Loading...
ब्रेकिंग न्यूज :
'पायवाटा' च्या माध्यमातून दुर्गम शाळांची कहाणी जगासमोर.. अथांग नातं मैत्रीच्या पलीकडचं, प्रेमाच्या अलिकडचं चांडाळ चौकडी जिल्हा परिषद शाळा कानेगावला तालुका आदर्श शाळा पुरस्कार नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रश्नावर मंत्रालयात बैठका राज्यस्तरीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेत गोकूळ शाळेच्या आदित्य रिटेचे सुयश NPS ची रक्कम GPF मध्ये वर्ग करण्यासाठी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचा पाठपुरावा तांबवे शिक्षण परिषदेत आदर्श शिक्षकांचा विशेष सत्कार जि. प. शाळा, ताथवडे येथे बाहुलीनाट्यातून गाणी-गोष्टींचे मनोरंजक सादरीकरण धर्मवीर संभाजी विद्यालय, देगाव येथे रस्ता सुरक्षा कार्यक्रम संपन्न ज्ञानदानातून राष्ट्रनिर्मिती करणाऱ्या शिक्षकांचा नारायणगावात विशेष गौरव स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धा आवर्डे केंद्रात उत्साहात संपन्न सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेला १० कोटींचा विक्रमी नफा ! मुलाच्या अभ्यासासाठी आले अन् शाळेच्या स्वच्छतेत रमले गुरुजींना 'गुरुजी' राहू द्या जिल्हा परिषद शाळांची सद्यःस्थिती : आव्हाने, वास्तव आणि भविष्याची दिशा प्रेम, मैत्री आणि स्वप्नांचा तरल जीवनपट : 'लायब्ररी फ्रेंड' यवतमाळ जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत श्री शिवाजी हायस्कूल, नेरच्या विद्यार्थिनींचे उज्ज्वल यश सातारा तालुका शिक्षक समितीच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार मातोश्री गिरीजाबाई पाटील शाळेत 'आग नियंत्रणाचे' धडे जावली तालुका आदर्श शिक्षक पुरस्काराने अस्मिता जाधव सन्मानित केंद्र शाळा निगडी खुर्दचा इंग्रजीच्या मैदानात डंका गणेशोत्सवात जि. प. शाळा, धावडशीत संस्कारांची मंगलमय रुजवण 'विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसोबतच सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत : सचिन गोपाळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवातून विद्यार्थ्यांना निसर्गसंवर्धनाचा संदेश बत्तीस शिराळ्यात नंदकुमार सागर यांचा झंझावाती प्रचारदौरा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत कोर्टीच्या चिमुकल्यांची जनजागृती गणितातील अवलिया ऋषितुल्य शिक्षक : जगदीश सुपेकर साहित्याशी जडले नाते जगणं सुंदर आणि बहरदार करणारा सदाबहार काव्यसंग्रहः जगणं होईल हिरवंगार सोलापूर जिल्ह्यातील ३६ उपक्रमशील शिक्षकांचा जिल्हास्तरीय सन्मान आयेशा नदाफ यांनी दिल्लीत केले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व मावळा जवान संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी द्वारे बलकावडेवाडी शाळेला १५ हजारांचे शैक्षणिक साहित्य ढोरेगावच्या जिल्हा परिषद शाळेची क्रीडा क्षेत्रात दमदार भरारी दाणेवाडी शाळेत माजी विद्यार्थी व शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न अतिरिक्त शिक्षक-कर्मचाऱ्यांचे रोखलेले वेतन तात्काळ सुरू करा : शेख अब्दुल रहीम जिल्हा परिषद शाळा दरूजच्या पै. सुरज जाधवने जिंकली मानाची चांदीची गदा परभणी जिल्हा परिषद एम्प्लॉईज को-ऑप क्रेडिट सोसायटीची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार जि. प शाळा मठाचीवाडीच्या मुलींचा कबड्डीच्या मैदानात डंका कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालकांची संख्या ११ करण्यास मंजुरी कराड-पाटण शिक्षक सोसायटीची ७५ वी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात छब्बीचा लाल गणपती : श्रद्धा, परंपरा आणि एकतेचा वारसा यशोगाथा गुरुजींची तरीही जिवंत मी... जळत्या जखमांतून जन्मलेला जगण्याचा प्रकाश तालुकास्तरीय लोकनृत्य स्पर्धेत निंबवडे जि. प. शाळा नं. २ प्रथम येवलेवाडीच्या लोचना धनवडे यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार शिवाजीराव देसाई विद्यालयातील विद्यार्थ्यांचा स्वच्छता उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज : प्रा. दिलीप जाधव अशोक किसन कांबळे यांच्या स्मरणार्थ नगरपालिका नं. ११ शाळेला प्रिंटर भेट
New Delhi,India

जिल्हा परिषद निवडणुका पुन्हा लांबणीवर

सर्वोच्च न्यायालयाकडून मुदतवाढ
जिल्हा परिषद निवडणुका पुन्हा लांबणीवर

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा पेच अधिकच गडद झाला असून, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडल्या आहे.

राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे आणखी १० दिवसांची मुदतवाढ मागितली आहे. ती न्यायालयाने दिली आहे.

प्रशासकीय कारणांमुळे मुदतवाढीची मागणी

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घेण्याची मुदत निश्चित केली होती. मात्र, प्रशासकीय अडचणींचे कारण देत निवडणूक आयोगाने आता १० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याची विनंती केली आहे. मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर सोमवारी या याचिकेवर सुनावणी झाली.

आरक्षणाचा तिढा आणि न्यायालयाचे आदेश

ओबीसी आरक्षणाच्या २७ टक्के मर्यादेवरून उद्भवलेल्या वादानंतर, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले होते की, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेतच घेतल्या जाव्यात. ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या ५० टक्के मर्यादेचे पालन करतात, तिथेच निवडणुका घेतल्या जाव्यात. या नियमानुसार, आयोगाने फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्याची तयारी केली होती.


विदर्भ आणि मराठवाड्यातील पेच

निवडणूक आयोगाला पश्चिम महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया राबवताना यश आले असले तरी, राज्यातील एकूण ३२ पैकी २० जिल्हा परिषदांमध्ये ५० टक्के मर्यादेचे पालन करण्यात अडचणी येत आहेत. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील जागांच्या आरक्षणाचा मुद्दा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे हा तिढा सुटेपर्यंत तिथे निवडणुका न घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.

निवडणुका लांबणीवर पडण्याची प्रमुख कारणे:

१. एकाच वेळी निवडणुकांची मागणी: सर्व जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यात याव्यात, अशी नवीन याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

 २. ईव्हीएम (EVM) टंचाई: महानगरपालिका निवडणुकांमुळे राज्यात ईव्हीएम मशीनचा तुटवडा असल्याचे समजते. 

३. बोर्डाच्या परीक्षा: फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षा आहेत. या काळात शिक्षक आणि सरकारी यंत्रणा परीक्षेच्या कामात व्यस्त असते.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.