Satara,Maharashtra,India
जि. प. शिक्षिका विद्या लेंभे यांचे हृदयविकाराने निधन
आदर्श पुरस्कार स्वीकारला अन, दुसऱ्याच दिवशी प्राणज्योत मालवली

सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या सोनके ता. कोरेगाव येथील केंद्र शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका सौ. विद्या संतोष लेंभे यांचे आज दि. 13 रोजी पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. सौ. लेंभे यांनी कालच (दि.12) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार स्वीकारला होता. आज त्यांचे अचानक निधन झाल्याने जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. विद्या लेंभे यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक विद्यार्थी घडवले. कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक हे त्यांचे मूळ गाव आहे.
0 कमेंट
कमेंट करा
तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.