Loading...
ब्रेकिंग न्यूज :
'पायवाटा' च्या माध्यमातून दुर्गम शाळांची कहाणी जगासमोर.. अथांग नातं मैत्रीच्या पलीकडचं, प्रेमाच्या अलिकडचं चांडाळ चौकडी जिल्हा परिषद शाळा कानेगावला तालुका आदर्श शाळा पुरस्कार नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रश्नावर मंत्रालयात बैठका राज्यस्तरीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेत गोकूळ शाळेच्या आदित्य रिटेचे सुयश NPS ची रक्कम GPF मध्ये वर्ग करण्यासाठी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचा पाठपुरावा तांबवे शिक्षण परिषदेत आदर्श शिक्षकांचा विशेष सत्कार जि. प. शाळा, ताथवडे येथे बाहुलीनाट्यातून गाणी-गोष्टींचे मनोरंजक सादरीकरण धर्मवीर संभाजी विद्यालय, देगाव येथे रस्ता सुरक्षा कार्यक्रम संपन्न ज्ञानदानातून राष्ट्रनिर्मिती करणाऱ्या शिक्षकांचा नारायणगावात विशेष गौरव स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धा आवर्डे केंद्रात उत्साहात संपन्न सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेला १० कोटींचा विक्रमी नफा ! मुलाच्या अभ्यासासाठी आले अन् शाळेच्या स्वच्छतेत रमले गुरुजींना 'गुरुजी' राहू द्या जिल्हा परिषद शाळांची सद्यःस्थिती : आव्हाने, वास्तव आणि भविष्याची दिशा प्रेम, मैत्री आणि स्वप्नांचा तरल जीवनपट : 'लायब्ररी फ्रेंड' यवतमाळ जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत श्री शिवाजी हायस्कूल, नेरच्या विद्यार्थिनींचे उज्ज्वल यश सातारा तालुका शिक्षक समितीच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार मातोश्री गिरीजाबाई पाटील शाळेत 'आग नियंत्रणाचे' धडे जावली तालुका आदर्श शिक्षक पुरस्काराने अस्मिता जाधव सन्मानित केंद्र शाळा निगडी खुर्दचा इंग्रजीच्या मैदानात डंका गणेशोत्सवात जि. प. शाळा, धावडशीत संस्कारांची मंगलमय रुजवण 'विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसोबतच सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत : सचिन गोपाळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवातून विद्यार्थ्यांना निसर्गसंवर्धनाचा संदेश बत्तीस शिराळ्यात नंदकुमार सागर यांचा झंझावाती प्रचारदौरा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत कोर्टीच्या चिमुकल्यांची जनजागृती गणितातील अवलिया ऋषितुल्य शिक्षक : जगदीश सुपेकर साहित्याशी जडले नाते जगणं सुंदर आणि बहरदार करणारा सदाबहार काव्यसंग्रहः जगणं होईल हिरवंगार सोलापूर जिल्ह्यातील ३६ उपक्रमशील शिक्षकांचा जिल्हास्तरीय सन्मान आयेशा नदाफ यांनी दिल्लीत केले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व मावळा जवान संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी द्वारे बलकावडेवाडी शाळेला १५ हजारांचे शैक्षणिक साहित्य ढोरेगावच्या जिल्हा परिषद शाळेची क्रीडा क्षेत्रात दमदार भरारी दाणेवाडी शाळेत माजी विद्यार्थी व शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न अतिरिक्त शिक्षक-कर्मचाऱ्यांचे रोखलेले वेतन तात्काळ सुरू करा : शेख अब्दुल रहीम जिल्हा परिषद शाळा दरूजच्या पै. सुरज जाधवने जिंकली मानाची चांदीची गदा परभणी जिल्हा परिषद एम्प्लॉईज को-ऑप क्रेडिट सोसायटीची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार जि. प शाळा मठाचीवाडीच्या मुलींचा कबड्डीच्या मैदानात डंका कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालकांची संख्या ११ करण्यास मंजुरी कराड-पाटण शिक्षक सोसायटीची ७५ वी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात छब्बीचा लाल गणपती : श्रद्धा, परंपरा आणि एकतेचा वारसा यशोगाथा गुरुजींची तरीही जिवंत मी... जळत्या जखमांतून जन्मलेला जगण्याचा प्रकाश तालुकास्तरीय लोकनृत्य स्पर्धेत निंबवडे जि. प. शाळा नं. २ प्रथम येवलेवाडीच्या लोचना धनवडे यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार शिवाजीराव देसाई विद्यालयातील विद्यार्थ्यांचा स्वच्छता उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज : प्रा. दिलीप जाधव अशोक किसन कांबळे यांच्या स्मरणार्थ नगरपालिका नं. ११ शाळेला प्रिंटर भेट
Satara,Maharashtra,India

जि. प. शिक्षकाचा मारहाणीत मृत्यू

पोलीस व वाळूमाफिया यांच्यावर नातेवाईकांचा आरोप
जि. प. शिक्षकाचा मारहाणीत  मृत्यू

छ. संभाजीनगर, खुलताबाद : जागतिक कीर्तीचे पर्यटन स्थळ असलेल्या वेरूळ लेणी परिसरात बुधवारी मध्यरात्री एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना घडली आहे. रात्रीच्या वेळी एका घराची झाडाझडती घेणाऱ्या पोलिसांना आणि त्यांच्यासोबतच्या व्यक्तींना "तुम्ही कोण आहात?" म्हणून केवळ चौकशी करणाऱ्या एका स्थानिक जिल्हा परिषद शिक्षकाला पोलीस आणि त्यांच्या सोबतच्या व्यक्तींनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

या मारहाणीतच शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप मयताच्या पत्नी व मुलींनी केला आहे. या अमानुष प्रकाराच्या निषेधार्थ आणि दोषी पोलिसांना निलंबित करून अटकेच्या मागणीसाठी गुरुवारी दुपारी वेरूळ येथील भोसले चौकात हजारो नागरिकांनी मृतदेह रस्त्यावर ठेवून तब्बल ४ तास 'रास्ता रोको' आंदोलन केले.

पोलिसांकडून आणि प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मयत सुरेश रूपचंद बोरसे (वय ५४, रा. वेरूळ) हे स्थानिक जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते, तसेच ते शिक्षक संघाचे जिल्हा पदाधिकारी देखील होते. बुधवार, १० जून रोजी रात्री ११:३० वाजता वैजापूर पोलीस ठाण्याचे एक पोलीस उपनिरीक्षक, एक पोलीस अंमलदार आणि काही खाजगी व्यक्ती दोन वाहनांमधून एका फरार आरोपीच्या शोधासाठी वेरूळमध्ये आले होते. रात्री केशव बाबाच्या मठासमोरील एका घरात हे पोलीस संशयास्पद रित्या तपास करत असतानाच शिक्षक सुरेश बोरसे हे आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांच्या लहान मुलांना आईस्क्रीम आणण्यासाठी बाजारात निघाले होते. मठासमोर मोठा गोंधळ सुरू असल्याचे पाहून बोरसे यांनी "तुम्ही कोण आहात आणि मध्यरात्री काय करताय?" अशी सहज विचारपूस केली.

शिक्षकाने विचारलेला प्रश्न ऐकताच वैजापूरच्या पोलीस उपनिरीक्षकाने आणि त्यांच्यासोबत आलेल्या खाजगी गुंडांनी सुरेश बोरसे यांना "तू कोण विचारणारा?" असे म्हणत शिवीगाळ व गंभीर मारहाण करण्यास सुरुवात केली. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे बोरसे जागीच कोसळले. त्यांना रात्री तातडीने आधी वेरूळ प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि नंतर गंभीर अवस्थेत छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, मध्यरात्री डॉक्टरांनी तपासून त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. मयताच्या पत्नी अनिता बोरसे, मुलगी प्रेरणा आणि कादंबरी बोरसे यांनी पोलिसांच्या थेट मारहाणीमुळेच त्यांच्या पतीचा जीव गेल्याचा अधिकृत आरोप करत पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची आग्रही मागणी लावून धरली.

मंगळवारी दुपारी शवविच्छेदनानंतर सुरेश बोरसे यांचा मृतदेह घेऊन आलेली रुग्णवाहिका नातेवाईकांनी आणि शिक्षक संघटनेच्या हजारो कार्यकर्त्यांनी दुपारी ३ वाजेच्या सुमारास थेट वेरूळच्या भोसले चौकात (धुळे-सोलापूर महामार्ग) आडवी लावून रस्ता रोखून धरला. बघता बघता तेथे हजारो ग्रामस्थांचा जनसमुदाय गोळा झाला. आंदोलनाची भीषणता पाहून अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांनी खुलताबाद पोलीस ठाण्यात दुपारी ५ वाजता नातेवाईकांशी चर्चा करून 'आठ दिवसांच्या आत अंतर्गत चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करू' असे कायदेशीर आश्वासन दिले. मात्र, तात्काळ निलंबन झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.

दरम्यान,

वाळू माफियांच्या अंतर्गत वादात मध्यस्थी करणे एका जिल्हा परिषद शिक्षकाच्या जीवाशी आले असल्याचीही परिसरात चर्चा आहे.  मयत सुरेश बोरसे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा सरचिटणीस अनिता बोरसे यांचे पती होते. या घटनेमुळे संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्हा हादरला असून परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

वेरूळ गावात वाळू माफियांच्या दोन गटांत अंतर्गत वाद सुरू होता. या वादादरम्यान जिल्हा परिषद शिक्षक असलेले सुरेश बोरसे तेथे पोहोचले आणि त्यांनी नेमका काय प्रकार सुरू आहे, याची विचारपूस केली. केवळ याच गोष्टीचा राग मनात धरून १० ते १२ जणांच्या वाळू माफियांच्या टोळीने बोरसे यांच्यावर अचानक प्राणघातक हल्ला चढवला. किरकोळ बाचाबाचीचे रूपांतर मोठ्या वादात झाले आणि माफियांनी केलेल्या बेदम मारहाणीत सुरेश बोरसे यांचा जागीच मृत्यू झाला, अशी घटनास्थळी चर्चा होती. 


आ. अंबादास दानवे यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे

रस्ता रोकोमुळे वेरूळ लेणी पाहण्यासाठी आलेले शेकडो विदेशी पर्यटक आणि देशातील भाविकांची वाहने रस्त्यावरच अडकली. शेवटी सायंकाळी ६:३० वाजता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे आणि उद्धवसेनेचे तालुकाप्रमुख राजू वरकड यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वरिष्ठ पोलीस प्रशासनाशी आणि आंदोलकांशी दीर्घ चर्चा करून दोषी पोलिसांवर आजच रात्री गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. या ठोस आश्वासनानंतर सायंकाळी ७ वाजता तब्बल ४ तासांनी हे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. यानंतर अत्यंत शोकाकुल वातावरणात रात्री उशिरा मयत सुरेश बोरसे यांच्या पार्थिवावर वेरूळ येथील सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अनुचित प्रकार घडू नये म्हणून उपविभागीय अधिकारी अपराजिता अग्निहोत्री आणि पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.