Loading...
ब्रेकिंग न्यूज :
विद्यार्थ्यांचे यश हीच गुरुंना खरी गुरुदक्षिणा ढोरेगाव शाळेचा राज्यासाठी आदर्श उपक्रम बोरवंड बुद्रुक जि. प. शाळेने अभिनव ग्रंथदिंडीतून दिला संविधान जागर, वाचन चळवळीचा संदेश भक्ती, संस्कार आणि पर्यावरणाचा उंबरखडवा शाळेत सुंदर संगम आटपाडी जिल्हा परिषद शाळा क्रमांक ३ सह अंगणवाडीची बालदिंडी दिमाखात संपन्न विद्यार्थिनींच्या पुढाकारातून जानापुरी शाळेत गुरुपौर्णिमा संस्कारमय वातावरणात साजरी लोकनायकच्या दुसऱ्या आवृत्तीचे आज प्रकाशन तडवळे जिल्हा परिषद शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी वंचितांच्या वेदनांना शब्द देणारा युगपुरुष साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती - लेखन प्रेरणा दिन लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ... संच मान्यतेच्या नव्या निकषाने ३० हजार विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात शिष्यवृत्तीत अंश्रुली तोडकरचे देदिप्यमान यश साताऱ्याचे 'वायसीआयएस' महाविद्यालय ठरतेय विद्यार्थ्यांची खरी 'लाईफलाईन' वत्सलादेवी स्कूलमध्ये अनोख्या पद्धतीने पालक, शिक्षकांचे पाद्यपूजन करून गुरुपौर्णिमा साजरी गोकुळ-धावडे विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी 'माझा ऑक्सिजन, माझी जबाबदारी' उपक्रमांतर्गत भवानीनगर शाळेत विद्यार्थ्यांना वृक्षरोपांचे वाटप ज्ञानदिंडीच्या उत्साहात पाटखळ गटाची गुणवत्ता विकास समिती सहविचार सभा जि. प. शाळा करगणी क्रमांक २ येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी मोडनिंब पीएमश्री मुलींच्या शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी गुरूंचे आशीर्वाद आपल्यासाठी लाखमोलाचे : प्राचार्य डॉ. चंद्रकांत बोबडे बेलसरच्या कल्याणी स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी नवनियुक्त शिक्षणाधिकारी संघरत्न सरोदे यांचा हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनतर्फ सत्कार काळमवाडी जिल्हा परिषद शाळेचा पर्यावरणासाठी अनोखा संकल्प आजारी होण्यापूर्वीच आरोग्य जपण्याची गरज विनाशाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या जगाला विवेकाचा इशारा 'बाराला दहा कमी' एसआयआरसाठी शिक्षक आणखी पाच दिवस शाळेबाहेर राहणार समग्र शिक्षा अभियानात महाराष्ट्राला तुटपुंजा निधी शिक्षणमंत्री दादा भुसेंची केंद्र सरकारवर नाराजी पालकांनी विश्वासू मार्गदर्शक व्हावे : डॉ. मंजुश्री बोबडे 'वायसी'त पालक मेळावा उत्साहात सायबर व विद्यार्थी सुरक्षेबाबत पाटण पोलिसांचे ज्ञानोजीराव हायस्कुलमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आदर्श विद्यालय शिरवळ येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी संभाजीनगर आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शैक्षणिक उपक्रमांना पिंपोडे खुर्द ग्रामस्थांची सदिच्छा भेट शिष्यवृत्ती, मंथन, प्रज्ञाशोध परीक्षांमध्ये म्हसवे जि.प. शाळेची यशस्वी परंपरा एक सूर, एक ताल अभिनव संकल्पनेतून अतीत केंद्रातील विद्यार्थ्यांना एकसमान गणवेश ज्ञानदानाचा अखंड दीप - आदर्श शिक्षण नसिम सादिक तांबोळी स्त्रीविषयक जाणिवांचा धगधगता वास्तव आलेख - भूमिकन्या वाढलेल्या पटसंख्येमुळे शिक्षक कमी न करण्याची शिक्षक संघाची मागणी शिक्षक मित्र विचार मंचची उरमोडी परिक्रमा उत्साहात पदोन्नती प्राप्त शिक्षक, शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा भाटशिरपुरा शाळेत गौरव शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा दरुज शाळेत गौरव शिक्षक परिषदेच्या बहुतांश मागण्या शिक्षणमंत्र्यांकडून मान्य बेलदरे प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांकडून सीडबॉल रोपणाचा अभिनव उपक्रम एक पेड माँ के नाम अभियानाला ढोरेगावच्या जि.प. शाळेचा हरित स्पर्श विद्यानगर जि.प. प्राथमिक शाळेत नवभारत साक्षरता ग्रंथदिंडी उत्साहात गुरुपौर्णिमा अज्ञानातून ज्ञानप्रकाशाकडे नेणाऱ्या गुरुतत्त्वाचा उत्सव गुरु दक्षिणेच्या पलीकडील गुरुत्व अभिनव विद्याविहार प्राथमिक शाळेच्या पाच विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश जतपुरा शाळेचे अमोल आढळकर यांचा स्टार प्रवाहकडून विशेष गौरव उज्ज्वल भविष्यासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नाही : डॉ. चंद्रकांत पाटील आरटीई कायद्यात दुरुस्ती करून सेवेतील शिक्षकांना टीईटी मधून कायमस्वरूपी सूट द्यावी : शेख अब्दुल रहीम चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत देवनांद्रा शाळेची यशाची परंपरा कायम
Satara,Maharashtra,India

शिक्षकांच्या उन्हाळी सुट्टीवर संक्रात ?

जनगणनेच्या कामामुळे लोड वाढला
शिक्षकांच्या उन्हाळी सुट्टीवर संक्रात ?

पुणे : उन्हाळ्याची सुट्टी साजरी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या शिक्षकांना यंदा सुट्टीमध्ये जनगणनेच्या कामाला जुंपले जाणार आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गुरुजींना जास्तीचं काम लागणार आहे.

त्यामुळे शिक्षकांच्या आनंदावर विरजण पडणार आहे.

जनगणनेसाठी नियुक्त केलेल्या शिक्षकांना १६ मे ते १५ जून या कालावधीमध्ये मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश शिक्षण अधिकाऱ्यांनी काढले आहेत. त्यामुळे आता या शिक्षकांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत, असे वृत्त सरकारनामाने दिले आहे.

जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी संजय नाईकडे आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कोरेकर यांनी स्वतंत्रपणे आदेश काढून जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना आदेश काढल्यामुळे शिक्षक वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

गेल्या दोन वर्षांत लोकसभा, विधानसभा, नगरपरिषदा, जिल्हा परिषदांच्या निवडणूक कामकाजात गुरफटलेल्या शिक्षकांना आपली सरकारी कामातून सुटका झाल्याचे वाटले असताना पुन्हा एकदा येऊ घातलेल्या जनगणनेच्या कामकाजाकडे त्यांना डोळ्यात तेल घालून काम करण्यासाठी सज्ज राहावे लागणार आहे.

१ मेनंतर विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी असली तरी शिक्षकांना मात्र जनगणनेच्या कामासाठी प्रशिक्षणाचे धडे गिरवल्यानंतर १६ मे पासून ते १५ जूनपर्यंत जनगणनेच्या कामकाजासाठी शिक्षकांना आपले मुख्यालय सोडता येणार नाही.

बाहेर गावच्या शिक्षकांनी मूळगावी मे महिन्यात केलेल्या नियोजनावर पाणी पडणार असून, उन्हाळ्याच्या सुट्टीतील पर्यटन, देवदर्शन, लग्नकार्य आदी कार्यक्रमावर गदा येणार असल्याने शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

शिक्षणाधिकारी संजय नाईकडे म्हणाले, राष्ट्रीय जनगणनेच्या कामासाठी जिल्ह्यातील शिक्षकांच्या नेमणुका केल्या आहेत. या कामासाठी शिक्षकांना १६ मे ते १५ जून या कालावधीमध्ये त्यांच्या मुख्यालयात उपस्थित राहावे लागेल. त्यांची सुट्टी रद्द करण्यात आली आहे.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.