Loading...
ब्रेकिंग न्यूज :
'पायवाटा' च्या माध्यमातून दुर्गम शाळांची कहाणी जगासमोर.. अथांग नातं मैत्रीच्या पलीकडचं, प्रेमाच्या अलिकडचं चांडाळ चौकडी जिल्हा परिषद शाळा कानेगावला तालुका आदर्श शाळा पुरस्कार नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रश्नावर मंत्रालयात बैठका राज्यस्तरीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेत गोकूळ शाळेच्या आदित्य रिटेचे सुयश NPS ची रक्कम GPF मध्ये वर्ग करण्यासाठी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचा पाठपुरावा तांबवे शिक्षण परिषदेत आदर्श शिक्षकांचा विशेष सत्कार जि. प. शाळा, ताथवडे येथे बाहुलीनाट्यातून गाणी-गोष्टींचे मनोरंजक सादरीकरण धर्मवीर संभाजी विद्यालय, देगाव येथे रस्ता सुरक्षा कार्यक्रम संपन्न ज्ञानदानातून राष्ट्रनिर्मिती करणाऱ्या शिक्षकांचा नारायणगावात विशेष गौरव स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धा आवर्डे केंद्रात उत्साहात संपन्न सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेला १० कोटींचा विक्रमी नफा ! मुलाच्या अभ्यासासाठी आले अन् शाळेच्या स्वच्छतेत रमले गुरुजींना 'गुरुजी' राहू द्या जिल्हा परिषद शाळांची सद्यःस्थिती : आव्हाने, वास्तव आणि भविष्याची दिशा प्रेम, मैत्री आणि स्वप्नांचा तरल जीवनपट : 'लायब्ररी फ्रेंड' यवतमाळ जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत श्री शिवाजी हायस्कूल, नेरच्या विद्यार्थिनींचे उज्ज्वल यश सातारा तालुका शिक्षक समितीच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार मातोश्री गिरीजाबाई पाटील शाळेत 'आग नियंत्रणाचे' धडे जावली तालुका आदर्श शिक्षक पुरस्काराने अस्मिता जाधव सन्मानित केंद्र शाळा निगडी खुर्दचा इंग्रजीच्या मैदानात डंका गणेशोत्सवात जि. प. शाळा, धावडशीत संस्कारांची मंगलमय रुजवण 'विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसोबतच सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत : सचिन गोपाळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवातून विद्यार्थ्यांना निसर्गसंवर्धनाचा संदेश बत्तीस शिराळ्यात नंदकुमार सागर यांचा झंझावाती प्रचारदौरा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत कोर्टीच्या चिमुकल्यांची जनजागृती गणितातील अवलिया ऋषितुल्य शिक्षक : जगदीश सुपेकर साहित्याशी जडले नाते जगणं सुंदर आणि बहरदार करणारा सदाबहार काव्यसंग्रहः जगणं होईल हिरवंगार सोलापूर जिल्ह्यातील ३६ उपक्रमशील शिक्षकांचा जिल्हास्तरीय सन्मान आयेशा नदाफ यांनी दिल्लीत केले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व मावळा जवान संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी द्वारे बलकावडेवाडी शाळेला १५ हजारांचे शैक्षणिक साहित्य ढोरेगावच्या जिल्हा परिषद शाळेची क्रीडा क्षेत्रात दमदार भरारी दाणेवाडी शाळेत माजी विद्यार्थी व शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न अतिरिक्त शिक्षक-कर्मचाऱ्यांचे रोखलेले वेतन तात्काळ सुरू करा : शेख अब्दुल रहीम जिल्हा परिषद शाळा दरूजच्या पै. सुरज जाधवने जिंकली मानाची चांदीची गदा परभणी जिल्हा परिषद एम्प्लॉईज को-ऑप क्रेडिट सोसायटीची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार जि. प शाळा मठाचीवाडीच्या मुलींचा कबड्डीच्या मैदानात डंका कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालकांची संख्या ११ करण्यास मंजुरी कराड-पाटण शिक्षक सोसायटीची ७५ वी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात छब्बीचा लाल गणपती : श्रद्धा, परंपरा आणि एकतेचा वारसा यशोगाथा गुरुजींची तरीही जिवंत मी... जळत्या जखमांतून जन्मलेला जगण्याचा प्रकाश तालुकास्तरीय लोकनृत्य स्पर्धेत निंबवडे जि. प. शाळा नं. २ प्रथम येवलेवाडीच्या लोचना धनवडे यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार शिवाजीराव देसाई विद्यालयातील विद्यार्थ्यांचा स्वच्छता उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज : प्रा. दिलीप जाधव अशोक किसन कांबळे यांच्या स्मरणार्थ नगरपालिका नं. ११ शाळेला प्रिंटर भेट
Satara,Maharashtra,India

बीएलओ कामावरून हायकोर्ट शासनावर संतप्त

शिक्षक संघाच्या याचिकेवर सुनावणी
बीएलओ कामावरून हायकोर्ट शासनावर संतप्त

कोल्हापूर : शिक्षकांना कायमस्वरूपी बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) म्हणून कामे देण्याच्या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने राज्य सरकार व निवडणूक आयोगावर गंभीर प्रश्न उपस्थित करत, या संदर्भात १५ दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती मिलिंद जाधव आणि न्यायमूर्ती एन. एस. देशपांडे यांच्या खंडपीठाने शिक्षकांवर वर्षानुवर्षे बीएलओची जबाबदारी सोपविण्याबाबत नाराजी व्यक्त केली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने, "शिक्षकांवर गुन्हे दाखल करता, तर मंत्रालयीन कर्मचारी नियुक्त का करत नाही?" असा थेट सवाल उपस्थित केला.

याचिकेत नमूद केल्याप्रमाणे, मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षण (SIR) मोहिमेमुळे राज्यभरातील शाळांमधील शैक्षणिक कामकाज मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. महसूल विभागाकडून शिक्षकांवर नोटिसा, निलंबनाची कारवाई आणि गुन्हे दाखल करण्याच्या घटनांमुळे शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

याचिकेवर तातडीने सुनावणी घेत न्यायालयाने शिक्षणाचा हक्क कायदा (RTE) लक्षात घेऊन शिक्षकांना बीएलओच्या कायमस्वरूपी जबाबदारीतून मुक्त करण्यासाठी कोणती उपाययोजना करता येईल, याबाबत राज्य शासन आणि निवडणूक आयोगाने १५ दिवसांत सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.

सुनावणीदरम्यान न्यायालयाने बीएलओचे काम हे प्रत्यक्ष निवडणुकीपुरते मर्यादित नसून वर्षभर चालणारे सातत्यपूर्ण काम असल्याचे निरीक्षण नोंदवले. तसेच शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्याच्या प्रकाराबाबतही न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने एसआयआर मोहिमेमुळे झालेल्या शैक्षणिक नुकसानीचे आणि शिक्षकांवरील प्रशासकीय दडपशाहीचे पुरावे न्यायालयासमोर मांडत, भविष्यात बीएलओची कायमस्वरूपी जबाबदारी शिक्षकांकडून काढून घेण्याची मागणी केली आहे. सुनावणीदरम्यान शिक्षकांचा सन्मान आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणारा परिणाम या मुद्द्यांवर सरकारी पक्षाला समाधानकारक उत्तर देता आले नाही, असे संघटनेने म्हटले आहे.

या सुनावणीवेळी वरिष्ठ विधीज्ञ अॅड. सुरेश पाकळे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे, कार्यकारी अध्यक्ष विलास चौगुले आणि सातारा जिल्हाध्यक्ष सी. एल. यादव उपस्थित होते.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.