Loading...
ब्रेकिंग न्यूज :
'पायवाटा' च्या माध्यमातून दुर्गम शाळांची कहाणी जगासमोर.. अथांग नातं मैत्रीच्या पलीकडचं, प्रेमाच्या अलिकडचं चांडाळ चौकडी जिल्हा परिषद शाळा कानेगावला तालुका आदर्श शाळा पुरस्कार नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रश्नावर मंत्रालयात बैठका राज्यस्तरीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेत गोकूळ शाळेच्या आदित्य रिटेचे सुयश NPS ची रक्कम GPF मध्ये वर्ग करण्यासाठी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचा पाठपुरावा तांबवे शिक्षण परिषदेत आदर्श शिक्षकांचा विशेष सत्कार जि. प. शाळा, ताथवडे येथे बाहुलीनाट्यातून गाणी-गोष्टींचे मनोरंजक सादरीकरण धर्मवीर संभाजी विद्यालय, देगाव येथे रस्ता सुरक्षा कार्यक्रम संपन्न ज्ञानदानातून राष्ट्रनिर्मिती करणाऱ्या शिक्षकांचा नारायणगावात विशेष गौरव स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धा आवर्डे केंद्रात उत्साहात संपन्न सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेला १० कोटींचा विक्रमी नफा ! मुलाच्या अभ्यासासाठी आले अन् शाळेच्या स्वच्छतेत रमले गुरुजींना 'गुरुजी' राहू द्या जिल्हा परिषद शाळांची सद्यःस्थिती : आव्हाने, वास्तव आणि भविष्याची दिशा प्रेम, मैत्री आणि स्वप्नांचा तरल जीवनपट : 'लायब्ररी फ्रेंड' यवतमाळ जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत श्री शिवाजी हायस्कूल, नेरच्या विद्यार्थिनींचे उज्ज्वल यश सातारा तालुका शिक्षक समितीच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार मातोश्री गिरीजाबाई पाटील शाळेत 'आग नियंत्रणाचे' धडे जावली तालुका आदर्श शिक्षक पुरस्काराने अस्मिता जाधव सन्मानित केंद्र शाळा निगडी खुर्दचा इंग्रजीच्या मैदानात डंका गणेशोत्सवात जि. प. शाळा, धावडशीत संस्कारांची मंगलमय रुजवण 'विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसोबतच सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत : सचिन गोपाळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवातून विद्यार्थ्यांना निसर्गसंवर्धनाचा संदेश बत्तीस शिराळ्यात नंदकुमार सागर यांचा झंझावाती प्रचारदौरा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत कोर्टीच्या चिमुकल्यांची जनजागृती गणितातील अवलिया ऋषितुल्य शिक्षक : जगदीश सुपेकर साहित्याशी जडले नाते जगणं सुंदर आणि बहरदार करणारा सदाबहार काव्यसंग्रहः जगणं होईल हिरवंगार सोलापूर जिल्ह्यातील ३६ उपक्रमशील शिक्षकांचा जिल्हास्तरीय सन्मान आयेशा नदाफ यांनी दिल्लीत केले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व मावळा जवान संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी द्वारे बलकावडेवाडी शाळेला १५ हजारांचे शैक्षणिक साहित्य ढोरेगावच्या जिल्हा परिषद शाळेची क्रीडा क्षेत्रात दमदार भरारी दाणेवाडी शाळेत माजी विद्यार्थी व शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न अतिरिक्त शिक्षक-कर्मचाऱ्यांचे रोखलेले वेतन तात्काळ सुरू करा : शेख अब्दुल रहीम जिल्हा परिषद शाळा दरूजच्या पै. सुरज जाधवने जिंकली मानाची चांदीची गदा परभणी जिल्हा परिषद एम्प्लॉईज को-ऑप क्रेडिट सोसायटीची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार जि. प शाळा मठाचीवाडीच्या मुलींचा कबड्डीच्या मैदानात डंका कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालकांची संख्या ११ करण्यास मंजुरी कराड-पाटण शिक्षक सोसायटीची ७५ वी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात छब्बीचा लाल गणपती : श्रद्धा, परंपरा आणि एकतेचा वारसा यशोगाथा गुरुजींची तरीही जिवंत मी... जळत्या जखमांतून जन्मलेला जगण्याचा प्रकाश तालुकास्तरीय लोकनृत्य स्पर्धेत निंबवडे जि. प. शाळा नं. २ प्रथम येवलेवाडीच्या लोचना धनवडे यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार शिवाजीराव देसाई विद्यालयातील विद्यार्थ्यांचा स्वच्छता उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज : प्रा. दिलीप जाधव अशोक किसन कांबळे यांच्या स्मरणार्थ नगरपालिका नं. ११ शाळेला प्रिंटर भेट
Satara,Maharashtra,India

पाटण तालुक्याचा डंका, देशपातळीवरील स्वच्छ व हरित विद्यालय रेटिंगमध्ये तीन शाळांची राष्ट्रीय स्तरावर निवड

पाटण तालुक्याचा डंका, देशपातळीवरील स्वच्छ व हरित विद्यालय रेटिंगमध्ये तीन शाळांची राष्ट्रीय स्तरावर निवड

पाटण, सातारा : केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयामार्फत आयोजित 'स्वच्छ व हरित विद्यालय रेटिंग २०२५-२६' या राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेच्या उपक्रमात सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्याने ऐतिहासिक यश संपादन केले आहे. महाराष्ट्रातून निवड झालेल्या एकूण आठ शाळांपैकी तब्बल तीन शाळा पाटण तालुक्यातील असल्याने तालुक्याच्या शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक कार्याची देशपातळीवर दखल घेण्यात आली आहे.
राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या शाळांमध्ये श्री शिवाजीराव देसाई विद्यालय, सोनवडे, न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ धावडे आणि पाटण व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल, पाटण या शाळांचा समावेश आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी दीपा बोरकर यांनी समाधान व्यक्त करत सांगितले की, हे यश शिक्षण विभाग, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे. तालुक्याचा शैक्षणिक दर्जा आणि पर्यावरणाबाबतची जागरूकता राष्ट्रीय स्तरावर सिद्ध करण्याच्या उद्देशाने अनेक महिन्यांपासून नियोजनबद्ध काम करण्यात आले. प्रत्येक शाळेत पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया, स्वच्छता आणि पर्यावरणपूरक उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले.
या ऐतिहासिक यशाबद्दल सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पर्यटन, खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्री ना. शंभूराज देसाई यांनी तिन्ही शाळांचे अभिनंदन करत ही कामगिरी संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असल्याचे सांगितले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे हे यश इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे त्यांनी नमूद केले.
पंचायत समितीचे उपसभापती विजय पवार यांनीही पाटण तालुक्याच्या या यशाचे कौतुक करत निसर्ग संवर्धन आणि स्वच्छतेबाबत तालुक्याने केलेले कार्य राष्ट्रीय स्तरावर पोहोचल्याचा आनंद व्यक्त केला. या यशाचे श्रेय त्यांनी गटशिक्षणाधिकारी दीपा बोरकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमसह संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांना दिले.
या यशामागे सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी पर्यावरण, स्वच्छता आणि आरोग्य विषयांवर दिलेले विशेष मार्गदर्शन, प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी केलेले सातत्यपूर्ण मार्गदर्शन तसेच डायटचे वरिष्ठ अधिव्याख्याता व तालुका संपर्क प्रमुख डॉ. सतीश फरांदे यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
या उल्लेखनीय यशाबद्दल पंचायत समितीचे पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, शिक्षण विभाग, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी तिन्ही शाळा व पाटण तालुका शिक्षण विभागाचे अभिनंदन केले आहे. अधिकारी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ यांच्या सामूहिक प्रयत्नांतून मिळालेले हे यश राज्यातील आणि देशातील इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.