Loading...
ब्रेकिंग न्यूज :
जि. प. शाळा करगणी क्रमांक २ येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी मोडनिंब पीएमश्री मुलींच्या शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी गुरूंचे आशीर्वाद आपल्यासाठी लाखमोलाचे : प्राचार्य डॉ. चंद्रकांत बोबडे बेलसरच्या कल्याणी स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी नवनियुक्त शिक्षणाधिकारी संघरत्न सरोदे यांचा हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनतर्फ सत्कार काळमवाडी जिल्हा परिषद शाळेचा पर्यावरणासाठी अनोखा संकल्प आजारी होण्यापूर्वीच आरोग्य जपण्याची गरज विनाशाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या जगाला विवेकाचा इशारा 'बाराला दहा कमी' एसआयआरसाठी शिक्षक आणखी पाच दिवस शाळेबाहेर राहणार समग्र शिक्षा अभियानात महाराष्ट्राला तुटपुंजा निधी शिक्षणमंत्री दादा भुसेंची केंद्र सरकारवर नाराजी पालकांनी विश्वासू मार्गदर्शक व्हावे : डॉ. मंजुश्री बोबडे 'वायसी'त पालक मेळावा उत्साहात सायबर व विद्यार्थी सुरक्षेबाबत पाटण पोलिसांचे ज्ञानोजीराव हायस्कुलमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आदर्श विद्यालय शिरवळ येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी संभाजीनगर आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शैक्षणिक उपक्रमांना पिंपोडे खुर्द ग्रामस्थांची सदिच्छा भेट शिष्यवृत्ती, मंथन, प्रज्ञाशोध परीक्षांमध्ये म्हसवे जि.प. शाळेची यशस्वी परंपरा एक सूर, एक ताल अभिनव संकल्पनेतून अतीत केंद्रातील विद्यार्थ्यांना एकसमान गणवेश ज्ञानदानाचा अखंड दीप - आदर्श शिक्षण नसिम सादिक तांबोळी स्त्रीविषयक जाणिवांचा धगधगता वास्तव आलेख - भूमिकन्या वाढलेल्या पटसंख्येमुळे शिक्षक कमी न करण्याची शिक्षक संघाची मागणी शिक्षक मित्र विचार मंचची उरमोडी परिक्रमा उत्साहात पदोन्नती प्राप्त शिक्षक, शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा भाटशिरपुरा शाळेत गौरव शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा दरुज शाळेत गौरव शिक्षक परिषदेच्या बहुतांश मागण्या शिक्षणमंत्र्यांकडून मान्य बेलदरे प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांकडून सीडबॉल रोपणाचा अभिनव उपक्रम एक पेड माँ के नाम अभियानाला ढोरेगावच्या जि.प. शाळेचा हरित स्पर्श विद्यानगर जि.प. प्राथमिक शाळेत नवभारत साक्षरता ग्रंथदिंडी उत्साहात गुरुपौर्णिमा अज्ञानातून ज्ञानप्रकाशाकडे नेणाऱ्या गुरुतत्त्वाचा उत्सव गुरु दक्षिणेच्या पलीकडील गुरुत्व अभिनव विद्याविहार प्राथमिक शाळेच्या पाच विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश जतपुरा शाळेचे अमोल आढळकर यांचा स्टार प्रवाहकडून विशेष गौरव उज्ज्वल भविष्यासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नाही : डॉ. चंद्रकांत पाटील आरटीई कायद्यात दुरुस्ती करून सेवेतील शिक्षकांना टीईटी मधून कायमस्वरूपी सूट द्यावी : शेख अब्दुल रहीम चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत देवनांद्रा शाळेची यशाची परंपरा कायम राज्यस्तरीय शिक्षण संवाद कार्यशाळा मुंबई येथे उत्साहात संपन्न आषाढी एकादशीनिमित्त जि.प. च्या गळनिंब शाळेत भक्तिमय बालदिंडी सांगली शिक्षक बँकेत भरतीवरुन घमासान गुरु पौर्णिमा म्हणजे कृतज्ञतेचा दिवस... गुरु पौर्णिमा ज्ञान, संस्कार आणि कृतज्ञतेचा पवित्र उत्सव नीट परीक्षेत ६२५ गुण मिळविणाऱ्या उत्कर्ष राक्षेला लक्ष्य अकॅडमीकडून हार्ले डेव्हिडसन मोटारसायकल भेट लोकमंगल शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना सनराईज ग्रुपकडून मोफत गणवेश वाटप झेप प्रतिष्ठानतर्फे रुईघर, शिंदेवाडी शाळांना संगणक, शैक्षणिक साहित्याचे वितरण शिरगाव आदर्श प्राथमिक शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत देदिप्यमान यश श्री भवानी बालविद्या मंदिराची उत्साहपूर्ण आषाढी बालदिंडी ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात हेकळवाडी शाळेत बालवारकऱ्यांची दिंडी टाके वस्ती शाळेच्या दिंडीतून पर्यावरण, सामाजिक जनजागृती वाई तालुका शिक्षक संघाच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा इयत्ता ६ वी ते ८ वीच्या शाळांनाही २० पटासाठी तीन शिक्षक मंजूर व्हावेत भक्तिरसात न्हाऊन निघाले रांजणगाव पोळ कानेगाव शाळेच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश संगमनेर नगरपालिका शाळा क्र. ८ मध्ये भारतीय भाषा शिबिराचा उत्साहात समारोप
Satara,Maharashtra,India

साताऱ्यात जिल्हा परिषदेची शाळा पावसाने उध्वस्त

सज्जनगड जवळील कारी येथील घटना
साताऱ्यात जिल्हा परिषदेची  शाळा पावसाने उध्वस्त

सातारा : परळी, सज्जनगड जवळील कारी ता. जि. सातारा येथील जिल्हा परिषदेची शाळा सततच्या मुसळधार पावसाने आणि प्रचंड वाऱ्याने उध्वस्त झाली. सुदैवाने रविवारी सुट्टी असल्याने शाळेत विद्यार्थी नव्हते, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

 पावसामुळे शाळेचा पत्रा पूर्णपणे उचकटून पडला असून भिंतींचेही नुकसान झाले आहे. या पावसात शाळेतील कागदपत्रे, पुस्तके भिजून नुकसान झाले आहे. शाळा शाळा सुरू असताना ही दुर्घटना घडली असती तर जीवितहानीची ही शक्यता होती. या घटनेमुळे जिल्हा परिषद शाळांच्या जीर्ण इमारतींचा तसेच निकृष्ट बांधकामाच्या दर्जाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कारी शाळेत इयत्ता पहिली ते सातवीचे विद्यार्थी शिकत असून ही शाळा खेळाडुंसाठी विशेषत: मल्लखांब पटूंसाठी प्रसिद्ध आहे. 

सातारा जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. विशेषत: सातारा शहराच्या पश्चिम बाजूला असलेल्या दुर्गम कास, परळी खोऱ्यात मुसळधार पाऊस पडत आहे, तसेच सोसाट्याचा वारा वाहत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनीही शाळांना सुट्टी देण्याचे आदेश काढले आहेत. जिल्ह्यात सर्वत्र अद्याप पावसाचा जोर कायम असून या दुर्घटनेमुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक धास्तावले आहेत. सातारा जिल्ह्यातील अति प्रचंड पाऊस पडणाऱ्या पश्चिम व दुर्गम भागातील शाळांची तपासणी करावी, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.