Loading...
ब्रेकिंग न्यूज :
आणखी एक बळी लोकमाता अहिल्यादेवी आधुनिक राजकारणासाठी एक दीपस्तंभ शैक्षणिक व सामाजिक कार्यातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व : डॉ. सुभाष वाघमारे शिक्षणातील बदलाच्या वाटेवरचे पाऊल अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे सांगलीतील विद्यार्थी, पालक, शिक्षक त्रस्त तीनशे पेक्षा अधिक घरगणना असणाऱ्या प्रगणकांना मदतनीस द्यावा घातक संच मान्यता निकषामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांमध्ये असंतोष धर्मवीर विद्यालयात आदर्श दाम्पत्याचा गौरवपूर्ण सेवानिवृत्ती सोहळा परभणीच्या बालतारकांची विज्ञानाच्या आकाशात भरारी सुषमा आलेकरी लिखित प्रेरणादायी ग्रंथांचे प्रकाशन टीईटीसाठी एक वर्ष वाढवले पण सवलत नाही : सुप्रीम कोर्ट पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत नाटोशी जि.प. शाळेचे नेत्रदीपक यश टीईटीसाठी एक वर्ष वाढवले, पण सवलत नाही : सुप्रीम कोर्ट वैशाख मास आणि वाढते नैसर्गिक संकट.... शिक्षण, कला आणि संवेदनांचा प्रेरणादायी प्रवास कु. तेजस्विनी ढमाळ दहा वर्षात लाखभर सरकारी शाळा बंद पडल्या! जनगणनेबाबतच्या शिक्षक परिषदेच्या मागण्यांना अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद शहापूरचा 'शिष्यवृत्ती पॅटर्न' यशस्वी ठाणे जिल्ह्यातील ३९५ विद्यार्थी पात्र दोन लाख उमेदवारांचे भविष्य पणाला 'बिंदुनामावली'च्या घोळामुळे शिक्षक भरती रखडण्याची चिन्हे आधी जनगणना, शासकीय कामे करा, मगच प्रशिक्षणाला या शिक्षण क्षेत्रात पुणे जिल्हा परिषद राज्यात अव्वल टीईटीसाठी यंदा ६ लाख उमेदवारांची उच्चांकी नोंदणी रत्नानंद यांच्या 'गं गं गमतीचा... बालकविता संग्रहाचे थाटात प्रकाशन साताऱ्याची 'थंडर बर्ड' - सुदेष्णा शिवणकर डिजिटल वर्गखोलीः प्रगतीची भरारी की सर्वांगीण विकासाची कुचंबणा ? बोगस शालार्थ आयडी घोटाळ्याची २९ मे ला नाशिकमध्ये अंतिम सुनावणी भारतीय बी.एड. धारकांना ऑस्ट्रेलियात संधी समग्र शिक्षा अभियानांतर्गत महाराष्ट्राला निधी देताना केंदाचा हात आखडता जिल्हा पुरस्कारप्राप्त शिक्षकाला अतिरिक्त वेतनवाढ देण्याचे आदेश केजमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ल्यात प्रगणक शिक्षकासह ९ जण जखमी निवृत्त शिक्षक दांपत्याला ६० लांखाला गंडवनारी आंतरराज्य टोळी जेरबंद शिक्षकांचे जिल्हास्तरीय प्रलंबित प्रश्न सोडवा शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाची जि.प.अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्याकडे मागणी मुळगावच्या जि.प. शाळेच्या चिमुकल्यांची साहित्यभरारी शैक्षणिक क्षेत्रात सामाजिक ऋण जपणारे उत्तुंग व्यक्तिमत्व - छाया बैस-चंदेल ऊन्हं पेलण्यासाठी उभारी देणारा लेखसंग्रह त्यांना सावलीत वाढवू नका ! शिरुर तालुका शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी संदीप थोरात उपसभापतीपदी पोपटराव गांधले यांची बिनविरोध निवड ओस पडणाऱ्या जिल्हा परिषद शाळांना नवसंजीवनी, तळेगाव दिघे गावात 'एआय' युक्त हायटेक मराठी स्कूल प्राथमिक शाळांना ५ दिवसांचा आठवडा लागू करा आदर्श शिक्षक समितीचे राज्य शासनाला निवेदन महाराष्ट्र गौरव ऑनलाईन वकृत्व स्पर्धेत संस्कृती आळंजकर राज्यात प्रथम उत्तम सदाकाळ यांच्या 'हिरवा वसा' कवितेचा तिसरीच्या बालभारती पुस्तकात समावेश जनगणनेचे काम करणाऱ्या शिक्षकाला लोणंद मध्ये बेदम मारहाण युवकांनी स्पर्धा परीक्षेतून स्वतःचे करिअर घडवावे : जंबाजीराव भोसले कंटेनरच्या धडकेत शिक्षिकेचा मृत्यू जनगणना बळीची मालिका सुरूच जनगणनेचे काम करणाऱ्या शिक्षकाला मारहाण पालकांनो भुलू नका...!! फाळणीच्या सावलीत कमी पटसंख्येच्या शाळांचे एकत्रीकरण नीती आयोगाच्या शिफारशी अक्षयकुमारमुळे सरकारी शाळेचा कायापालट दिली एक कोटींची मदत जनगणना करताना शिक्षकाचा हृदयविकाराने मृत्यू सांगोल्यातील राजेंद्र ढोले यांच्या निधनामुळे शोककळा जनगणना कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वाचले आजीचे प्राण, आजोबांचा मृत्यू
mumbai,Maharashtra,India

शिक्षकांना वेतन नाही तर 'लाडकी बहीण' योजना बंद करा

कोर्टाने सरकारला खडसावले!
शिक्षकांना वेतन नाही तर 'लाडकी बहीण' योजना बंद करा

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला कडक शब्दांत फटकारले आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या निवृत्तीवेतनासाठी निधीची कमतरता भासत असेल, तर 'लाडकी बहीण' योजना तातडीने बंद करावी, असे स्पष्ट आदेश देत न्यायालयाने सरकारच्या प्राधान्यक्रमांवर तीव्र संताप व्यक्त केला.

न्यायालयाने पुढे म्हटले की, महानगरपालिकेच्या तिजोरीत पैसा नसेल तर आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आलिशान गाड्या विकूनही कर्मचाऱ्यांचे थकित निवृत्तीवेतन तातडीने द्यावे. मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील एका निवृत्त महिला कर्मचाऱ्याने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने सरकार व पालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले.

'लाडकी बहीण'सारख्या योजनांवर बंदी घाला

दीड वर्षांपूर्वी राज्य सरकारने सुरू केलेल्या 'लाडकी बहीण' योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. या योजनेला नागरिकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. विधानसभा निवडणुकीत महायुतीला या योजनेचा मोठा राजकीय फायदा झाला. अनेक 'लाडक्या बहिणीं'नी सरकारला भरभरून मतदान करून निवडून दिले. मात्र याच योजनेवर बरीच टीका होत आहे. राज्य सरकार आर्थिक अडचणीत सापडल्याची चर्चा रंगली आहे. महत्त्वाकांक्षी योजनांसाठी विविध विभागांचा निधी वळवला जात असल्याचेही समोर आले आहे.

निवृत्त कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या रकमेसाठी सरकारी तिजोरी रिकामी असल्याबद्दल न्यायालयाने तीव्र नाराजी दर्शवली. "कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी पैसा नसेल तर 'लाडकी बहीण'सारख्या योजनांवर बंदी घाला," अशा कठोर शब्दांत न्यायालयाने सरकारला खडेबोल सुनावले.

या प्रकरणात मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातून निवृत्त झालेल्या एका महिला कर्मचाऱ्याला सातव्या वेतन आयोगानुसार पेन्शन व इतर लाभ मिळाले नव्हते. वारंवार पाठपुरावा करूनही पालिकेने रक्कम दिली नाही. शेवटी त्या कर्मचाऱ्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. सुनावणी दरम्यान न्यायालयाने पालिकेच्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. अतिरिक्त आयुक्तांना नियमित वेतन मिळते, मग शिक्षकांना का मिळत नाही? वरिष्ठ अधिकारी सर्व सुविधा घेतात, पण आयुष्यभर सेवा दिलेल्या शिक्षकांसाठी पैसा नाही, यावर न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले.

न्यायालयाने पालिकेला धारेवर धरत म्हटले, "आता आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची वेळ आली तरी सातवा आयोगही लागू केला नाही." पैसे नसतील तर पालिका कार्यालयातील टेबल, खुर्च्या व एअर कंडिशनर विका, असेही न्यायालयाने सुनावले. "तिजोरी रिकामी असेल तर महानगरपालिका आयुक्त व इतर अधिकाऱ्यांच्या आलिशान गाड्या विकूनही कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन तातडीने द्या," असा स्पष्ट आदेश न्यायालयाने दिला. कर्मचाऱ्यांचा हा मूलभूत हक्क असून त्यांना यापासून वंचित ठेवता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

या प्रकरणाची गांभीर्यता लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने अतिरिक्त आयुक्तांना याबाबत स्पष्टीकरण देणारे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या या कडक भूमिकेमुळे राज्य सरकार व महानगरपालिकेवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी न्यायालयाने घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे आता सरकारला आपल्या योजनांबाबत नव्याने विचार करावा लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.