Loading...
ब्रेकिंग न्यूज :
विद्यार्थ्यांचे यश हीच गुरुंना खरी गुरुदक्षिणा ढोरेगाव शाळेचा राज्यासाठी आदर्श उपक्रम बोरवंड बुद्रुक जि. प. शाळेने अभिनव ग्रंथदिंडीतून दिला संविधान जागर, वाचन चळवळीचा संदेश भक्ती, संस्कार आणि पर्यावरणाचा उंबरखडवा शाळेत सुंदर संगम आटपाडी जिल्हा परिषद शाळा क्रमांक ३ सह अंगणवाडीची बालदिंडी दिमाखात संपन्न विद्यार्थिनींच्या पुढाकारातून जानापुरी शाळेत गुरुपौर्णिमा संस्कारमय वातावरणात साजरी लोकनायकच्या दुसऱ्या आवृत्तीचे आज प्रकाशन तडवळे जिल्हा परिषद शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी वंचितांच्या वेदनांना शब्द देणारा युगपुरुष साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती - लेखन प्रेरणा दिन लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ... संच मान्यतेच्या नव्या निकषाने ३० हजार विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात शिष्यवृत्तीत अंश्रुली तोडकरचे देदिप्यमान यश साताऱ्याचे 'वायसीआयएस' महाविद्यालय ठरतेय विद्यार्थ्यांची खरी 'लाईफलाईन' वत्सलादेवी स्कूलमध्ये अनोख्या पद्धतीने पालक, शिक्षकांचे पाद्यपूजन करून गुरुपौर्णिमा साजरी गोकुळ-धावडे विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी 'माझा ऑक्सिजन, माझी जबाबदारी' उपक्रमांतर्गत भवानीनगर शाळेत विद्यार्थ्यांना वृक्षरोपांचे वाटप ज्ञानदिंडीच्या उत्साहात पाटखळ गटाची गुणवत्ता विकास समिती सहविचार सभा जि. प. शाळा करगणी क्रमांक २ येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी मोडनिंब पीएमश्री मुलींच्या शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी गुरूंचे आशीर्वाद आपल्यासाठी लाखमोलाचे : प्राचार्य डॉ. चंद्रकांत बोबडे बेलसरच्या कल्याणी स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी नवनियुक्त शिक्षणाधिकारी संघरत्न सरोदे यांचा हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनतर्फ सत्कार काळमवाडी जिल्हा परिषद शाळेचा पर्यावरणासाठी अनोखा संकल्प आजारी होण्यापूर्वीच आरोग्य जपण्याची गरज विनाशाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या जगाला विवेकाचा इशारा 'बाराला दहा कमी' एसआयआरसाठी शिक्षक आणखी पाच दिवस शाळेबाहेर राहणार समग्र शिक्षा अभियानात महाराष्ट्राला तुटपुंजा निधी शिक्षणमंत्री दादा भुसेंची केंद्र सरकारवर नाराजी पालकांनी विश्वासू मार्गदर्शक व्हावे : डॉ. मंजुश्री बोबडे 'वायसी'त पालक मेळावा उत्साहात सायबर व विद्यार्थी सुरक्षेबाबत पाटण पोलिसांचे ज्ञानोजीराव हायस्कुलमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आदर्श विद्यालय शिरवळ येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी संभाजीनगर आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शैक्षणिक उपक्रमांना पिंपोडे खुर्द ग्रामस्थांची सदिच्छा भेट शिष्यवृत्ती, मंथन, प्रज्ञाशोध परीक्षांमध्ये म्हसवे जि.प. शाळेची यशस्वी परंपरा एक सूर, एक ताल अभिनव संकल्पनेतून अतीत केंद्रातील विद्यार्थ्यांना एकसमान गणवेश ज्ञानदानाचा अखंड दीप - आदर्श शिक्षण नसिम सादिक तांबोळी स्त्रीविषयक जाणिवांचा धगधगता वास्तव आलेख - भूमिकन्या वाढलेल्या पटसंख्येमुळे शिक्षक कमी न करण्याची शिक्षक संघाची मागणी शिक्षक मित्र विचार मंचची उरमोडी परिक्रमा उत्साहात पदोन्नती प्राप्त शिक्षक, शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा भाटशिरपुरा शाळेत गौरव शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा दरुज शाळेत गौरव शिक्षक परिषदेच्या बहुतांश मागण्या शिक्षणमंत्र्यांकडून मान्य बेलदरे प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांकडून सीडबॉल रोपणाचा अभिनव उपक्रम एक पेड माँ के नाम अभियानाला ढोरेगावच्या जि.प. शाळेचा हरित स्पर्श विद्यानगर जि.प. प्राथमिक शाळेत नवभारत साक्षरता ग्रंथदिंडी उत्साहात गुरुपौर्णिमा अज्ञानातून ज्ञानप्रकाशाकडे नेणाऱ्या गुरुतत्त्वाचा उत्सव गुरु दक्षिणेच्या पलीकडील गुरुत्व अभिनव विद्याविहार प्राथमिक शाळेच्या पाच विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश जतपुरा शाळेचे अमोल आढळकर यांचा स्टार प्रवाहकडून विशेष गौरव उज्ज्वल भविष्यासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नाही : डॉ. चंद्रकांत पाटील आरटीई कायद्यात दुरुस्ती करून सेवेतील शिक्षकांना टीईटी मधून कायमस्वरूपी सूट द्यावी : शेख अब्दुल रहीम चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत देवनांद्रा शाळेची यशाची परंपरा कायम
Chandrapur ,Maharashtra,India

जि.प. शिक्षकाचा खून

बायकोने अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी दिली १ लाखाची सुपारी
जि.प. शिक्षकाचा खून

चंद्रपूर : एक लाख रुपयांत सुपारी देऊन पत्नीनेच जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेले पती रवींद्र कुळमेथे यांचा खून केल्याची धक्कादायक घटना भद्रावती पोलिसांच्या तपासात उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी पत्नी दीपमाला रवींद्र कुळमेथे, वर्षा परचाके, सोनू उर्फ प्रवीण कालोकर आणि नाझीर अंसारी या चार आरोपींना अटक केली.

जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेल्या पतीची नोकरी अनुकंपा तत्त्वावर आपल्याला मिळणार, या लालसेतून पत्नीनेच पतीची हत्या केल्याचे तपासात समोर आले.

भद्रावती तालुक्यातील घोडपेठ येथील कर्मवीर शाळेजवळ, हनुमान मंदिराशेजारी २ मे रोजी एका व्यक्तीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील रवींद्र तुळशिराम कुळमेथे (४६) यांचा मृतदेह असल्याचे पोलीस चौकशीत समोर आले. सखोल चौकशीत धक्कादायक सत्य समोर आले. मृताची पत्नी दीपमाला कुळमेथे हिनेच पतीच्या खुनासाठी वर्षा परचाके, सोनू उर्फ प्रवीण कालोकर आणि नाझीर अंसारी या तिघांना १ लाख रुपयांची सुपारी दिली होती. १ मे रोजी तिन्ही आरोपींनी कुळमेथे यांना कारमध्ये बसवून घोडपेठ येथे एका निर्जनस्थळी नेले. तेथे कारमध्येच त्याचा गळा आवळून खून करण्यात आला आणि मृतदेह घटनास्थळी टाकून आरोपी पसार झाले.

भद्रावती पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत आरोपी दीपमाला कुळमेथे व वर्षा परचाके या दोघींना वरोरा येथून, तर सोनू उर्फ प्रविण कालोकर व नाझीर अंसारी यांना नागपूर येथून अटक केली. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली मारुती कंपनीची कार (एम.एच ३१ डीसी ८९१९) व तीन मोबाईल जप्त करण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.

रवींद्र कुळमेथे हे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. पती-पत्नीमध्ये सातत्याने भांडणे होत होती. तसेच शिक्षक पती दोन वर्षापासून शाळेत जात नव्हता. अशातच पतीची हत्या केल्यानंतर अनुकंपा तत्त्वावर शासकीय नोकरी मिळेल, या लालसेतूनच पत्नीने पतीचा खून केल्याची माहिती समोर आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा दिनकर ठोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी (पो.ठा. भद्रावती), निरीक्षक अमोल काचोरे (स्थानिक गुन्हे शाखा), सहाय्यक पोलीस निरीक्षक बलराम झाडोकार, उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे, उपनिरीक्षक निबोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विरेन्द्र केदारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मिश्रा, महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका गेडाम यांनी पार पाडली.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.