Loading...
ब्रेकिंग न्यूज :
'पायवाटा' च्या माध्यमातून दुर्गम शाळांची कहाणी जगासमोर.. अथांग नातं मैत्रीच्या पलीकडचं, प्रेमाच्या अलिकडचं चांडाळ चौकडी जिल्हा परिषद शाळा कानेगावला तालुका आदर्श शाळा पुरस्कार नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रश्नावर मंत्रालयात बैठका राज्यस्तरीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेत गोकूळ शाळेच्या आदित्य रिटेचे सुयश NPS ची रक्कम GPF मध्ये वर्ग करण्यासाठी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचा पाठपुरावा तांबवे शिक्षण परिषदेत आदर्श शिक्षकांचा विशेष सत्कार जि. प. शाळा, ताथवडे येथे बाहुलीनाट्यातून गाणी-गोष्टींचे मनोरंजक सादरीकरण धर्मवीर संभाजी विद्यालय, देगाव येथे रस्ता सुरक्षा कार्यक्रम संपन्न ज्ञानदानातून राष्ट्रनिर्मिती करणाऱ्या शिक्षकांचा नारायणगावात विशेष गौरव स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धा आवर्डे केंद्रात उत्साहात संपन्न सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेला १० कोटींचा विक्रमी नफा ! मुलाच्या अभ्यासासाठी आले अन् शाळेच्या स्वच्छतेत रमले गुरुजींना 'गुरुजी' राहू द्या जिल्हा परिषद शाळांची सद्यःस्थिती : आव्हाने, वास्तव आणि भविष्याची दिशा प्रेम, मैत्री आणि स्वप्नांचा तरल जीवनपट : 'लायब्ररी फ्रेंड' यवतमाळ जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत श्री शिवाजी हायस्कूल, नेरच्या विद्यार्थिनींचे उज्ज्वल यश सातारा तालुका शिक्षक समितीच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार मातोश्री गिरीजाबाई पाटील शाळेत 'आग नियंत्रणाचे' धडे जावली तालुका आदर्श शिक्षक पुरस्काराने अस्मिता जाधव सन्मानित केंद्र शाळा निगडी खुर्दचा इंग्रजीच्या मैदानात डंका गणेशोत्सवात जि. प. शाळा, धावडशीत संस्कारांची मंगलमय रुजवण 'विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसोबतच सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत : सचिन गोपाळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवातून विद्यार्थ्यांना निसर्गसंवर्धनाचा संदेश बत्तीस शिराळ्यात नंदकुमार सागर यांचा झंझावाती प्रचारदौरा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत कोर्टीच्या चिमुकल्यांची जनजागृती गणितातील अवलिया ऋषितुल्य शिक्षक : जगदीश सुपेकर साहित्याशी जडले नाते जगणं सुंदर आणि बहरदार करणारा सदाबहार काव्यसंग्रहः जगणं होईल हिरवंगार सोलापूर जिल्ह्यातील ३६ उपक्रमशील शिक्षकांचा जिल्हास्तरीय सन्मान आयेशा नदाफ यांनी दिल्लीत केले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व मावळा जवान संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी द्वारे बलकावडेवाडी शाळेला १५ हजारांचे शैक्षणिक साहित्य ढोरेगावच्या जिल्हा परिषद शाळेची क्रीडा क्षेत्रात दमदार भरारी दाणेवाडी शाळेत माजी विद्यार्थी व शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न अतिरिक्त शिक्षक-कर्मचाऱ्यांचे रोखलेले वेतन तात्काळ सुरू करा : शेख अब्दुल रहीम जिल्हा परिषद शाळा दरूजच्या पै. सुरज जाधवने जिंकली मानाची चांदीची गदा परभणी जिल्हा परिषद एम्प्लॉईज को-ऑप क्रेडिट सोसायटीची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार जि. प शाळा मठाचीवाडीच्या मुलींचा कबड्डीच्या मैदानात डंका कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालकांची संख्या ११ करण्यास मंजुरी कराड-पाटण शिक्षक सोसायटीची ७५ वी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात छब्बीचा लाल गणपती : श्रद्धा, परंपरा आणि एकतेचा वारसा यशोगाथा गुरुजींची तरीही जिवंत मी... जळत्या जखमांतून जन्मलेला जगण्याचा प्रकाश तालुकास्तरीय लोकनृत्य स्पर्धेत निंबवडे जि. प. शाळा नं. २ प्रथम येवलेवाडीच्या लोचना धनवडे यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार शिवाजीराव देसाई विद्यालयातील विद्यार्थ्यांचा स्वच्छता उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज : प्रा. दिलीप जाधव अशोक किसन कांबळे यांच्या स्मरणार्थ नगरपालिका नं. ११ शाळेला प्रिंटर भेट
Pune,Maharashtra,India

मुरूम वाहणारा हायवा थेट जि. प शाळेत घुसला

मुरूम वाहणारा हायवा थेट  जि. प शाळेत घुसला

पुणे, उरुळी कांचन : भरधाव आणि ओव्हरलोड मुरूम वाहून नेणाऱ्या डंपर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे डाळिंब ता. दौंड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेततील सरंक्षक भिंतीला जोरदार धडक दिल्याने शाळेच्या आवारात घुसला.

मंगळवारी (ता. 23) दुपारी घडलेल्या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेमुळे डाळिंब गावामध्ये प्रचंड भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या भीषण अपघातात शाळेच्या मालमत्तेचे नुकसान झाले असून, सुदैवाने एका मोठ्या आणि भयानक दुर्घटनेतून निष्पाप शाळकरी मुले बालंबाल बचावली आहेत.

स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डाळिंब गावच्या हद्दीतून मुरूम भरून एक हायवा डंपर अत्यंत बेफाम आणि सुसाट वेगाने चालला होता. डाळिंब गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या जवळ येताच, पावसामुळे व त्यांना ठरवून दिलेल्या ट्रिपा यामुळे हायवा चालक सुसाट डंपर पळवतात. यामुळे या ठिकाणी हायवा चालकाचे गाडीवरील नियंत्रण पूर्णपणे सुटले.

नियंत्रण सुटलेला हा हायवा थेट शाळेच्या दिशेने झेपावला. अत्यंत वेगात असलेल्या या डंपरने जिल्हा परिषद शाळेची पक्की वीट-सिमेंटची भिंत क्षणात चक्काचूर केली आणि थेट आतमध्ये घुसला. डंपरच्या धडकेमुळे मोठा आवाज झाला, ज्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांनी आणि शिक्षकांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली.

दरम्यान, अपघात घडला त्या वेळी सुदैवाने मुले वर्गात होती किंवा मैदानावरील डंपर घुसलेल्या जागेपासून दूर होती, ज्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. जर हा अपघात मधल्या सुट्टीत किंवा मुले बाहेर खेळत असताना घडला असता तर मोठी दुर्घटनेला सामोरे जावे लागले असते.

उरुळी कांचन, कुंजीरवाडी, यवत आणि डाळिंब परिसरात सध्या बेकायदेशीर खडी, माती आणि मुरूम वाहून नेणाऱ्या हायवा आणि डंपर चालकांनी महामार्गावर आणि ग्रामीण रस्त्यांवर कडक धुमाकूळ घातला आहे. "या अवजड वाहनांना गजबजलेल्या गावांतून जाताना वेगाचे कोणतेही कडक नियम लागू नाहीत का? आरटीओ आणि स्थानिक पोलीस या ओव्हरलोड वाहनांकडून फक्त वसुली करतात का?" असा थेट आणि आक्रमक सवाल डाळिंब ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.