Loading...
ब्रेकिंग न्यूज :
लोकमाता अहिल्यादेवी आधुनिक राजकारणासाठी एक दीपस्तंभ शैक्षणिक व सामाजिक कार्यातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व : डॉ. सुभाष वाघमारे शिक्षणातील बदलाच्या वाटेवरचे पाऊल अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे सांगलीतील विद्यार्थी, पालक, शिक्षक त्रस्त तीनशे पेक्षा अधिक घरगणना असणाऱ्या प्रगणकांना मदतनीस द्यावा घातक संच मान्यता निकषामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांमध्ये असंतोष धर्मवीर विद्यालयात आदर्श दाम्पत्याचा गौरवपूर्ण सेवानिवृत्ती सोहळा परभणीच्या बालतारकांची विज्ञानाच्या आकाशात भरारी सुषमा आलेकरी लिखित प्रेरणादायी ग्रंथांचे प्रकाशन टीईटीसाठी एक वर्ष वाढवले पण सवलत नाही : सुप्रीम कोर्ट पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत नाटोशी जि.प. शाळेचे नेत्रदीपक यश टीईटीसाठी एक वर्ष वाढवले, पण सवलत नाही : सुप्रीम कोर्ट वैशाख मास आणि वाढते नैसर्गिक संकट.... शिक्षण, कला आणि संवेदनांचा प्रेरणादायी प्रवास कु. तेजस्विनी ढमाळ दहा वर्षात लाखभर सरकारी शाळा बंद पडल्या! जनगणनेबाबतच्या शिक्षक परिषदेच्या मागण्यांना अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद शहापूरचा 'शिष्यवृत्ती पॅटर्न' यशस्वी ठाणे जिल्ह्यातील ३९५ विद्यार्थी पात्र दोन लाख उमेदवारांचे भविष्य पणाला 'बिंदुनामावली'च्या घोळामुळे शिक्षक भरती रखडण्याची चिन्हे आधी जनगणना, शासकीय कामे करा, मगच प्रशिक्षणाला या शिक्षण क्षेत्रात पुणे जिल्हा परिषद राज्यात अव्वल टीईटीसाठी यंदा ६ लाख उमेदवारांची उच्चांकी नोंदणी रत्नानंद यांच्या 'गं गं गमतीचा... बालकविता संग्रहाचे थाटात प्रकाशन साताऱ्याची 'थंडर बर्ड' - सुदेष्णा शिवणकर डिजिटल वर्गखोलीः प्रगतीची भरारी की सर्वांगीण विकासाची कुचंबणा ? बोगस शालार्थ आयडी घोटाळ्याची २९ मे ला नाशिकमध्ये अंतिम सुनावणी भारतीय बी.एड. धारकांना ऑस्ट्रेलियात संधी समग्र शिक्षा अभियानांतर्गत महाराष्ट्राला निधी देताना केंदाचा हात आखडता जिल्हा पुरस्कारप्राप्त शिक्षकाला अतिरिक्त वेतनवाढ देण्याचे आदेश केजमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ल्यात प्रगणक शिक्षकासह ९ जण जखमी निवृत्त शिक्षक दांपत्याला ६० लांखाला गंडवनारी आंतरराज्य टोळी जेरबंद शिक्षकांचे जिल्हास्तरीय प्रलंबित प्रश्न सोडवा शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाची जि.प.अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्याकडे मागणी मुळगावच्या जि.प. शाळेच्या चिमुकल्यांची साहित्यभरारी शैक्षणिक क्षेत्रात सामाजिक ऋण जपणारे उत्तुंग व्यक्तिमत्व - छाया बैस-चंदेल ऊन्हं पेलण्यासाठी उभारी देणारा लेखसंग्रह त्यांना सावलीत वाढवू नका ! शिरुर तालुका शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी संदीप थोरात उपसभापतीपदी पोपटराव गांधले यांची बिनविरोध निवड ओस पडणाऱ्या जिल्हा परिषद शाळांना नवसंजीवनी, तळेगाव दिघे गावात 'एआय' युक्त हायटेक मराठी स्कूल प्राथमिक शाळांना ५ दिवसांचा आठवडा लागू करा आदर्श शिक्षक समितीचे राज्य शासनाला निवेदन महाराष्ट्र गौरव ऑनलाईन वकृत्व स्पर्धेत संस्कृती आळंजकर राज्यात प्रथम उत्तम सदाकाळ यांच्या 'हिरवा वसा' कवितेचा तिसरीच्या बालभारती पुस्तकात समावेश जनगणनेचे काम करणाऱ्या शिक्षकाला लोणंद मध्ये बेदम मारहाण युवकांनी स्पर्धा परीक्षेतून स्वतःचे करिअर घडवावे : जंबाजीराव भोसले कंटेनरच्या धडकेत शिक्षिकेचा मृत्यू जनगणना बळीची मालिका सुरूच जनगणनेचे काम करणाऱ्या शिक्षकाला मारहाण पालकांनो भुलू नका...!! फाळणीच्या सावलीत कमी पटसंख्येच्या शाळांचे एकत्रीकरण नीती आयोगाच्या शिफारशी अक्षयकुमारमुळे सरकारी शाळेचा कायापालट दिली एक कोटींची मदत जनगणना करताना शिक्षकाचा हृदयविकाराने मृत्यू सांगोल्यातील राजेंद्र ढोले यांच्या निधनामुळे शोककळा जनगणना कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वाचले आजीचे प्राण, आजोबांचा मृत्यू निरागस मने पुस्तकासाठी मीना म्हसे-आसने सन्मानित
Satara,Maharashtra,India

'विद्यार्थी शोध' घेत असलेल्या शिक्षकाचा मृत्यू

शिक्षण क्षेत्रात शोककळा
'विद्यार्थी शोध'  घेत असलेल्या शिक्षकाचा मृत्यू

चंद्रपूर : राज्यात तसेच चंद्रपूर जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळांची पटसंख्या टिकवून ठेवण्यासाठी सुरू असलेल्या विद्यार्थी शोध मोहिमेदरम्यान भद्रावती येथील जिल्हा परिषद हायस्कूल, माध्यमिक विभागातील शिक्षक राजू हिवंज यांचे रविवारी अकस्मात निधन झाले.

दरम्यान उष्माघात मृत्यूचे कारण असावे असा अंदाज व्यक्त होत आहे. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात शोककळा पसरली असून शिक्षकांवर वाढत चाललेल्या अतिरिक्त कामाच्या ताणाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेतील विद्यार्थी संख्या कायम राखण्यासाठी शिक्षकांना विविध भागांत जाऊन पालक व विद्यार्थ्यांच्या भेटी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार राजू हिवंज हे गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हात ४५ अंश सेल्सिअस तापमानात विद्यार्थी शोध मोहिमेत सक्रिय होते. याच काळात शिक्षकांवर जनगणना २०२६ संदर्भातील प्राथमिक जबाबदाऱ्यांचाही ताण वाढला आहे. येत्या १६ मे तारखेपासून अनेक शिक्षक घरगणना प्रक्रियेत सहभागी होणार असल्याने शालेय कामकाजासोबत बाह्य जबाबदाऱ्यांचे ओझेही वाढले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मोहिमेदरम्यान हिवंज यांना अस्वस्थ वाटू लागले होते. घरी परतल्यानंतर त्यांना अचानक चक्कर आल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर दोन ते तीन दिवस अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने रविवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूमागे उष्माघाताची शक्यता व्यक्त केली जात असली तरी अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

राजू हिवंज हे विद्यार्थीप्रिय, शांत स्वभावाचे आणि आदर्श शिक्षक म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अचानक निधनाने विद्यार्थी, पालक आणि सहकारी शिक्षकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातूनही त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

या घटनेनंतर शिक्षकांवर सोपविण्यात येणाऱ्या अशैक्षणिक कामांच्या वाढत्या भाराबाबत चर्चा सुरू झाली आहे. भर उन्हात सुरू असलेल्या मोहिमा, जनगणना आणि इतर प्रशासकीय जबाबदाऱ्यांमुळे शिक्षकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शिक्षकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कामकाजाच्या अटींबाबत शासनाने संवेदनशील भूमिका घेण्याची मागणी शिक्षक संघटनांकडून होत आहे.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.