Satara,Maharashtra,India
अजित पवारांसमवेत विदीप जाधव यांचा मृत्यू, विदीप हे शिक्षक समितीचे नेते संजय जाधव यांचे पुतणे

सातारा, फलटण : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामतीत अपघात होऊन एकूण सहा जणांचा मृत्यू झाला. त्यात मुंबई पोलीस दलातील विदीप दिलीप जाधव (वय 37) यांचाही समावेश आहे. विदीप हे तरडगाव ता. फलटण जि. सातारा येथील शिक्षक समितीचे नेते संजय जाधव यांचे पुतणे आहेत.
आज सकाळी पावणे नऊच्या सुमारास मुंबई येथून निघाल्यावर बारामती विमानतळावर अजित पवार असलेल्या विमानाचे क्रॅश लँडिंग झाले. स्फोट होऊन अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाला. त्यात मुंबई पोलीस दलात असलेल्या. विदीप जाधव यांचाही समावेश आहे विदीप हे शिक्षक समितीचे नेते संजय जाधव यांचे पुतणे आहेत. ते 2009 मध्ये पोलीस खात्यात भरती झाले. 2014 ते 2019 या कालावधीत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अंगरक्षक होते. तर 2019 पासून आजपर्यंत ते अजित पवार यांचे अंगरक्षक राहिलेले आहेत.
0 कमेंट
कमेंट करा
तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.