Loading...
ब्रेकिंग न्यूज :
'पायवाटा' च्या माध्यमातून दुर्गम शाळांची कहाणी जगासमोर.. अथांग नातं मैत्रीच्या पलीकडचं, प्रेमाच्या अलिकडचं चांडाळ चौकडी जिल्हा परिषद शाळा कानेगावला तालुका आदर्श शाळा पुरस्कार नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रश्नावर मंत्रालयात बैठका राज्यस्तरीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेत गोकूळ शाळेच्या आदित्य रिटेचे सुयश NPS ची रक्कम GPF मध्ये वर्ग करण्यासाठी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचा पाठपुरावा तांबवे शिक्षण परिषदेत आदर्श शिक्षकांचा विशेष सत्कार जि. प. शाळा, ताथवडे येथे बाहुलीनाट्यातून गाणी-गोष्टींचे मनोरंजक सादरीकरण धर्मवीर संभाजी विद्यालय, देगाव येथे रस्ता सुरक्षा कार्यक्रम संपन्न ज्ञानदानातून राष्ट्रनिर्मिती करणाऱ्या शिक्षकांचा नारायणगावात विशेष गौरव स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धा आवर्डे केंद्रात उत्साहात संपन्न सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेला १० कोटींचा विक्रमी नफा ! मुलाच्या अभ्यासासाठी आले अन् शाळेच्या स्वच्छतेत रमले गुरुजींना 'गुरुजी' राहू द्या जिल्हा परिषद शाळांची सद्यःस्थिती : आव्हाने, वास्तव आणि भविष्याची दिशा प्रेम, मैत्री आणि स्वप्नांचा तरल जीवनपट : 'लायब्ररी फ्रेंड' यवतमाळ जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत श्री शिवाजी हायस्कूल, नेरच्या विद्यार्थिनींचे उज्ज्वल यश सातारा तालुका शिक्षक समितीच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार मातोश्री गिरीजाबाई पाटील शाळेत 'आग नियंत्रणाचे' धडे जावली तालुका आदर्श शिक्षक पुरस्काराने अस्मिता जाधव सन्मानित केंद्र शाळा निगडी खुर्दचा इंग्रजीच्या मैदानात डंका गणेशोत्सवात जि. प. शाळा, धावडशीत संस्कारांची मंगलमय रुजवण 'विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसोबतच सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत : सचिन गोपाळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवातून विद्यार्थ्यांना निसर्गसंवर्धनाचा संदेश बत्तीस शिराळ्यात नंदकुमार सागर यांचा झंझावाती प्रचारदौरा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत कोर्टीच्या चिमुकल्यांची जनजागृती गणितातील अवलिया ऋषितुल्य शिक्षक : जगदीश सुपेकर साहित्याशी जडले नाते जगणं सुंदर आणि बहरदार करणारा सदाबहार काव्यसंग्रहः जगणं होईल हिरवंगार सोलापूर जिल्ह्यातील ३६ उपक्रमशील शिक्षकांचा जिल्हास्तरीय सन्मान आयेशा नदाफ यांनी दिल्लीत केले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व मावळा जवान संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी द्वारे बलकावडेवाडी शाळेला १५ हजारांचे शैक्षणिक साहित्य ढोरेगावच्या जिल्हा परिषद शाळेची क्रीडा क्षेत्रात दमदार भरारी दाणेवाडी शाळेत माजी विद्यार्थी व शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न अतिरिक्त शिक्षक-कर्मचाऱ्यांचे रोखलेले वेतन तात्काळ सुरू करा : शेख अब्दुल रहीम जिल्हा परिषद शाळा दरूजच्या पै. सुरज जाधवने जिंकली मानाची चांदीची गदा परभणी जिल्हा परिषद एम्प्लॉईज को-ऑप क्रेडिट सोसायटीची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार जि. प शाळा मठाचीवाडीच्या मुलींचा कबड्डीच्या मैदानात डंका कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालकांची संख्या ११ करण्यास मंजुरी कराड-पाटण शिक्षक सोसायटीची ७५ वी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात छब्बीचा लाल गणपती : श्रद्धा, परंपरा आणि एकतेचा वारसा यशोगाथा गुरुजींची तरीही जिवंत मी... जळत्या जखमांतून जन्मलेला जगण्याचा प्रकाश तालुकास्तरीय लोकनृत्य स्पर्धेत निंबवडे जि. प. शाळा नं. २ प्रथम येवलेवाडीच्या लोचना धनवडे यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार शिवाजीराव देसाई विद्यालयातील विद्यार्थ्यांचा स्वच्छता उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज : प्रा. दिलीप जाधव अशोक किसन कांबळे यांच्या स्मरणार्थ नगरपालिका नं. ११ शाळेला प्रिंटर भेट
Satara,Maharashtra,India

शिक्षणाधिकाऱ्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले, रुग्णालयात दाखल नांदेड शिक्षक आत्महत्या प्रकरण

शिक्षणाधिकाऱ्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले, रुग्णालयात दाखल नांदेड शिक्षक आत्महत्या प्रकरण

नांदेड : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून शिक्षक सुनील मोरे यांनी दोन चिमुकल्यांसह केलेल्या आत्महत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. या गुन्ह्याच्या तपासासाठी गेल्या दोन दिवसांपासून उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांचे पथक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात धडकत आहे.

मात्र, शिक्षणाधिकारी अचानक रुग्णालयात दाखल झाल्याने व इतर अधिकारी गायब असल्याने पोलिसांना सलग दुसऱ्या दिवशीही रिकाम्या हाताने परतावे लागले. पोलिसांच्या या फेऱ्यांमुळे झेडपी शिक्षण विभागात प्रचंड घबराट पसरली असल्याचे पुढारीच्या वृत्तात म्हटले आहे.

हदगाव तालुक्यातील झेडपी शिक्षक सुनील मोरे यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून १७ जुलै रोजी दोन मुलांची हत्या करून स्वतः कारसह गोदावरी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेनंतर नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात हदगावच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोरे यांनी आत्महत्येपूर्वी लॅपटॉप आणि मोबाइलमध्ये अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराचे आणि त्रासाचे अनेक पुरावे ठेवले आहेत. मोरे यांनी काही महिन्यांपूर्वीच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाबाबत शिक्षणाधिकारी व इतर वरिष्ठांकडे लेखी तक्रारी केल्या होत्या. मात्र, प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने ते तीव्र तणावाखाली होते. त्यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पोलिसांनी आता तपासाचा मोर्चा थेट झेडपी शिक्षण विभागाकडे वळवला आहे.

सलग दुसऱ्या दिवशी अधिकारी गायब

उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सोमवारी (दि. २०) जिल्हा परिषदेत धडक देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. मोरे यांच्या तक्रारींवर काय कारवाई झाली, याची माहिती पोलिसांनी मागितली. त्यावेळी प्रशासनाने मंगळवारी माहिती देण्याचे आश्वासन दिले होते.

त्यानुसार मंगळवारी (दि. २१) पोलिस पथक पुन्हा शिक्षण विभागात पोहोचले. मात्र, प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांना सकाळी अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्या रुग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले. इतरही अनेक अधिकारी गैरहजर असल्याने पोलिसांना माहितीविनाच माघारी फिरावे लागले.

प्रशांत शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणाले, लवकरच आवश्यक माहिती हस्तगत करू. आम्ही दोन दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात तपासासाठी जात आहोत. अद्याप अधिकृत कागदपत्रे मिळालेली नाहीत. प्राथमिक शिक्षणाधिकारी आजारी असल्याचे सांगण्यात आले. लवकरच आवश्यक ती माहिती हस्तगत केली जाईल. तसेच, मृत शिक्षक सुनील मोरे यांच्या मोबाइल आणि लॅपटॉपचा तांत्रिक तपास सुरू असून, पुराव्यांचे विश्लेषण केले जात आहे.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.