Loading...
ब्रेकिंग न्यूज :
'पायवाटा' च्या माध्यमातून दुर्गम शाळांची कहाणी जगासमोर.. अथांग नातं मैत्रीच्या पलीकडचं, प्रेमाच्या अलिकडचं चांडाळ चौकडी जिल्हा परिषद शाळा कानेगावला तालुका आदर्श शाळा पुरस्कार नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रश्नावर मंत्रालयात बैठका राज्यस्तरीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेत गोकूळ शाळेच्या आदित्य रिटेचे सुयश NPS ची रक्कम GPF मध्ये वर्ग करण्यासाठी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचा पाठपुरावा तांबवे शिक्षण परिषदेत आदर्श शिक्षकांचा विशेष सत्कार जि. प. शाळा, ताथवडे येथे बाहुलीनाट्यातून गाणी-गोष्टींचे मनोरंजक सादरीकरण धर्मवीर संभाजी विद्यालय, देगाव येथे रस्ता सुरक्षा कार्यक्रम संपन्न ज्ञानदानातून राष्ट्रनिर्मिती करणाऱ्या शिक्षकांचा नारायणगावात विशेष गौरव स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धा आवर्डे केंद्रात उत्साहात संपन्न सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेला १० कोटींचा विक्रमी नफा ! मुलाच्या अभ्यासासाठी आले अन् शाळेच्या स्वच्छतेत रमले गुरुजींना 'गुरुजी' राहू द्या जिल्हा परिषद शाळांची सद्यःस्थिती : आव्हाने, वास्तव आणि भविष्याची दिशा प्रेम, मैत्री आणि स्वप्नांचा तरल जीवनपट : 'लायब्ररी फ्रेंड' यवतमाळ जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत श्री शिवाजी हायस्कूल, नेरच्या विद्यार्थिनींचे उज्ज्वल यश सातारा तालुका शिक्षक समितीच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार मातोश्री गिरीजाबाई पाटील शाळेत 'आग नियंत्रणाचे' धडे जावली तालुका आदर्श शिक्षक पुरस्काराने अस्मिता जाधव सन्मानित केंद्र शाळा निगडी खुर्दचा इंग्रजीच्या मैदानात डंका गणेशोत्सवात जि. प. शाळा, धावडशीत संस्कारांची मंगलमय रुजवण 'विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसोबतच सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत : सचिन गोपाळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवातून विद्यार्थ्यांना निसर्गसंवर्धनाचा संदेश बत्तीस शिराळ्यात नंदकुमार सागर यांचा झंझावाती प्रचारदौरा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत कोर्टीच्या चिमुकल्यांची जनजागृती गणितातील अवलिया ऋषितुल्य शिक्षक : जगदीश सुपेकर साहित्याशी जडले नाते जगणं सुंदर आणि बहरदार करणारा सदाबहार काव्यसंग्रहः जगणं होईल हिरवंगार सोलापूर जिल्ह्यातील ३६ उपक्रमशील शिक्षकांचा जिल्हास्तरीय सन्मान आयेशा नदाफ यांनी दिल्लीत केले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व मावळा जवान संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी द्वारे बलकावडेवाडी शाळेला १५ हजारांचे शैक्षणिक साहित्य ढोरेगावच्या जिल्हा परिषद शाळेची क्रीडा क्षेत्रात दमदार भरारी दाणेवाडी शाळेत माजी विद्यार्थी व शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न अतिरिक्त शिक्षक-कर्मचाऱ्यांचे रोखलेले वेतन तात्काळ सुरू करा : शेख अब्दुल रहीम जिल्हा परिषद शाळा दरूजच्या पै. सुरज जाधवने जिंकली मानाची चांदीची गदा परभणी जिल्हा परिषद एम्प्लॉईज को-ऑप क्रेडिट सोसायटीची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार जि. प शाळा मठाचीवाडीच्या मुलींचा कबड्डीच्या मैदानात डंका कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालकांची संख्या ११ करण्यास मंजुरी कराड-पाटण शिक्षक सोसायटीची ७५ वी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात छब्बीचा लाल गणपती : श्रद्धा, परंपरा आणि एकतेचा वारसा यशोगाथा गुरुजींची तरीही जिवंत मी... जळत्या जखमांतून जन्मलेला जगण्याचा प्रकाश तालुकास्तरीय लोकनृत्य स्पर्धेत निंबवडे जि. प. शाळा नं. २ प्रथम येवलेवाडीच्या लोचना धनवडे यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार शिवाजीराव देसाई विद्यालयातील विद्यार्थ्यांचा स्वच्छता उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज : प्रा. दिलीप जाधव अशोक किसन कांबळे यांच्या स्मरणार्थ नगरपालिका नं. ११ शाळेला प्रिंटर भेट
Satara,Maharashtra,India

सरपंच कलेक्टरशी भांडले, शिक्षक, विद्यार्थ्यांसाठी!

पोलिसांनी केली अटक, बीएलओ नियुक्तीवरून गदारोळ
सरपंच कलेक्टरशी भांडले, शिक्षक, विद्यार्थ्यांसाठी!

छ.संभाजीनगर : निवडणूक आयोगाच्या कामासाठी शिक्षकांच्या करण्यात आलेल्या नियुक्त्यांवरून छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात गदारोळ पाहायला मिळाला. शाळांमधील शिक्षकांना जर तुम्ही बीएलओ ड्युटी देणार असाल, तर वर्गात विद्यार्थ्यांना शिकवायचे कोणी?

असा संतप्त सवाल करत फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथील सरपंच मंगेश साबळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धुमाकूळ घातला. यावेळी थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच एकेरी भाषेत आव्हान देत आत्मदहनाचा इशारा देणाऱ्या सरपंच साबळे यांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली आहे.

सध्या संपूर्ण जिल्ह्यात निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचे काम सुरू आहे. या कामासाठी प्रशासनाने अनेक शाळांमधील ५० टक्क्यांहून अधिक शिक्षकांच्या ड्युटी लावल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप सरपंच मंगेश साबळे यांनी केला. शिक्षकांना या निवडणूक कामातून तातडीने वगळण्यात यावे आणि ही जबाबदारी इतर विभागांतील कर्मचाऱ्यांना देण्यात यावी, या मागणीसाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले होते.


कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोहोचताच सरपंच साबळे यांनी थेट ठिय्या मांडला. पोलिसांनी त्यांना शांत राहून सनदशीर मार्गाने निवेदन देण्याची विनंती केली, मात्र त्यांनी पोलिसांचे ऐकले नाही. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर इथेच आत्मदहन करू, असा इशारा त्यांनी दिला. याच दरम्यान त्यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांना एकेरी भाषेत उद्देशून त्यांना खाली बोलवा, अशी जोरदार घोषणाबाजी करत दालनाबाहेर आरडाओरड सुरू केली. या गोंधळामुळे संपूर्ण परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच फुलंब्रीच्या तहसीलदार योगिता खटावकर या देखील तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्या. मात्र, आक्रमक झालेल्या सरपंचांनी त्यांनाही थेट जाब विचारण्यास सुरुवात केली. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत सरपंच साबळे यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात नेले. मात्र, तिथे निवेदन सुपूर्द करतानाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी अरेरावीची भाषा वापरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.