Loading...
ब्रेकिंग न्यूज :
गणितातील अवलिया ऋषितुल्य शिक्षक : जगदीश सुपेकर साहित्याशी जडले नाते जगणं सुंदर आणि बहरदार करणारा सदाबहार काव्यसंग्रहः जगणं होईल हिरवंगार सोलापूर जिल्ह्यातील ३६ उपक्रमशील शिक्षकांचा जिल्हास्तरीय सन्मान आयेशा नदाफ यांनी दिल्लीत केले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व मावळा जवान संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी द्वारे बलकावडेवाडी शाळेला १५ हजारांचे शैक्षणिक साहित्य ढोरेगावच्या जिल्हा परिषद शाळेची क्रीडा क्षेत्रात दमदार भरारी दाणेवाडी शाळेत माजी विद्यार्थी व शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न अतिरिक्त शिक्षक-कर्मचाऱ्यांचे रोखलेले वेतन तात्काळ सुरू करा : शेख अब्दुल रहीम जिल्हा परिषद शाळा दरूजच्या पै. सुरज जाधवने जिंकली मानाची चांदीची गदा परभणी जिल्हा परिषद एम्प्लॉईज को-ऑप क्रेडिट सोसायटीची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार जि. प शाळा मठाचीवाडीच्या मुलींचा कबड्डीच्या मैदानात डंका कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालकांची संख्या ११ करण्यास मंजुरी कराड-पाटण शिक्षक सोसायटीची ७५ वी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात छब्बीचा लाल गणपती : श्रद्धा, परंपरा आणि एकतेचा वारसा यशोगाथा गुरुजींची तरीही जिवंत मी... जळत्या जखमांतून जन्मलेला जगण्याचा प्रकाश तालुकास्तरीय लोकनृत्य स्पर्धेत निंबवडे जि. प. शाळा नं. २ प्रथम येवलेवाडीच्या लोचना धनवडे यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार शिवाजीराव देसाई विद्यालयातील विद्यार्थ्यांचा स्वच्छता उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज : प्रा. दिलीप जाधव अशोक किसन कांबळे यांच्या स्मरणार्थ नगरपालिका नं. ११ शाळेला प्रिंटर भेट गुवाहाटी प्रशिक्षणासाठी युवराज माने यांची निवड गांधीनगर शाळेतील विद्यार्थ्यांचा हरिपाठ सप्ताहात उत्स्फूर्त सहभाग परभणी जि.प. एम्प्लॉईज सोसायटीची आज ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा वर्णेत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आदर्श कृत्रिम तलावात गणेशमूर्तीचे विसर्जन कोंढवलीच्या ज्ञानमंदिराचा कृतज्ञ शिल्पकार - रमेश जाधव बाप्पा, विसर्जनानंतर माणुसकीचा दीप तेवत राहो...! बुद्धीच्या देवते तुझे विसर्जन की बुडवणूक ? डहाणू तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न हेकळवाडी जिल्हा परिषद शाळा विद्यार्थी सुरक्षा सुविधा समिती अध्यक्षपदी सागर झेंडे यांची निवड संजय अहिरे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार जि. प. आदर्श केंद्रशाळा शिरसवडी येथे 'शालेय क्रीडामहोत्सव' उत्साहात निंबवडे जि. प. शाळा नं. २ ची चौफेर भरारी शिक्षक नितीन कर्पे यांचा अभिनव उपक्रम व्हॉट्सपच्या माध्यमातून मुलांना संस्कारांची शिदोरी पोषण आहारच्या स्वयंपाकींचे मानधन तातडीने अदा करा गणेश मंडळांना भेट देत तुळसण शाळेच्या विद्यार्थ्यांची सामाजिक, पर्यावरण जनजागृती 'सेवा संकल्प अभियान' अंतर्गत प्रकाशा कन्या शाळेत विविध उपक्रम कोरेगाव नं. ३ जिल्हा परिषद शाळेत गणेशोत्सवाच्या आरती कार्यक्रमात विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण शिवाजी रोडे-पाटील गृहतारण संस्थेचा ३७ कोटींचा व्यवसाय धनवडेवाडी शाळेच्या चिमुकल्यांचे पर्यावरणपूरक जनजागृती अभियान प्रगल्भ माणूस घडवणारे व्यक्तिमत्त्व : प्रा. डॉ. सुभाष वाघमारे कला आणि संस्कृतीची परंपरा जपणारी वाई नगरी बाप्पांची भक्ती की फॅशनची सक्ती प्रा. घनश्याम पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार रग्बीच्या मैदानावर साताऱ्याच्या मुलींचा दमदार खेळ नारायणगावात ओम श्री साईराम शिक्षक प्रतिष्ठानच्या वतीने गुणवंत शिक्षक व विद्यार्थी पुरस्कार सोहळा उत्साहात धारपुडी येथे रुपाली सुतार यांच्या घरातील गणेशोत्सवाचा अनोखा देखावा जगात गुरुपेक्षा कुणीच श्रेष्ठ नाही : डॉ. मधुसूदन घाणेकर
Satara,Maharashtra,India

इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०२७ मध्ये

जिल्हा परिषद शाळांना परीक्षा शुल्कासाठी ५ टक्के निधी वापरण्यास मान्यता
इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०२७ मध्ये

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणारी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता चौथी) आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता सातवी) सन २०२७ मध्ये फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने राज्यातील शिक्षण विभागांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत.

परीक्षा परिषदेने २५ ऑगस्ट २०२६ रोजी जारी केलेल्या पत्रानुसार, शासन निर्णयातील तरतुदीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता चौथी व इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे.

ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदांच्या अखत्यारितील प्राथमिक शाळांच्या देखभाल-दुरुस्ती व इतर अनुषंगिक खर्चासाठी स्वतंत्र अंदाजपत्रकीय तरतुदीमध्ये ५ टक्के निधी राखीव ठेवण्यात येतो. या राखीव निधीतून जिल्हा परिषदेच्या अधिनस्त शाळांमधील इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेचे परीक्षा शुल्क तसेच शाळा संलग्नता शुल्क भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.

त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेत सहभागी होणाऱ्या जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरण्यासाठी शाळेच्या उपलब्ध निधीचा नियमानुसार वापर करता येणार आहे.

प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा सन २०२७ ची अधिकृत अधिसूचना ऑक्टोबर २०२६ मध्ये प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर परीक्षेची तारीख, अर्ज प्रक्रिया, शुल्क आणि अन्य आवश्यक बाबींबाबत सविस्तर माहिती उपलब्ध होणार आहे.

जिल्हा परिषद तसेच महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या अर्जासाठी लागणारे शाळा संलग्नता शुल्क व विद्यार्थी आवेदनपत्र शुल्क संबंधित जिल्हा परिषद सेसमधून किंवा महानगरपालिका निधीतून भरण्याची तरतूद करावी, असेही परीक्षा परिषदेने कळविले आहे. 

शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांचा अनुभव आणि गुणवत्तेला प्रोत्साहन मिळते. परीक्षा शुल्कासाठी निधीची तरतूद करण्यात आल्याने आर्थिकदृष्ट्या अडचणीच्या विद्यार्थ्यांना या परीक्षेत सहभागी होण्यास अधिक मदत होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.

"यावर्षी नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून बहुतांश शिक्षक BLO आणि सहाय्यक BLO बीएलओ असल्याने SIR कामामध्ये गुंतले होते. SIR काम संपले असले तरी नवीन मतदारांची नोंदणी आणि वगळल्या गेलेल्या मतदारांच्या हरकती, त्यांना नोटीसा देणे या कामाची जबाबदारी निवडणूक आयोग BLO असलेल्या शिक्षकांना देऊ शकते. राज्यात काही ठिकाणी अजून नवीन अभ्यासक्रमाची प्रशिक्षण हे संपलेली नाही किंवा सुरू झाली  नाहीत. या प्रशिक्षणासाठी सुद्धा शिक्षकांना शाळेबाहेर राहावे लागणार आहे. तसेच वरिष्ठ आणि निवड श्रेणी प्रशिक्षण सुद्धा आहेत. तसेच सध्या AI साथी, प्रशस्त, या ऑनलाइन प्रशिक्षणासाठी सुद्धा शिक्षकांना सूचना देण्यात आल्या आहेत. ही प्रशिक्षण करणे अनिवार्य असल्याचे समजते. यावर्षी दरवर्षीपेक्षा उपक्रमांची संख्या वाढलेली आहे. या उपक्रमांचे रजिस्ट्रेशन करणे,ते उपक्रम राबवणे, ऑनलाइन अपलोड करणे हेही काम सुरू आहे. त्यातच फेब्रुवारी महिन्यात जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी अधिक वेळ मिळावा यासाठी ही परीक्षा एप्रिल महिन्यात घ्यावी असे वाटते".

नितीन मेमाणे, 

उपाध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ,पुणे

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.