Satara,Maharashtra,India
हायकोर्टाचा दणका, पुणे शिक्षण उपसंचालकाची उचलबांगडी
पेन्शन अडवणे पडलं महागात

पुणे : मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा धक्का देत पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांना तात्काळ पदावरून हटवण्याचे आदेश दिले आहेत. एका निवृत्त प्राध्यापकाच्या पेन्शन प्रकरणात मोरे यांनी 'उघड बेकायदेशीरपणा' आणि मनमानी कारभार केल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला आहे.
न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने मोरे यांच्यावर कडक पाळत ठेवण्याचे आणि त्यांच्या जागी सक्षम अधिकारी नेमण्याचे निर्देश शिक्षण विभागाला दिले आहेत.
0 कमेंट
कमेंट करा
तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.