत असताना शिक्षकांवर अविश्वास दाखविणारा ‘क्लासरूम मॉनिटरिंग’ उपक्रम राबविण्यात येत असल्याचा आरोप करत सांगली जिल्हा शिक्षक समन्वय समितीने या उपक्रमाला विरोध दर्शविला आहे. जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थी शिष्यवृत्ती, गुणवत्ता शोध परीक्षा तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करीत असताना, विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या शिक्षकांच्या कार्यक्षमतेवर अशा प्रकारे प्रश्नचिन्ह निर्माण करणे दुर्दैवी असल्याचे समितीने म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या सांगली जिल्हा शिक्षक समन्वय समितीच्या ऑनलाइन बैठकीत या उपक्रमाचा निषेध करण्यात आला. तसेच ५ सप्टेंबर शिक्षक दिनी सर्व शिक्षकांनी काळ्या फिती लावून काम करावे, असा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व शिक्षक बांधवांनी या उपक्रमात सहभागी होऊ नये, असे आवाहनही समितीने केले आहे.

सांगली जिल्हा शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष  महेश सरनाथे, उपाध्यक्ष टी. के. जावीर, कार्याध्यक्ष डॉ. संतोष कदम, सहसचिव शशिकांत पाटील, प्रसिद्धिप्रमुख डॉ. चंद्रशेखर क्षीरसागर, उपाध्यक्ष दिवाणजी देशमुख, सरचिटणीस सदाशिव वारे आणि सल्लागार सुनील गुरव यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी या भूमिकेत सहभागी आहेत.

ऑनलाइन अध्यापनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असला, तरी शिक्षकांवरील अविश्वासाची भावना निर्माण करणाऱ्या कोणत्याही प्रक्रियेला विरोध राहील, अशी भूमिका शिक्षक समन्वय समितीने घेतली आहे. त्यामुळे ऑनलाइन अध्यापनाची प्रशासकीय अंमलबजावणी आणि ‘क्लासरूम मॉनिटरिंग’विरोधातील शिक्षक संघटनांची भूमिका यामुळे सांगली जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात येणाऱ्या काळात प्रशासन विरुद्ध शिक्षक संघटना असा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


काय आहे ‘क्लासरूम मॉनिटरिंग’ उपक्रम 

• शिक्षकांनी सकाळी ठीक ११ वाजता संनियंत्रण अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या Zoom लिंकवर सहभागी व्हावे. Zoom वर प्रवेश केल्यानंतर ऑडिओ म्यूट ठेवून व्हिडिओ सुरू ठेवावा. विद्यार्थ्यांसह फळा स्पष्टपणे दिसेल अशा योग्य ठिकाणी मोबाईल ठेवून अध्यापन करावे. 

• ऑनलाइन वर्गासाठी शिक्षकांनी मोबाईलची बॅटरी पूर्ण चार्ज ठेवणे, अनलिमिटेड इंटरनेट डेटा उपलब्ध करून घेणे तसेच Android मोबाईलमध्ये Zoom App पूर्वतयारीने डाउनलोड करून ठेवणे आवश्यक आहे. 

• Zoom ची मोफत लिंक ४५ मिनिटांसाठी उपलब्ध असल्याने लिंकचा कालावधी संपल्यानंतर सुमारे दोन मिनिटांनी त्याच लिंकवर शिक्षकांनी पुन्हा सहभागी व्हावे. 

• Zoom वर्गादरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी तसेच गटशिक्षणाधिकारी यापैकी कोणतेही अधिकारी कोणत्याही वेळी ऑनलाइन वर्गात सहभागी होऊन अध्यापनाची पाहणी तसेच शिक्षकांशी संवाद साधू शकतात.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.