Loading...
ब्रेकिंग न्यूज :
गणितातील अवलिया ऋषितुल्य शिक्षक : जगदीश सुपेकर साहित्याशी जडले नाते जगणं सुंदर आणि बहरदार करणारा सदाबहार काव्यसंग्रहः जगणं होईल हिरवंगार सोलापूर जिल्ह्यातील ३६ उपक्रमशील शिक्षकांचा जिल्हास्तरीय सन्मान आयेशा नदाफ यांनी दिल्लीत केले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व मावळा जवान संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी द्वारे बलकावडेवाडी शाळेला १५ हजारांचे शैक्षणिक साहित्य ढोरेगावच्या जिल्हा परिषद शाळेची क्रीडा क्षेत्रात दमदार भरारी दाणेवाडी शाळेत माजी विद्यार्थी व शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न अतिरिक्त शिक्षक-कर्मचाऱ्यांचे रोखलेले वेतन तात्काळ सुरू करा : शेख अब्दुल रहीम जिल्हा परिषद शाळा दरूजच्या पै. सुरज जाधवने जिंकली मानाची चांदीची गदा परभणी जिल्हा परिषद एम्प्लॉईज को-ऑप क्रेडिट सोसायटीची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार जि. प शाळा मठाचीवाडीच्या मुलींचा कबड्डीच्या मैदानात डंका कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालकांची संख्या ११ करण्यास मंजुरी कराड-पाटण शिक्षक सोसायटीची ७५ वी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात छब्बीचा लाल गणपती : श्रद्धा, परंपरा आणि एकतेचा वारसा यशोगाथा गुरुजींची तरीही जिवंत मी... जळत्या जखमांतून जन्मलेला जगण्याचा प्रकाश तालुकास्तरीय लोकनृत्य स्पर्धेत निंबवडे जि. प. शाळा नं. २ प्रथम येवलेवाडीच्या लोचना धनवडे यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार शिवाजीराव देसाई विद्यालयातील विद्यार्थ्यांचा स्वच्छता उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज : प्रा. दिलीप जाधव अशोक किसन कांबळे यांच्या स्मरणार्थ नगरपालिका नं. ११ शाळेला प्रिंटर भेट गुवाहाटी प्रशिक्षणासाठी युवराज माने यांची निवड गांधीनगर शाळेतील विद्यार्थ्यांचा हरिपाठ सप्ताहात उत्स्फूर्त सहभाग परभणी जि.प. एम्प्लॉईज सोसायटीची आज ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा वर्णेत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आदर्श कृत्रिम तलावात गणेशमूर्तीचे विसर्जन कोंढवलीच्या ज्ञानमंदिराचा कृतज्ञ शिल्पकार - रमेश जाधव बाप्पा, विसर्जनानंतर माणुसकीचा दीप तेवत राहो...! बुद्धीच्या देवते तुझे विसर्जन की बुडवणूक ? डहाणू तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न हेकळवाडी जिल्हा परिषद शाळा विद्यार्थी सुरक्षा सुविधा समिती अध्यक्षपदी सागर झेंडे यांची निवड संजय अहिरे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार जि. प. आदर्श केंद्रशाळा शिरसवडी येथे 'शालेय क्रीडामहोत्सव' उत्साहात निंबवडे जि. प. शाळा नं. २ ची चौफेर भरारी शिक्षक नितीन कर्पे यांचा अभिनव उपक्रम व्हॉट्सपच्या माध्यमातून मुलांना संस्कारांची शिदोरी पोषण आहारच्या स्वयंपाकींचे मानधन तातडीने अदा करा गणेश मंडळांना भेट देत तुळसण शाळेच्या विद्यार्थ्यांची सामाजिक, पर्यावरण जनजागृती 'सेवा संकल्प अभियान' अंतर्गत प्रकाशा कन्या शाळेत विविध उपक्रम कोरेगाव नं. ३ जिल्हा परिषद शाळेत गणेशोत्सवाच्या आरती कार्यक्रमात विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण शिवाजी रोडे-पाटील गृहतारण संस्थेचा ३७ कोटींचा व्यवसाय धनवडेवाडी शाळेच्या चिमुकल्यांचे पर्यावरणपूरक जनजागृती अभियान प्रगल्भ माणूस घडवणारे व्यक्तिमत्त्व : प्रा. डॉ. सुभाष वाघमारे कला आणि संस्कृतीची परंपरा जपणारी वाई नगरी बाप्पांची भक्ती की फॅशनची सक्ती प्रा. घनश्याम पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार रग्बीच्या मैदानावर साताऱ्याच्या मुलींचा दमदार खेळ नारायणगावात ओम श्री साईराम शिक्षक प्रतिष्ठानच्या वतीने गुणवंत शिक्षक व विद्यार्थी पुरस्कार सोहळा उत्साहात धारपुडी येथे रुपाली सुतार यांच्या घरातील गणेशोत्सवाचा अनोखा देखावा जगात गुरुपेक्षा कुणीच श्रेष्ठ नाही : डॉ. मधुसूदन घाणेकर
Mumbai,Maharashtra,India

शिक्षक बदल्यांसाठी मंत्री जयकुमार गोरे यांचे शिक्षक संघाला सकारात्मक आश्वासन

शिक्षक बदल्यांसाठी मंत्री जयकुमार गोरे यांचे शिक्षक संघाला सकारात्मक आश्वासन

मुंबई : शिक्षण सेवक भरती प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत विनंती बदल्या पूर्ण कराव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने ग्रामविकास मंत्री मा. ना. जयकुमार  गोरे यांची मंत्रालयीन बैठक घेतली. या बैठकीत जनगणना-२०२७च्या निर्देशांमुळे निर्माण झालेला बदली प्रक्रियेतील अडथळा दूर करण्यासाठी कायदेशीर उपाययोजना तपासून बदल्या मार्गी लावण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करण्याचे आश्वासन मंत्री गोरे यांनी दिले.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत या आठवड्यातील ही दुसरी बैठक होती. राज्यातील अनेक शिक्षक आपल्या कुटुंबापासून शेकडो किलोमीटर दूर कार्यरत असून, विशेषतः महिला शिक्षकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने बैठकीत निदर्शनास आणून दिले.

शिक्षण सेवक भरतीपूर्वी विनंती बदल्या न झाल्यास, आगामी भरतीमुळे रिक्त पदांवर नवीन नियुक्त्या होतील आणि अनेक वर्षांपासून बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांना आपल्या सोयीच्या किंवा मूळ जिल्ह्यात जाण्याची संधी गमवावी लागू शकते, अशी भूमिका संघटनेने मांडली.

केंद्रीय गृह सचिवांनी ११ मार्च रोजी देशातील सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना Census-2027 साठी नियुक्त Census Functionaries यांची ३१ मार्च २०२७ पर्यंत बदली करू नये, असे निर्देश दिल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. या निर्देशांमुळे राज्य सरकारच्या बदली अधिकारांवर काही मर्यादा निर्माण झाल्याचे संघटनेने नमूद केले.

मात्र, जनगणना कार्यात प्रत्यक्ष सहभागी असलेल्या शिक्षकांचे कर्तव्य अबाधित ठेवून इतर पात्र शिक्षकांच्या बदल्यांसाठी विशेष प्रक्रिया राबविता येऊ शकते, अशी भूमिका संघटनेने मांडली. जनगणना संचालनालयाकडून याबाबत कायदेशीर बाबी तपासून घेऊन, आवश्यक असल्यास मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने बदली प्रक्रिया मार्गी लावण्याचे आश्वासन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.

शिक्षक संघाच्या वतीने ग्रामविकास विभागाकडे पुढील मागण्यांचे निवेदन देण्यात आले,

१. शिक्षण सेवक भरतीपूर्वी मागील जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेतील टप्पा क्रमांक ७, अवघड क्षेत्रातील शिक्षक, संवर्ग-४ मधून गैरसोयीने तालुक्याबाहेर बदली झालेले शिक्षक, पती-पत्नी, एकल शिक्षक, महिला शिक्षिका, विस्थापित तसेच गंभीर कौटुंबिक परिस्थिती व विशेष बाबी असलेल्या शिक्षकांच्या रिक्त जागांवरील विनंती बदल्या करण्यात याव्यात.

२. आंतरजिल्हा बदलीचा टप्पा क्रमांक ७ तातडीने पूर्ण करण्यात यावा.

३. १७ एप्रिल २०२६च्या आदेशातील ‘सर्वसाधारण बदली प्रक्रिया’ या शब्दांचा अर्थ स्पष्ट करून, रिक्त जागांवर विशेष बाब म्हणून करण्यात येणाऱ्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत विनंती बदल्यांचा त्यामध्ये समावेश नसल्याचे स्पष्ट करणारे शासन परिपत्रक काढावे.

४. जनगणना-२०२७च्या कामाशी प्रत्यक्ष संबंधित शिक्षकांच्या कर्तव्याला बाधा न आणता इतर पात्र शिक्षकांसाठी विशेष बदली प्रक्रिया राबवावी.

५. Census Functionary म्हणून नियुक्त शिक्षकांच्या बाबतीत बदली प्रक्रिया पूर्ण करून, त्यांच्या जनगणना कर्तव्याची तारीख विचारात घेऊन जनगणना पूर्ण झाल्यानंतर बदली आदेश कार्यान्वित करावेत.

६. बदली प्रक्रियेत वस्ती शाळा शिक्षकांची मूळ सेवा ग्राह्य धरण्यात यावी.

७. सन २०२३नंतर नियुक्त शिक्षण सेवकांच्या आंतरजिल्हा बदलीवरील बंदीची अट रद्द करण्यात यावी.

८. संवर्ग-१मध्ये हृदय शस्त्रक्रियेसोबत अँजिओप्लास्टीचा समावेश करण्यात यावा.

    या बैठकीस महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात, राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे, राष्ट्रीय शिक्षक महासंघाचे कार्यकारी अध्यक्ष बलवंत पाटील, सरचिटणीस किशन इदगे, राज्य कार्यकारी अध्यक्ष विलास चौगुले, कार्याध्यक्ष संतोष कदम, कोषाध्यक्ष अनिरुद्ध पवार, केंद्रप्रमुख संघटनेचे राज्याध्यक्ष राजेंद्र जगताप, राज्य संपर्कप्रमुख दीपक गिरी, इंदापूर तालुकाध्यक्ष नानासाहेब नरुटे, रवींद्र घाडगे यांच्यासह राज्यसंघाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रीय शिक्षक महासंघाचे कार्यकारी अध्यक्ष बलवंत पाटील यांनीही या बैठकीसाठी विशेष पुढाकार घेतला. शिक्षकांच्या बदल्यांचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.