Loading...
ब्रेकिंग न्यूज :
विद्यार्थ्यांचे यश हीच गुरुंना खरी गुरुदक्षिणा ढोरेगाव शाळेचा राज्यासाठी आदर्श उपक्रम बोरवंड बुद्रुक जि. प. शाळेने अभिनव ग्रंथदिंडीतून दिला संविधान जागर, वाचन चळवळीचा संदेश भक्ती, संस्कार आणि पर्यावरणाचा उंबरखडवा शाळेत सुंदर संगम आटपाडी जिल्हा परिषद शाळा क्रमांक ३ सह अंगणवाडीची बालदिंडी दिमाखात संपन्न विद्यार्थिनींच्या पुढाकारातून जानापुरी शाळेत गुरुपौर्णिमा संस्कारमय वातावरणात साजरी लोकनायकच्या दुसऱ्या आवृत्तीचे आज प्रकाशन तडवळे जिल्हा परिषद शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी वंचितांच्या वेदनांना शब्द देणारा युगपुरुष साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती - लेखन प्रेरणा दिन लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ... संच मान्यतेच्या नव्या निकषाने ३० हजार विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात शिष्यवृत्तीत अंश्रुली तोडकरचे देदिप्यमान यश साताऱ्याचे 'वायसीआयएस' महाविद्यालय ठरतेय विद्यार्थ्यांची खरी 'लाईफलाईन' वत्सलादेवी स्कूलमध्ये अनोख्या पद्धतीने पालक, शिक्षकांचे पाद्यपूजन करून गुरुपौर्णिमा साजरी गोकुळ-धावडे विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी 'माझा ऑक्सिजन, माझी जबाबदारी' उपक्रमांतर्गत भवानीनगर शाळेत विद्यार्थ्यांना वृक्षरोपांचे वाटप ज्ञानदिंडीच्या उत्साहात पाटखळ गटाची गुणवत्ता विकास समिती सहविचार सभा जि. प. शाळा करगणी क्रमांक २ येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी मोडनिंब पीएमश्री मुलींच्या शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी गुरूंचे आशीर्वाद आपल्यासाठी लाखमोलाचे : प्राचार्य डॉ. चंद्रकांत बोबडे बेलसरच्या कल्याणी स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी नवनियुक्त शिक्षणाधिकारी संघरत्न सरोदे यांचा हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनतर्फ सत्कार काळमवाडी जिल्हा परिषद शाळेचा पर्यावरणासाठी अनोखा संकल्प आजारी होण्यापूर्वीच आरोग्य जपण्याची गरज विनाशाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या जगाला विवेकाचा इशारा 'बाराला दहा कमी' एसआयआरसाठी शिक्षक आणखी पाच दिवस शाळेबाहेर राहणार समग्र शिक्षा अभियानात महाराष्ट्राला तुटपुंजा निधी शिक्षणमंत्री दादा भुसेंची केंद्र सरकारवर नाराजी पालकांनी विश्वासू मार्गदर्शक व्हावे : डॉ. मंजुश्री बोबडे 'वायसी'त पालक मेळावा उत्साहात सायबर व विद्यार्थी सुरक्षेबाबत पाटण पोलिसांचे ज्ञानोजीराव हायस्कुलमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आदर्श विद्यालय शिरवळ येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी संभाजीनगर आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शैक्षणिक उपक्रमांना पिंपोडे खुर्द ग्रामस्थांची सदिच्छा भेट शिष्यवृत्ती, मंथन, प्रज्ञाशोध परीक्षांमध्ये म्हसवे जि.प. शाळेची यशस्वी परंपरा एक सूर, एक ताल अभिनव संकल्पनेतून अतीत केंद्रातील विद्यार्थ्यांना एकसमान गणवेश ज्ञानदानाचा अखंड दीप - आदर्श शिक्षण नसिम सादिक तांबोळी स्त्रीविषयक जाणिवांचा धगधगता वास्तव आलेख - भूमिकन्या वाढलेल्या पटसंख्येमुळे शिक्षक कमी न करण्याची शिक्षक संघाची मागणी शिक्षक मित्र विचार मंचची उरमोडी परिक्रमा उत्साहात पदोन्नती प्राप्त शिक्षक, शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा भाटशिरपुरा शाळेत गौरव शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा दरुज शाळेत गौरव शिक्षक परिषदेच्या बहुतांश मागण्या शिक्षणमंत्र्यांकडून मान्य बेलदरे प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांकडून सीडबॉल रोपणाचा अभिनव उपक्रम एक पेड माँ के नाम अभियानाला ढोरेगावच्या जि.प. शाळेचा हरित स्पर्श विद्यानगर जि.प. प्राथमिक शाळेत नवभारत साक्षरता ग्रंथदिंडी उत्साहात गुरुपौर्णिमा अज्ञानातून ज्ञानप्रकाशाकडे नेणाऱ्या गुरुतत्त्वाचा उत्सव गुरु दक्षिणेच्या पलीकडील गुरुत्व अभिनव विद्याविहार प्राथमिक शाळेच्या पाच विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश जतपुरा शाळेचे अमोल आढळकर यांचा स्टार प्रवाहकडून विशेष गौरव उज्ज्वल भविष्यासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नाही : डॉ. चंद्रकांत पाटील आरटीई कायद्यात दुरुस्ती करून सेवेतील शिक्षकांना टीईटी मधून कायमस्वरूपी सूट द्यावी : शेख अब्दुल रहीम चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत देवनांद्रा शाळेची यशाची परंपरा कायम
Amaravati,Maharashtra,India

गटशिक्षणाधिकाऱ्याला अटक

परीक्षा कस्टडी रूमवर आढळला गैरप्रकार, शिक्षण विस्तार अधिकारी फरार
गटशिक्षणाधिकाऱ्याला अटक

अमरावती, अंजनगाव सुर्जी : शहरातील सीताबाई संगई विद्यालय कस्टडी रूममध्ये (डीसी-२८) २७ फेब्रुवारी रोजी शिक्षण विभागाच्या पथकाने धाड टाकली. तेव्हा दहाव्या वर्गाच्या इंग्रजी विषयाच्या पेपरदरम्यान गंभीर गैरप्रकार उघडकीस आला. उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून अंजनगावसुर्जी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुधीर खोडे यांना पोलिसांनी अटक केल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. 

उत्तरपत्रिकांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी केंद्रप्रमुखासह तीन जण आणि दोन अनोळखी विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार २७ फेब्रुवारी रोजी इंग्रजी विषयाचा पेपर सकाळी ११ ते दुपारी दोन, या वेळेत पार पडला. मराठी माध्यमाच्या १९९२, इंग्रजी माध्यमाच्या ४४३ आणि उर्दू माध्यमाच्या ४३१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. याच दिवशी दुपारी चार वाजून ४० मिनिटांनी भरारी पथकातील उपशिक्षणाधिकारी रजनी शिरभाते, रवींद्र सोळंके, सहायक शिक्षक मातोश्री देशमुख, आशिष किनेकर यांनी सीताबाई संगई शाळेतील कस्टडी रूममध्ये भेट दिली असता परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका मोजणी दरम्यान दोन उत्तरपत्रिका शिक्षण विभागाच्या पथकाला कमी आढळल्या.

तपासणीदरम्यान एका कर्मचाऱ्याच्या शर्टाच्या आत दोन उत्तरपत्रिका लपविल्याचे आढळून आले. दोन्ही उत्तरपत्रिका भरारी पथकाने ताब्यात घेतल्या. दोन उत्तरपत्रिका या व्यक्तीजवळ कशा आल्या, याबाबत भरारी पथकाने गटशिक्षण अधिकारी सुधीर खोडे यांना विचारले असता त्यांनी मला माहीत नसल्याचे सांगितले. इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या अनुक्रमे एक-एक उत्तरपत्रिका गहाळ झाल्या होत्या. त्या उत्तरपत्रिका अनिल हाडोळे नामक व्यक्तीजवळ आढळल्या. त्या याच उत्तरपत्रिका होत्या, याची खात्री झाली.

प्रश्नपत्रिका पोलिस स्टेशनमधून घेणे, उत्तरपत्रिका सीलबंद करून पोस्ट ऑफिसला पोहोचवण्याची संपूर्ण जबाबदारी परीक्षक यांची असते. परीक्षा केंद्राचा पेपर डीसी कस्टडी केंद्रावर साधारणत: तीन वाजून ३० मिनिटे वाजेपर्यंत येणे अपेक्षित असते. त्यानंतर संपूर्ण उत्तरपत्रिका पाच वाजेपर्यंत सीलबंद होणे अपेक्षित असताना डीसी स्टडी रूमवर चार वाजून ४० मिनिटांपर्यंत एकही उत्तरपत्रिका सीलबंद झाल्याचे दिसून आले नाही.

यावरून डीसीमध्ये सुधीर खोडे परीक्षक, उपपरीक्षक सुशील कुमार अभ्यंकर हे प्रथमदर्शनी दोषी आढळून आले. तसेच संकेत अनिल हाडोळे हेसुद्धा दोषी असल्याचे आढळून आल्याने याबाबतचा अहवाल तातडीने २८ फेब्रुवारी रोजी अध्यक्ष व सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अमरावती यांना प्रत्यक्ष भेट अहवाल व जप्त केलेल्या दोन उत्तरपत्रिका सीलबंद करून दिल्याचे उपशिक्षणाधिकारी रजनी शिरभाते यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. सुधीर खोडे, सुशीलकुमार अभ्यंकर, अनिल हाडोळे यांनी संगनमताने दोन अनोळखी विद्यार्थी यांना उत्तरपत्रिका सोडविण्यास परस्पर दिली.

बेकायदेशीर कृत्य केल्याने वरील तीन व्यक्ती व दोन अनोळखी विद्यार्थी यांच्यावर प्रचलित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी उपशिक्षणाधिकारी रजनी शिरभाते यांनी अंजनगावसुर्जी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून अंजनगाव पोलिसांनी अंजनगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुधीर खोडे, शिक्षण विस्तार अधिकारी सुशीलकुमार अभ्यंकर व अनिल हाडोळे (वय ४५) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दोन अनोळखी विद्यार्थ्यांचा शोध सुरू असून पोलिसांनी सुधीर खोडे, अनिल हाडोळे यांना अटक केली. तर विस्तार अधिकारी सुशीलकुमार अभ्यंकर अद्याप फरार आहेत.


याप्रकरणी सखोल चौकशी करून जे जे दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल. यानंतर असे गैरप्रकार करण्याचे कोणी धाडस करणार नाही. प्रकरणातील सर्व बाबी तपासल्या जातील.

-सूरज बोंडे ठाणेदार, अंजनगाव सुर्जी

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.