Hingoli,Maharashtra,India
जि.प.च्या 2 शिक्षकांचा भीषण अपघातात मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात पूर्ण रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण झाले आहेत या रस्त्याने सुसाट वेगाने वाहणाऱ्या वाहनामुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. सेनगाव शहाराजवळ भरधाव पिक अपने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन शिक्षकांचा मृत्यू झाल्याची घटना रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
दोन्ही शिक्षक सेनगाव तालुक्यातील वरुड चक्रपाण या गावातील रहिवाशी असून या घटनेमुळे वरुड चक्रपान गावावर शोककळा पसरली आहे. सेनगाव तालुक्यातील वरुड चक्रपान येथील शिक्षक संतोष देसाई व गजानन पत्की हे दोघे शनिवारी जनगणनेचे कर्तव्य पार पाडून रिसोड येथे पाहुण्याकडे भेटण्यासाठी गेले होते त्या ठिकाणी पाहुण्यांना भेटून ते दुचाकी वाहनाने परत सेनगाव कडे निघाले होते.
रात्री अकरा वाचण्याच्या सुमारास तुमची मोटरसायकल सेनगाव शहराजवळ आली असताना भरधाव वेगाने येणाऱ्या पिकप चालकाने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात मोटरसायकल वरील दोघेही रस्त्यावर कोसळून पडले आणि गंभीर जखमी झाले होते.
सदरील अपघाताची माहिती मिळताच सेनगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक मस्के, उपनिरीक्षक नागनाथ पाटील रविकिरण खंदारे, जमदार, परमेश्वर क्षीरसागर, अशोक धामणे, यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी तातडीने संतोष देसाई व गजानन पत्की यांना सेनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांच्या डोक्याला गंभीर स्वरूपाचा मार लागल्यामुळे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच वरून चक्रपान येथील गावकऱ्यांनी सेनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती. दोघांच्याही मृतदेहावर सेनगावच्या ग्रामीण रुग्णालयात उतरणीय तपासणी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेमुळे वरुड चक्रपान गावावर शोककळा पसरली आहे. अपघातानंतर पिकअप चालक पिकअप घटनास्थळी सोडून पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
0 कमेंट
कमेंट करा
तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.