Loading...
ब्रेकिंग न्यूज :
जि. प. शाळा करगणी क्रमांक २ येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी मोडनिंब पीएमश्री मुलींच्या शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी गुरूंचे आशीर्वाद आपल्यासाठी लाखमोलाचे : प्राचार्य डॉ. चंद्रकांत बोबडे बेलसरच्या कल्याणी स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी नवनियुक्त शिक्षणाधिकारी संघरत्न सरोदे यांचा हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनतर्फ सत्कार काळमवाडी जिल्हा परिषद शाळेचा पर्यावरणासाठी अनोखा संकल्प आजारी होण्यापूर्वीच आरोग्य जपण्याची गरज विनाशाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या जगाला विवेकाचा इशारा 'बाराला दहा कमी' एसआयआरसाठी शिक्षक आणखी पाच दिवस शाळेबाहेर राहणार समग्र शिक्षा अभियानात महाराष्ट्राला तुटपुंजा निधी शिक्षणमंत्री दादा भुसेंची केंद्र सरकारवर नाराजी पालकांनी विश्वासू मार्गदर्शक व्हावे : डॉ. मंजुश्री बोबडे 'वायसी'त पालक मेळावा उत्साहात सायबर व विद्यार्थी सुरक्षेबाबत पाटण पोलिसांचे ज्ञानोजीराव हायस्कुलमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आदर्श विद्यालय शिरवळ येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी संभाजीनगर आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शैक्षणिक उपक्रमांना पिंपोडे खुर्द ग्रामस्थांची सदिच्छा भेट शिष्यवृत्ती, मंथन, प्रज्ञाशोध परीक्षांमध्ये म्हसवे जि.प. शाळेची यशस्वी परंपरा एक सूर, एक ताल अभिनव संकल्पनेतून अतीत केंद्रातील विद्यार्थ्यांना एकसमान गणवेश ज्ञानदानाचा अखंड दीप - आदर्श शिक्षण नसिम सादिक तांबोळी स्त्रीविषयक जाणिवांचा धगधगता वास्तव आलेख - भूमिकन्या वाढलेल्या पटसंख्येमुळे शिक्षक कमी न करण्याची शिक्षक संघाची मागणी शिक्षक मित्र विचार मंचची उरमोडी परिक्रमा उत्साहात पदोन्नती प्राप्त शिक्षक, शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा भाटशिरपुरा शाळेत गौरव शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा दरुज शाळेत गौरव शिक्षक परिषदेच्या बहुतांश मागण्या शिक्षणमंत्र्यांकडून मान्य बेलदरे प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांकडून सीडबॉल रोपणाचा अभिनव उपक्रम एक पेड माँ के नाम अभियानाला ढोरेगावच्या जि.प. शाळेचा हरित स्पर्श विद्यानगर जि.प. प्राथमिक शाळेत नवभारत साक्षरता ग्रंथदिंडी उत्साहात गुरुपौर्णिमा अज्ञानातून ज्ञानप्रकाशाकडे नेणाऱ्या गुरुतत्त्वाचा उत्सव गुरु दक्षिणेच्या पलीकडील गुरुत्व अभिनव विद्याविहार प्राथमिक शाळेच्या पाच विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश जतपुरा शाळेचे अमोल आढळकर यांचा स्टार प्रवाहकडून विशेष गौरव उज्ज्वल भविष्यासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नाही : डॉ. चंद्रकांत पाटील आरटीई कायद्यात दुरुस्ती करून सेवेतील शिक्षकांना टीईटी मधून कायमस्वरूपी सूट द्यावी : शेख अब्दुल रहीम चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत देवनांद्रा शाळेची यशाची परंपरा कायम राज्यस्तरीय शिक्षण संवाद कार्यशाळा मुंबई येथे उत्साहात संपन्न आषाढी एकादशीनिमित्त जि.प. च्या गळनिंब शाळेत भक्तिमय बालदिंडी सांगली शिक्षक बँकेत भरतीवरुन घमासान गुरु पौर्णिमा म्हणजे कृतज्ञतेचा दिवस... गुरु पौर्णिमा ज्ञान, संस्कार आणि कृतज्ञतेचा पवित्र उत्सव नीट परीक्षेत ६२५ गुण मिळविणाऱ्या उत्कर्ष राक्षेला लक्ष्य अकॅडमीकडून हार्ले डेव्हिडसन मोटारसायकल भेट लोकमंगल शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना सनराईज ग्रुपकडून मोफत गणवेश वाटप झेप प्रतिष्ठानतर्फे रुईघर, शिंदेवाडी शाळांना संगणक, शैक्षणिक साहित्याचे वितरण शिरगाव आदर्श प्राथमिक शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत देदिप्यमान यश श्री भवानी बालविद्या मंदिराची उत्साहपूर्ण आषाढी बालदिंडी ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात हेकळवाडी शाळेत बालवारकऱ्यांची दिंडी टाके वस्ती शाळेच्या दिंडीतून पर्यावरण, सामाजिक जनजागृती वाई तालुका शिक्षक संघाच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा इयत्ता ६ वी ते ८ वीच्या शाळांनाही २० पटासाठी तीन शिक्षक मंजूर व्हावेत भक्तिरसात न्हाऊन निघाले रांजणगाव पोळ कानेगाव शाळेच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश संगमनेर नगरपालिका शाळा क्र. ८ मध्ये भारतीय भाषा शिबिराचा उत्साहात समारोप
Satara,Maharashtra,India

पाच तालुक्यांतील शाळांना उद्या सुट्टी

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
पाच तालुक्यांतील शाळांना उद्या सुट्टी

सातारा, (प्रतिनिधी) : सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आणि हवामान विभागाने घाटमाथा व दुर्गम भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाटण, जावळी, वाई आणि सातारा या पाच तालुक्यांतील सर्व अंगणवाड्या, बालवाड्या तसेच शासकीय, निमशासकीय आणि खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांना मंगळवार, दि. ७  जुलै रोजी एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. 

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार सातारा जिल्ह्यातील घाटमाथा आणि दुर्गम भागात सोमवारपासून मंगळवारपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाबळेश्वर, पाटण, वाई, सातारा आणि जावळी तालुक्यांत सातत्याने पाऊस सुरू आहे. त्यामुळे डोंगरदऱ्यांमधून आणि नदी-नाल्यांमधून होणारा पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता असून, ग्रामीण आणि दुर्गम भागातील काही मार्गांवर दरडी कोसळण्याचाही धोका निर्माण झाला आहे. नदी-नाल्यांना पूर आल्यास विद्यार्थ्यांचा शाळेपर्यंतचा प्रवास धोकादायक ठरू शकतो. या सर्व परिस्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत जिल्हा प्रशासनाने पाच तालुक्यांतील शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे.


सर्व माध्यमांच्या शाळांना आदेश लागू


हा आदेश संबंधित पाच तालुक्यांतील सर्व माध्यमांच्या शासकीय, निमशासकीय आणि खासगी शाळांना लागू राहणार आहे. अंगणवाड्या आणि बालवाड्यांचाही सुट्टीच्या आदेशात स्पष्टपणे समावेश करण्यात आला आहे. संबंधित शाळा प्रशासनांनी आदेशाची तातडीने आणि काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.


प्रशासन अलर्ट मोडवर


जिल्हा प्रशासनाने संबंधित तहसीलदार, शिक्षण विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनाही सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास सखल भाग, घाटमार्ग, नदी-नाले आणि दरडप्रवण परिसरातील परिस्थितीवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.