Loading...
ब्रेकिंग न्यूज :
विद्यार्थ्यांचे यश हीच गुरुंना खरी गुरुदक्षिणा ढोरेगाव शाळेचा राज्यासाठी आदर्श उपक्रम बोरवंड बुद्रुक जि. प. शाळेने अभिनव ग्रंथदिंडीतून दिला संविधान जागर, वाचन चळवळीचा संदेश भक्ती, संस्कार आणि पर्यावरणाचा उंबरखडवा शाळेत सुंदर संगम आटपाडी जिल्हा परिषद शाळा क्रमांक ३ सह अंगणवाडीची बालदिंडी दिमाखात संपन्न विद्यार्थिनींच्या पुढाकारातून जानापुरी शाळेत गुरुपौर्णिमा संस्कारमय वातावरणात साजरी लोकनायकच्या दुसऱ्या आवृत्तीचे आज प्रकाशन तडवळे जिल्हा परिषद शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी वंचितांच्या वेदनांना शब्द देणारा युगपुरुष साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती - लेखन प्रेरणा दिन लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ... संच मान्यतेच्या नव्या निकषाने ३० हजार विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात शिष्यवृत्तीत अंश्रुली तोडकरचे देदिप्यमान यश साताऱ्याचे 'वायसीआयएस' महाविद्यालय ठरतेय विद्यार्थ्यांची खरी 'लाईफलाईन' वत्सलादेवी स्कूलमध्ये अनोख्या पद्धतीने पालक, शिक्षकांचे पाद्यपूजन करून गुरुपौर्णिमा साजरी गोकुळ-धावडे विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी 'माझा ऑक्सिजन, माझी जबाबदारी' उपक्रमांतर्गत भवानीनगर शाळेत विद्यार्थ्यांना वृक्षरोपांचे वाटप ज्ञानदिंडीच्या उत्साहात पाटखळ गटाची गुणवत्ता विकास समिती सहविचार सभा जि. प. शाळा करगणी क्रमांक २ येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी मोडनिंब पीएमश्री मुलींच्या शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी गुरूंचे आशीर्वाद आपल्यासाठी लाखमोलाचे : प्राचार्य डॉ. चंद्रकांत बोबडे बेलसरच्या कल्याणी स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी नवनियुक्त शिक्षणाधिकारी संघरत्न सरोदे यांचा हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनतर्फ सत्कार काळमवाडी जिल्हा परिषद शाळेचा पर्यावरणासाठी अनोखा संकल्प आजारी होण्यापूर्वीच आरोग्य जपण्याची गरज विनाशाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या जगाला विवेकाचा इशारा 'बाराला दहा कमी' एसआयआरसाठी शिक्षक आणखी पाच दिवस शाळेबाहेर राहणार समग्र शिक्षा अभियानात महाराष्ट्राला तुटपुंजा निधी शिक्षणमंत्री दादा भुसेंची केंद्र सरकारवर नाराजी पालकांनी विश्वासू मार्गदर्शक व्हावे : डॉ. मंजुश्री बोबडे 'वायसी'त पालक मेळावा उत्साहात सायबर व विद्यार्थी सुरक्षेबाबत पाटण पोलिसांचे ज्ञानोजीराव हायस्कुलमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आदर्श विद्यालय शिरवळ येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी संभाजीनगर आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शैक्षणिक उपक्रमांना पिंपोडे खुर्द ग्रामस्थांची सदिच्छा भेट शिष्यवृत्ती, मंथन, प्रज्ञाशोध परीक्षांमध्ये म्हसवे जि.प. शाळेची यशस्वी परंपरा एक सूर, एक ताल अभिनव संकल्पनेतून अतीत केंद्रातील विद्यार्थ्यांना एकसमान गणवेश ज्ञानदानाचा अखंड दीप - आदर्श शिक्षण नसिम सादिक तांबोळी स्त्रीविषयक जाणिवांचा धगधगता वास्तव आलेख - भूमिकन्या वाढलेल्या पटसंख्येमुळे शिक्षक कमी न करण्याची शिक्षक संघाची मागणी शिक्षक मित्र विचार मंचची उरमोडी परिक्रमा उत्साहात पदोन्नती प्राप्त शिक्षक, शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा भाटशिरपुरा शाळेत गौरव शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा दरुज शाळेत गौरव शिक्षक परिषदेच्या बहुतांश मागण्या शिक्षणमंत्र्यांकडून मान्य बेलदरे प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांकडून सीडबॉल रोपणाचा अभिनव उपक्रम एक पेड माँ के नाम अभियानाला ढोरेगावच्या जि.प. शाळेचा हरित स्पर्श विद्यानगर जि.प. प्राथमिक शाळेत नवभारत साक्षरता ग्रंथदिंडी उत्साहात गुरुपौर्णिमा अज्ञानातून ज्ञानप्रकाशाकडे नेणाऱ्या गुरुतत्त्वाचा उत्सव गुरु दक्षिणेच्या पलीकडील गुरुत्व अभिनव विद्याविहार प्राथमिक शाळेच्या पाच विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश जतपुरा शाळेचे अमोल आढळकर यांचा स्टार प्रवाहकडून विशेष गौरव उज्ज्वल भविष्यासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नाही : डॉ. चंद्रकांत पाटील आरटीई कायद्यात दुरुस्ती करून सेवेतील शिक्षकांना टीईटी मधून कायमस्वरूपी सूट द्यावी : शेख अब्दुल रहीम चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत देवनांद्रा शाळेची यशाची परंपरा कायम
A.Nagar,Maharashtra,India

अहिल्यानगरात 11 शिक्षक निलंबित,

अपंगत्वाचे प्रमाण आढळले कमी, शिक्षण क्षेत्रात खळबळ
अहिल्यानगरात 11 शिक्षक निलंबित,

अहिल्यानगर : जिल्हा सरकारी रुग्णालयाने केलेल्या पडताळणीत अपंगत्वाचे प्रमाण ४० टक्क्यांपेक्षा कमी आढळलेल्या जिल्हा परिषदेच्या १५ कर्मचाऱ्यांवर मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.

यामध्ये ११ शिक्षक, ३ शिपाई (परिचर) व १ आरोग्य सेवकाचा समावेश आहे. यातील ८ जणांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेशही त्यांनी संबंधित गटविकास अधिकाऱ्यांना त्यांनी दिले आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात अपंगत्वाच्या बनावट प्रमाणपत्राच्या आधारे नोकऱ्या मिळवण्याचे विविध विभागातील प्रकरणे गाजत आहेत. याच साखळीतील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. इतर विभाग कोणती भूमिका घेतात याकडे सरकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. काही वर्षांपूर्वी अपंगत्वाच्या बनावट प्रमाणपत्राचा आधारे बदली अथवा सरकारी सवलतींचा गैरफायदा घेणाऱ्या तब्बल ७८ प्राथमिक शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. हे प्रकरण अद्यापि न्यायालयीन प्रक्रियेत आहे. आता आणखी १५ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

राज्य सरकारने सर्व सरकारी विभागातील अपंग कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय पडताळणीचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेने तालुकानिहाय शिबिरे घेऊन अपंग कर्मचाऱ्यांची वैद्यकीय पडताळणी केली. जिल्हा परिषदेमध्ये एकूण ५४५ विविध प्रकारचे अपंग कर्मचारी आहेत. त्यामध्ये सकृतदर्शनी १८० कर्मचारी अपंग असल्याचे आढळले. उर्वरित कर्मचाऱ्यांची पडताळणी जिल्हा सरकारी रुग्णालयामार्फत करण्यात आली. त्यामध्ये १८ कर्मचाऱ्यांचे अपंगत्व प्रमाणपत्र ४० टक्क्यापेक्षा कमी आढळले. तसा अहवाल जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सकांनी जिल्हा परिषदेला पाठवला. १९ कर्मचारी वैद्यकीय पडताळणीसाठी गैरहजर राहिले होते. अशा सर्व कर्मचाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नोटीस पाठवून खुलासा मागवला होता. यातील १५ जणांचा खुलासा समाधानकारक नसल्याने त्यांच्यावर निलंबनाच्या कारवाईचे आदेश आज देण्यात आले आहेत. यातील एकाचा खुलासा मान्य करण्यात आला आहे तर एकाची पुन्हा पडताळणी करण्यात आले आहे. एका खुलाशाची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे. याशिवाय पडताळणीसाठी गैरहजर राहिलेल्या १९ कर्मचाऱ्यांची अपंग विभागाच्या उपसंचालक कार्यालयामार्फत पडताळणी केली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

निलंबन कारवाई झालेले कर्मचारी

१) समाधान कचरू घुगे (आरोग्य सेवक, कर्णबधिर, कायदेशीर कारवाई), २) सुनील दत्तात्रय वाघ (मुख्याध्यापक, कर्णबधिर), ३) प्रभाकर संतु चोखंडे (परिचर, अस्थिभंग), ४) दत्तात्रय आनंदराव फपाळे (मुख्याध्यापक, कर्णबधिर), ५) वामन जगन्नाथ घाटपांडे (परिचर अस्थिव्यंग, कायदेशीर कारवाई), ६) अतुल तुकाराम सातपुते (परिचर, अस्थिव्यंग), ७) मंदा तुकाराम शिंदे (शिक्षक, कर्णबधिर, कायदेशीर कारवाई), ८) संगीता विजय कदम (शिक्षक, अस्थिभंग), ९) संजयकुमार विश्वनाथ बडे (शिक्षक, अस्थिभंग), १०) वर्षा त्र्यंबक अकोलकर (शिक्षक, कर्णबधिर, कायदेशीर कारवाई), ११) पुष्पलता दिनकर खेडकर (शिक्षक, कर्णबधिर, कायदेशीर कारवाई), १२) सतीश मोहन लगड (शिक्षक, अस्थिव्यंग), १३) सागर रेवजी मोरे (शिक्षक, कर्णबधिर, कायदेशीर कारवाई), १४) विनायककुमार मगन वाडेकर (शिक्षक, अल्पदृष्टी, कायदेशीर कारवाई) व १५) संतोष हिरामण लष्करे (शिक्षक, कर्णबधिर, कायदेशीर कारवाई )


आणखी १९ कर्मचाऱ्यांची तपासणी

जिल्हा परिषदेच्या ज्या कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीमध्ये ४० टक्क्यांपेक्षा कमी अपंगत्वाचे प्रमाणपत्र जिल्हा शल्यचिकित्सकांकडून प्राप्त झाले व त्यांनी नोकरीसाठी त्याचा लाभ घेतला अशा कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत तसेच ज्या कर्मचाऱ्यांनी बदली किंवा इतर सरकारी सवलतींचा फायदा घेतला आहे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय इतर १९ जणांची पडताळणी उपसंचालक कार्यालयामार्फत केली जाणार आहे. 

आनंद भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अहिल्यानगर.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.