Loading...
ब्रेकिंग न्यूज :
गणितातील अवलिया ऋषितुल्य शिक्षक : जगदीश सुपेकर साहित्याशी जडले नाते जगणं सुंदर आणि बहरदार करणारा सदाबहार काव्यसंग्रहः जगणं होईल हिरवंगार सोलापूर जिल्ह्यातील ३६ उपक्रमशील शिक्षकांचा जिल्हास्तरीय सन्मान आयेशा नदाफ यांनी दिल्लीत केले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व मावळा जवान संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी द्वारे बलकावडेवाडी शाळेला १५ हजारांचे शैक्षणिक साहित्य ढोरेगावच्या जिल्हा परिषद शाळेची क्रीडा क्षेत्रात दमदार भरारी दाणेवाडी शाळेत माजी विद्यार्थी व शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न अतिरिक्त शिक्षक-कर्मचाऱ्यांचे रोखलेले वेतन तात्काळ सुरू करा : शेख अब्दुल रहीम जिल्हा परिषद शाळा दरूजच्या पै. सुरज जाधवने जिंकली मानाची चांदीची गदा परभणी जिल्हा परिषद एम्प्लॉईज को-ऑप क्रेडिट सोसायटीची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार जि. प शाळा मठाचीवाडीच्या मुलींचा कबड्डीच्या मैदानात डंका कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालकांची संख्या ११ करण्यास मंजुरी कराड-पाटण शिक्षक सोसायटीची ७५ वी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात छब्बीचा लाल गणपती : श्रद्धा, परंपरा आणि एकतेचा वारसा यशोगाथा गुरुजींची तरीही जिवंत मी... जळत्या जखमांतून जन्मलेला जगण्याचा प्रकाश तालुकास्तरीय लोकनृत्य स्पर्धेत निंबवडे जि. प. शाळा नं. २ प्रथम येवलेवाडीच्या लोचना धनवडे यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार शिवाजीराव देसाई विद्यालयातील विद्यार्थ्यांचा स्वच्छता उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज : प्रा. दिलीप जाधव अशोक किसन कांबळे यांच्या स्मरणार्थ नगरपालिका नं. ११ शाळेला प्रिंटर भेट गुवाहाटी प्रशिक्षणासाठी युवराज माने यांची निवड गांधीनगर शाळेतील विद्यार्थ्यांचा हरिपाठ सप्ताहात उत्स्फूर्त सहभाग परभणी जि.प. एम्प्लॉईज सोसायटीची आज ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा वर्णेत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आदर्श कृत्रिम तलावात गणेशमूर्तीचे विसर्जन कोंढवलीच्या ज्ञानमंदिराचा कृतज्ञ शिल्पकार - रमेश जाधव बाप्पा, विसर्जनानंतर माणुसकीचा दीप तेवत राहो...! बुद्धीच्या देवते तुझे विसर्जन की बुडवणूक ? डहाणू तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न हेकळवाडी जिल्हा परिषद शाळा विद्यार्थी सुरक्षा सुविधा समिती अध्यक्षपदी सागर झेंडे यांची निवड संजय अहिरे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार जि. प. आदर्श केंद्रशाळा शिरसवडी येथे 'शालेय क्रीडामहोत्सव' उत्साहात निंबवडे जि. प. शाळा नं. २ ची चौफेर भरारी शिक्षक नितीन कर्पे यांचा अभिनव उपक्रम व्हॉट्सपच्या माध्यमातून मुलांना संस्कारांची शिदोरी पोषण आहारच्या स्वयंपाकींचे मानधन तातडीने अदा करा गणेश मंडळांना भेट देत तुळसण शाळेच्या विद्यार्थ्यांची सामाजिक, पर्यावरण जनजागृती 'सेवा संकल्प अभियान' अंतर्गत प्रकाशा कन्या शाळेत विविध उपक्रम कोरेगाव नं. ३ जिल्हा परिषद शाळेत गणेशोत्सवाच्या आरती कार्यक्रमात विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण शिवाजी रोडे-पाटील गृहतारण संस्थेचा ३७ कोटींचा व्यवसाय धनवडेवाडी शाळेच्या चिमुकल्यांचे पर्यावरणपूरक जनजागृती अभियान प्रगल्भ माणूस घडवणारे व्यक्तिमत्त्व : प्रा. डॉ. सुभाष वाघमारे कला आणि संस्कृतीची परंपरा जपणारी वाई नगरी बाप्पांची भक्ती की फॅशनची सक्ती प्रा. घनश्याम पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार रग्बीच्या मैदानावर साताऱ्याच्या मुलींचा दमदार खेळ नारायणगावात ओम श्री साईराम शिक्षक प्रतिष्ठानच्या वतीने गुणवंत शिक्षक व विद्यार्थी पुरस्कार सोहळा उत्साहात धारपुडी येथे रुपाली सुतार यांच्या घरातील गणेशोत्सवाचा अनोखा देखावा जगात गुरुपेक्षा कुणीच श्रेष्ठ नाही : डॉ. मधुसूदन घाणेकर
Satara,Maharashtra,India

'समग्र प्रगतिपुस्तिका'ची राज्यस्तरावर झाडाझडती

अधिकाऱ्यांना १५ शाळांची तपासणी बंधनकारक
'समग्र प्रगतिपुस्तिका'ची राज्यस्तरावर झाडाझडती

पुणे : विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केवळ परीक्षेतील गुणांपुरते मर्यादित न ठेवता त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, भावनिक, कलात्मक, क्रीडा आणि जीवनकौशल्यांच्या सर्वांगीण विकासाचा आढावा घेण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या 'समग्र प्रगतिपुस्तिका' उपक्रमाच्या अंमलबजावणीची आता राज्यस्तरावरून झाडाझडती घेतली जाणार आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद अर्थात विद्या प्राधिकरणाने जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांना किमान १५ शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन 'समग्र प्रगतिपुस्तिका'च्या वापराची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. या पाहणीचा जिल्हानिहाय संक्षिप्त अहवाल २० सप्टेंबर २०२६ पर्यंत सादर करावा लागणार आहे.

राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र परख एनसीईआरटी यांच्या माध्यमातून केंद्र शासनाने सन २०२४-२५ पासून विद्यार्थ्यांना समग्र प्रगतिपुस्तिका उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार स्टार्स प्रकल्पांतर्गत राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून 'समग्र प्रगतिपुस्तिका'च्या वापराची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यमापन करताना केवळ पाठ्यपुस्तकातील ज्ञान किंवा परीक्षेतील गुणांकडे न पाहता त्याच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंचा विचार केला जातो.

त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा सर्वंकष आणि सातत्यपूर्ण आढावा घेण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. समग्र प्रगतिपुस्तिकेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासंदर्भातील निरीक्षण नोंदी, मूल्यमापन नोंदी आणि शिक्षकांचे अभिप्राय नियमितपणे नोंदवले जातात का? याची अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जाणार आहे. तसेच, या नोंदींचा वापर अध्यापन नियोजन, विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा आणि आवश्यक शैक्षणिक हस्तक्षेपासाठी केला जातो का? हेही पाहिले जाणार आहे. याशिवाय शिक्षकांमध्ये क्षमताआधारित मूल्यमापनाची समज विकसित झाली आहे का? याचाही आढावा घेण्यात येणार आहे.

'गुणां'ऐवजी 'गुणवत्तापूर्ण विकासा'कडे लक्ष

समग्र प्रगतिपुस्तिकेमुळे विद्यार्थ्यांच्या केवळ शैक्षणिक कामगिरीऐवजी त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाचे मूल्यांकन करण्याची दिशा शिक्षणव्यवस्थेला मिळाली आहे. मात्र, या पुस्तिकेतील नोंदी केवळ कागदोपत्री न राहता त्यांचा प्रत्यक्ष अध्यापन प्रक्रियेत वापर होतो आहे का? याची खातरजमा करण्यासाठी ही पाहणी महत्त्वाची ठरणार आहे.

 प्रतिपुस्तिका ही केवळ विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंद ठेवणारी पुस्तिका नसून, त्यांच्या सर्वांगीण विकासाचा आरसा आहे. त्यामुळे तिच्यातील नोंदी नियमित, अचूक आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी उपयोगी पद्धतीने केल्या जात आहेत का? याची प्रत्यक्ष पडताळणी आवश्यक आहे.

-डॉ. कमलादेवी आवटे, सहसंचालक, विद्या प्राधिकरण समग्र

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.